कालचा गोंधळ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 14 जुलै 2018

(चाल : गीताई)

ऐका ऐका सुजन ऐका कहाणी थोर ही असे
कानास टोचली तरिही, ओठाशी येतसे हसे

गीताग्रंथ वितरणी या, घडले ते महाभारत
उदंड पेटला वाद, भलते झाले पराजित

भगवद्‌गीता ग्रंथ मोठा तत्त्व-सत्त्व यशोधरा
वांचता नित्य ही गीता, गोची जाई दिगंतरा

जीवनाचे कळे गुह्य, बदल होई बाह्यांतरी
गीतेने साधते सर्व, स्वप्न जे देखिले उरी

अध्याय आठरा ऐसे, जीविताचे सार ते
जयाला नावडे ग्रंथ, पडिती गपगार ते

शहाणा तोच ह्या व्योमीं, गीता ज्यासी मुखोद्‌गत
बाकीचे सर्व ते मूढ, त्यांना देऊ नये मत

(चाल : गीताई)

ऐका ऐका सुजन ऐका कहाणी थोर ही असे
कानास टोचली तरिही, ओठाशी येतसे हसे

गीताग्रंथ वितरणी या, घडले ते महाभारत
उदंड पेटला वाद, भलते झाले पराजित

भगवद्‌गीता ग्रंथ मोठा तत्त्व-सत्त्व यशोधरा
वांचता नित्य ही गीता, गोची जाई दिगंतरा

जीवनाचे कळे गुह्य, बदल होई बाह्यांतरी
गीतेने साधते सर्व, स्वप्न जे देखिले उरी

अध्याय आठरा ऐसे, जीविताचे सार ते
जयाला नावडे ग्रंथ, पडिती गपगार ते

शहाणा तोच ह्या व्योमीं, गीता ज्यासी मुखोद्‌गत
बाकीचे सर्व ते मूढ, त्यांना देऊ नये मत

जयाला येतसे गीता, तोंडपाठी उलटसुलट
तोचि साधु ओळखावा, बाकीचे चोर-चीलट

हडबडे गडबडे जेव्हा, रणांगणी तो धनंजय
भगवंत वदिला तेव्हा, आता खाशी पराजय

कर्मातचि तुझा भाग, तो फळात नसो कधीं
नको कर्मफळी हेतू, अकर्मी वासना नको

मेल्यांने भोगिसी स्वर्ग, जिंकिल्याने मही-तळ
म्हणुनी अर्जुना ऊठ, युद्धास दृढनिश्‍चयें

एवढे बोलुनी तेव्हा, वदितां झाला युगंधर
तीच ही तीच गीता हो, स्मरां नित्यं निरंतर

जया गीता असे पाठ, त्याला काही नसे कमी
गीतानामें करा कल्ला, तिकिटाची मिळे हमी

ज्ञानोबा चालवीं भिंत, पसायदानें निरुपिली,
रेड्यामुखी वदविले वेद, तुम्हां का ती येऊ नये?

कॉलेजे निवडा ऐसी, ‘नॅक’ ज्यांचे असे वर
शिकवणी असो वा शाळा, तेथे वाटा ही सत्वर

शास्त्रविद्या पुरे आता, विज्ञान ते सर्वथा मिथ्या
गीताग्रंथ श्रेष्ठ ज्ञान, बाकी साऱ्या उचापत्या

ऐश्‍या दिव्य ग्रंथाचे, करावे योग्य वाढप
इलेक्‍शने आली दारी, सत्वरी काम आटप

कायावाचामने किंवा, रिकाम्या समयांतरी
चार श्‍लोक सदा म्हणिजे, पुष्पवृष्टी करुं शिरीं

गीतावाटप कर्म थोर, त्यावरी केवढे रण
पाठांतराच्या कर्मी कसले ते राजकारण

विरोधकें म्हणती आम्हा गीतेचा न द्यावा धडा
कोळुनी प्यालों गीता, बोलू येथे घडाघडा

नाकांसी लावुनी जिव्हा, नेते वदले अयाचित
परंतु, फुटला घाम, श्‍लोक म्हणता यथास्थित

गात्रेची गळतीं त्याची होतसे तोंड कोरडे
शरीरीं सुटतो कंप, जिव्हा ऐसी लुळी पडे

गर्दभाच्या पुढे केले पठण ते ठार निष्फळ
कालचाचि बरा होता, येथला महागोंधळ

गीता नव्हे हा असे ज्ञानदीप
भगवद्‌ध्वनी हा असे शब्दरूप
तया राजकाजी ओढू नका रे
गीतेस ऐसे वाटू नका रे

Web Title: editorial dhing tang british nandi article