राजधानी दिल्ली : ग्राहकांची हाताची घडी...

सर्वसामान्य माणूस खरेदीच्या बाबतीत हात आखडता घेत असून त्याचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण करणे, हे मोठे आव्हान आहे.
अनिश्‍चिततेमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी वस्तू खरेदीबाबत हात आखडता घेतला आहे.
अनिश्‍चिततेमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी वस्तू खरेदीबाबत हात आखडता घेतला आहे.

आर्थिक आघाडीवरील अनिश्‍चितता व अस्थिरता वर्षभर तरी कमी-अधिक प्रमाणात राहील, असे रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच सर्वसामान्य माणूस खरेदीच्या बाबतीत हात आखडता घेत असून त्याचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण करणे, हे मोठे आव्हान आहे.

आर्थिक स्थिती आणि एकंदर अर्थव्यवस्थेचा आढावा घेताना आकडेवारी अपरिहार्य असते. संख्या केवळ बोलक्‍या नसतात तर तुमच्यापर्यंत थेट वास्तव भिडविणाऱ्या असतात. काही अग्रगण्य आर्थिक निरीक्षकांनी गेल्या आठवड्यातच प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या निरीक्षणांचा संदर्भ येथे द्यावासा वाटतो. रिझर्व्ह बॅंकेच्या ताज्या बुलेटिनचा संदर्भ देणेही अत्यावश्‍यक राहील, याचे कारण किमान रिझर्व्ह बॅंकेच्या निरीक्षणांबाबत कुणी प्रश्‍नचिन्ह किंवा शंका उपस्थित करणार नाही. रिझर्व्ह बॅंकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार पर्यटन व आतिथ्य क्षेत्र, बांधकाम आणि रियल इस्टेट क्षेत्र, नागरी हवाई वाहतूक, किरकोळ वस्तू बाजारपेठ(रिटेल) आणि करमणूक ही क्षेत्रे मोठ्या प्रमाणात ग्रस्त झाली आहेत. रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या पाहणीत लसीकरणाची मोहीम आणि त्याचा कितपत सकारात्मक परिणाम होतो, त्यावर भावी काळातील आर्थिक गती अवलंबून राहील, असे म्हटले आहे. (Rajdhani Delhi Consumer just watching article by Anant Bagaitkar aau85)

अनिश्‍चिततेमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी वस्तू खरेदीबाबत हात आखडता घेतला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती

आगामी काही काळापर्यंत कर्ज किंवा ऋण-बाजारातील मागणी मंदावलेलीच राहण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ गुंतवणुकीची प्रक्रियाही मंदच राहणार. एकंदर अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मत व्यक्त करताना अद्याप अर्थव्यवस्थेत आत्मविश्‍वास आलेला नाही आणि अनिश्‍चिततेची आणि अस्थिरतेची भावना कायम असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. अर्थात आर्थिक प्रक्रिया ही सतत चालणारी असते आणि त्यामुळेच जसा करोना साथीचा संसर्ग आणि व्याप्ती कमी होईल आणि त्यासाठी लसीकरणाची मोहीम देखील व्यापक करण्यात येईल, त्यानंतरच अर्थव्यवस्थेच्या पुनःश्‍च उन्नतीबाबत ठामपणे काही सांगणे शक्‍य होईल, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘बिझोम’ या संस्थेने केलेल्या अहवालाचा दाखला ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेला आहे. महाग वस्तू घेण्याऐवजी कमी किमतीच्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे या पाहणीत आढळून आले. त्याचप्रमाणे गरजेपुरतीच खरेदी करण्याचाही वाढता कल आढळून आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. उदाहरणार्थ जे ग्राहक पूर्वी मॅगी नूडल्सचे मोठे फॅमिली पॅक खरेदी करीत असत तेच आता गरजेपुरते म्हणजे एक किंवा दोनचेच पॅक खरेदी करताना आढळत आहेत. मोठे पॅक खरेदी करण्याचे प्रमाण २२ टक्‍क्‍यांनी घसरल्याचे या पाहणीत दिसून आले आणि लहान पॅक खरेदी करण्यात दहा टक्के वाढ आढळून आली. इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या वस्तु, घरगुती वापराच्या विजेवर चालणाऱ्या वस्तु व स्वयंपाकघरात लागणारी उपकरणे यामध्ये देखील कमी किमतीच्या वस्तुंच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. एवढेच नव्हे तर मोबाईल फोनमध्ये देखील साधारण दहा हजार रुपयांपर्यंतच्या फोनला प्राधान्य दिले जात असल्याचे या अहवालात नोंदविलेले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे परंतु शहरी भागात प्रमाण कमी असले तरी लोकांचा वाढता कल स्वस्त वस्तुंकडे आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अनिश्‍चिततेमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी वस्तू खरेदीबाबत हात आखडता घेतला आहे.
लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळं ज्येष्ठ नागरिकाचा वाचला जीव!

कोरोनाची साथ आणि लॉकडाऊन तसेच यातून रोजगारक्षेत्रावर झालेला अत्यंत प्रतिकूल असा परिणाम व वाढती आर्थिक अनिश्‍चितता आणि अस्थिरता यामुळे ग्रहकांचा विश्‍वास डळमळीत झालेला आहे. त्याचा कल पैसे वाचविण्याकडे वाढत आहे. त्यामुळे मागणी व खपावर परिणाम होत आहे. याच संदर्भात आणखी एका आकडेवारीची किंवा पाहणीची दखल घेतल्यास ही बाब आणखी ठळकपणे स्पष्ट होईल. अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेबाबतचे जे विविध मापदंड असतात त्यात रोजगार हे एक महत्त्वाचे क्षेत्र असते. करोनाकाळ साधारणपणे मार्च-२०२० मध्ये सुरु झाला असे मानले जाते. परंतु त्या आधीपासूनच अर्थव्यवस्थेला केवळ मरगळ आलेली नव्हती तर मंदगती सुरु झालेली होती. करोनाची साथ आणि लॉकडाऊन यामुळे या मंदगतीने अर्थव्यवस्थेला अधिक वेगाने पूर्णपणे ग्रासून टाकले. त्यातून अर्थव्यवस्था अद्याप सावरलेली नाही. वर उल्लेखित मुद्यांची पुष्टि करण्यासाठी आता रोजगारक्षेत्रातील आकडेवारीवर नजर टाकावी लागेल. ‘सीएमआयई’ ही संस्था यासंबंधीच्या अध्ययनातील अग्रगण्य संस्था मानली जाते. मार्च-२०२१ अखेर रोजगार संख्या३९.९७ कोटी होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर त्यात एक कोटी ३३ लाखांनी घट होऊन रोजगारसंख्या ३८ कोटी ६४ लाखांपर्यंत खाली आली.

नोकऱ्यांवर गंडांतर

ताज्या माहितीनुसार रोजगार नष्ट होण्याची संख्या आता सुमारे १.९६ कोटींपर्यंत गेली आहे. अहवालातील एक निरीक्षण चिंताजनक आहे. रोजगारक्षेत्राची ग्रामीण आणि शहरी अशी दोन स्थूल विभागात वर्गवारी केल्यानंतर शहरी विभागातील रोजगारसंख्या घसरण ही ग्रामीण भागापेक्षा अधिक तीव्र दिसते. तसेच शहरी भागात महिलांपेक्षा पुरुषांच्या नोकऱ्या जाण्याचे प्रमाण अधिक असल्याची बाबही समोर आली आहे. यावर भाष्य करताना अहवालाने म्हटले आहे की सर्वसाधारणपणे शहरी मध्यमवर्गीयांमध्ये पति-पत्नी दोघेही नोकरी करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. करोनाकाळात महिलांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. परंतु करोनाची पहिली लाट व दुसरी लाट यातही खूप तफावत आहे. पहिल्या लाटेत पुरुषांपेक्षा महिलांच्या नोकऱ्या अधिक गेल्या. पहिल्या लाटेत शहरी नोकऱ्या जाण्यातील महिलांचा वाटा ३९ टक्के होता. पहिल्या लाटेत एकंदर ६३ लाख रोजगार खतम झाले होते त्यापैकी २४ लाख महिला होत्या. परंतु दुसऱ्या लाटेत शहरी भागातील पुुरुषांच्या नोकऱ्या जाण्याचे प्रमाण तीस टक्‍क्‍यांवर गेल्याचे आढळून आले आहे. ही आकडेवारी जून अखेरीपर्यंतची आहे. या आकडेवारीचे आणखीही तपशील आहेत. परंतु त्या जंजाळात प्रवेश करण्यापेक्षा या आकड्यांच्या आधारे निघणारा निष्कर्ष भयसूचक आहे.

अनिश्‍चिततेमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी वस्तू खरेदीबाबत हात आखडता घेतला आहे.
कोरोनात आता नवं संकट; चीनमध्ये Monkey B विषाणूचा पहिला बळी!

शहरी भागात पति-पत्नी दोघेही नोकरी करण्याचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा अधिक आहे. पत्नीची नोकरी गेली तरी पतीच्या नोकरीवर घर चालू शकते. यामध्ये पतीची नोकरी ही प्रमुख असते आणि पत्नीची नोकरी ही सहाय्यकाची किंवा हातभार लावण्याची असते. त्यामुळे नव्या पाहणीत जी माहिती समोर आलेली आहे की ज्यामध्ये शहरांमधील पुरुषांच्या नोकऱ्या जाण्याचे प्रमाण अधिक आहे, आणि हे चिंताजनक आहे. कारण याचे परिणाम केवळ आर्थिक राहणार नसून सामाजिकही होणार आहेत. स्पष्ट भाषेत बोलायचे झाल्यास घराघरात अशांतता निर्माण करणारी ही बाब आहे. याचे एकंदरीतच सांसारिक आणि मुलांवर व कुटुंबांवर होणारे परिणाम अत्यंत प्रतिकूल असतील व त्यातून घराघरात कलहाची स्थितीही निर्माण होऊ शकते. एका अतिशय विचित्र अशा दिशेने समाजाची वाटचाल होत आहे.

अनिश्‍चिततेमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी वस्तू खरेदीबाबत हात आखडता घेतला आहे.
रावसाहेब कसबे यांची 'मसाप'च्या अध्यक्षपदी फेरनिवड

वर उल्लेखित तीन अध्ययनांचा एकत्रितपणे विचार केल्यास वरीलप्रमाणे चित्र उभे राहते. रिझर्व्ह बॅंकेच्या म्हणण्यानुसार देखील आणखी वर्षभर ही अनिश्‍चितता व अस्थिरता कमी-अधिक प्रमाणात राहील. त्याचा मुकाबला करण्याची क्षमता असलेले टिकाव धरु शकतील आणि उर्वरित देशोधडीला लागू शकतात हे कटु वास्तव आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची जाणीव असल्यानेच लोकांचा कल पैसे कमी खर्च करण्याकडे अधिक आहे. यामुळे बॅंकांमधील ठेवींच्या रकमेत वाढ झाल्याकडेही रिझर्व्ह बॅंकेने लक्ष वेधलेले आहे. त्यामुळे पैसे वाचवून या अस्थिर व अनिश्‍चित परिस्थितीतून तारुन जाण्याची धडपड सामान्य नागरिक करीत आहे !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com