भारताहून अधिक अण्वस्त्रे पाकिस्तानकडे 

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

अण्वस्त्रांच्या संख्येत पाकिस्तानने मोठी वाढ केली असून, त्यांच्याकडे आता भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे आहेत. एका अहवालानुसार, भारताकडे 130 ते 140 अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे 140 ते 150 अण्वस्त्रे आहेत. चीनकडे जवळपास 280 अण्वस्त्रे आहेत. 

स्टॉकहोम - अण्वस्त्रांच्या संख्येत पाकिस्तानने मोठी वाढ केली असून, त्यांच्याकडे आता भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे आहेत. एका अहवालानुसार, भारताकडे 130 ते 140 अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे 140 ते 150 अण्वस्त्रे आहेत. चीनकडे जवळपास 280 अण्वस्त्रे आहेत. 

स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेने (सिप्री) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, जागतिक शक्ती असलेले देश अण्वस्त्रांची संख्या कमी करत असले तरी त्यांचे आधुनिकीकरण आणि मारक क्षमता वाढवित आहेत. यामुळे शांततेची अपेक्षा करणाऱ्यांची चिंता वाढली आहे. अण्वस्त्रे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी देशांनी ठाम राहणे आवश्‍यक असून, काही प्रमाणात कायदेशीर बंधनेही घालणे आवश्‍यक असल्याचे मत "सिप्री'ने व्यक्त केले आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्राईल आणि उत्तर कोरिया या नऊ देशांकडे मिळून जवळपास 14,465 अण्वस्त्रे असून, त्यापैकी 3,750 अण्वस्त्रे तैनात आहेत. गेल्या वर्षी एकूण अण्वस्त्रांची संख्या 14,935 इतकी होती. उत्तर कोरियाने अण्वस्त्रमुक्त होण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. 

अण्वस्त्र संख्या : देश (बार ग्राफ) 
6,850 : रशिया 
6,450 : अमेरिका 
300 : फ्रान्स 
280 : चीन 
215 : ब्रिटन 
140-150 : पाकिस्तान 
130-140 : भारत 
80 : इस्राईल 
10-20 : उत्तर कोरिया 

अण्वस्त्रांचे प्रमाण (गोल ग्राफ) 
92 % : अमेरिका व रशियाकडील अण्वस्त्रे 
8% : उर्वरित देशांकडील अण्वस्त्रे 
 

Web Title: Pakistan has more nuclear warheads than India