टूरिस्ट! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 12 मे 2018

...जनकपूरच्या विमानतळावर टूरिस्ट उतरला. जनकपूर हे नेपाळमध्ये येते. तिथे विमानतळ आहे की नाही, ते आम्हाला माहीत नाही. पण आमचा टूरिस्ट मात्र विमानतळावरच उतरला हे शतप्रतिशत सत्य आहे...बऱ्याच दिवसांनी परदेशात पाऊल ठेवल्याचा आनंद त्या टूरिस्टाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. नेपाळ! जगातील एकमेव हिंदुराष्ट्र!! त्याचे मन समाधानाने भरून गेले. पवित्र भूमीत आल्याने आपल्याला पुण्य आपापत: लाभल्याची भावना त्याच्या मनात घर करून राहिली.
विमानतळाच्या द्वारापाशी टूरिस्टाच्या स्वागताला एक नेपाळी गाइड उभा होता. टूरिस्टाने शोधक नजरेने इकडे तिकडे पाहिले. तेवढ्यात तो गाइड नम्रतेने पुढे सरसावला.

'आर यू मि. थापा?' गाइडने विचारले. टूरिस्ट खवळलाच. तोंडावर थापा म्हणतो लेकाचा!! भारतात असता तर बघून घेतले असते.
' नोप...व्हाट इज युअर नेम?' टूरिस्टाने घुश्‍शात विचारले.  
' ऊ साबजी...ओली है!' गाइड तोंडभरून हसत स्वागत करत म्हणाला.
'ओली? कुठे?' टूरिस्टाने हादरून विचारले. आपल्या कुर्त्याला काही लागले आहे का, ते त्याने चाचपून पाहिले. छे, ओली कुठे? कोरडी तर आहे...हा इसम काहीही सांगतो आहे. आधी थापा म्हणाला, 'आता ओली आहे असे सांगतोय!' लबाड असावा!! सावध राहिले पाहिजे...टूरिस्टाच्या मनात विचार आले.
' माझं नावच ओली आहे, साबजी!' जणू मनातले ओळखून गाइड म्हणाला, 'मी केपी शर्मा ओली...तुमचा इथला गाइड. आपल्याला एव्हरेस्ट सर करायचं आहे का?'
...टूरिस्टाला क्षणभर मोह पडला. आल्यासरशी एव्हरेस्टवर जाऊन यावे काय? याआधी दोनवेळा नेपाळात येऊनही एव्हरेस्ट मिस झाले होते. पण हरकत नाही, परत इंडियात गेल्यावर एव्हरेस्ट चढून आलो, असे सांगून टाकू, असा विचार त्याने केला.
'सध्या एव्हरेस्ट नको!..आम्हाला सीतामैय्याच्या मंदिराकडे घेऊन चल!'टूरिस्टाने फर्मावले.

...टूरिस्टाने ब्याग पाठीला लावली आणि तो पाठोपाठ निघाला. सभोवताली पाहू लागला. ह्या इथेच जवळपास कुठेतरी सीतामैय्याचे स्वयंवर झाले होते, म्हणे.
'तुमच्या देशात आलो, खूप बरं वाटलं! परदेशात जायला मला भारी आवडतं! प्रवास हा माझा छंदच आहे!,' टूरिस्ट बोलघेवडा होता. शिवाय गाइडला बोलते करून त्याच्याकडून अधिकाधिक माहिती काढून घेण्याची हातोटी त्याच्याकडे होती. 'साबजीऽऽ...नेपाळ म्हंजे काही परदेश नव्हे...इथं यायला पासपोर्ट कुठं लागतो?' गाइड मान हलवत म्हणाला. आधीच ओलीसाहेबांचे सतत ‘साबजीऽऽ’ म्हणणे वैतागवाणे वाटू लागले होते. त्यात हा परदेश दौरा मानता येणार नाही असे तो म्हणाल्याने टूरिस्टाचा नाही म्हटले तरी थोडासा हिरमोड झाला. ह्याला टिप द्यायची नाही, असा निर्णय त्याने मनोमन घेऊन टाकला.

'त्याचं काय आहे की नेबर फर्स्ट ही आमची पॉलिसी आहे. शेजाऱ्याशी संबंध चांगले ठेवले की विरजण वगैरे वेळेत मिळतं...नाही का?' टूरिस्टाने बोलणे छेडले. नेपाळ आपल्याला खूप आवडते, इथे मी तीनदा येऊन गेलो आहे, असेही त्याने सांगून टाकले. ‘तुम्ही कधी येणार इंडियात?’ असेही विचारून झाले.
'साबजीऽऽ...किदर टाइम मिलता हय?' ओली गाइड कुरकुरला.
...‘या कधी इंडियात स्वेटरबिटर विकायला’, असे टूरिस्ट म्हणणार होता; पण त्याचे लक्ष वेगळ्याच गोष्टीकडे गेले.

'ही गर्दी कसली?' त्याने गाइडास विचारले. गाइडाने ‘ऊ साबजी, मॉलुम नई’ असे उत्तर दिले. ...नजीकच एक बस उभी होती. आसपास प्रवाश्‍यांची एकच गर्दी. 'बावनबारा, बावनबारा...अयोध्या डेपो! बावनबारा...' अशी उद्‌घोषणा ऐकून टूरिस्टाच्या अंगावर काटा उभा राहिला. सीतामैय्याच्या गावातून थेट रामलल्लांच्या चरणी बस जाणार? टूरिस्टाच्या पोटात आनंद मायेना झाला. हातातील बोचके उचलत तो ‘बावनबारा’कडे धावला...
तोंडातली शिट्टी काढून त्यानं घंटी वाजवली, आणि ओरडला : ‘सियावर रामचंद्र की जय!’

Web Title: editorial dhing tang british nandi article