dhing tang
dhing tang

सर्किटची कविता! (ढिंग टांग)

बोले तो आपलं नाव सर्किट,
सिर्फ नाम है काफी!
आपला हिसाब एकदम रोकडा
उधारसे है माफी!

मुन्नाभाईची सावली बनून
केले दोन पिच्चर!
लोग बोलले घोडे के साथ
दौडा एक खच्चर!

मुन्नाभाई तो बदल गया
भलताच सुधरुन गेला
बुरा मत देखो, बुरा मत सुनो
बुरे के मूंह को ताला!

मुन्नाभाई सौंसारात सेटल झाला,
बना फॅमिलीवाला भिडू!
खजूर खा के मुन्ना चला
हाथ में ले के झाडू!
आपुन पन सोडली तेव्हा
चारसोबीसीची लाइन
बोल्लो पुढली लाइफ आता
इज्जतमधी ऱ्हाईन!

असाच बोले तो एक दिवस
पडलो होतो हांतरुनावर
तेव्हा आला कुटून तरी
बापूंचा आवाज कानावर!

दोपहरचा व्होता टायम
रेडू एफेम चालू व्होता
हलकी डुल्लक लागलीवती
जेवन टायट झाला व्होता

कोन तरी खाकरला,
आपन पष्ट ऐकला
उटून बघितला तर
कुनीच नाय दिसला!
‘‘बेटा सर्किट, उठतोस ना?
किती वेळ झोपायचं ते?
आळस झटक, काम कर
तरच भाकरी मिळते!’’
‘कोन बे, कोन बे’ असं म्हनत
उटून बसलो जोरात
कुनीच दिसंना म्हटल्यावर
जीव फाटला दीड हात!
बोल्लो, आपल्या पन डोक्‍यात
केमिकल लोच्या झाला काय?
मुन्नाभाईच्या मागोमाग
आपला बी नंबर लागला काय?

पन तेवढ्यात-

कोपऱ्यात बापू उभे व्होते,
नजर व्होती मायाळ!
हातात काठी, चष्म्यात हसू
आणि कमरंला घड्याळ!

आपन बोल्लो टेचात मग
कर नाही त्याला कशाची डर?
‘‘कसं काय? हिकडे कुटे?
हौवार्यु मि. प्रभावळकर?’’

किंचित हसून बापू बोलले,
‘‘विसरलास मला इतक्‍यात?
तुझी काही चूक नाही म्हणा,
जगच बदललंय दणक्‍यात!

गांधीवादाचा जप करत
जणु देशच झालाय युद्धमान
वैष्णवजनांच्या माझ्या देशात
गाजतंय राफेल विमान!

रोज आंदोलनं, रोज मारामाऱ्या,
रोजचा झालाय हिंसाचार
अशा स्थितीत कसा टिकावा
तुझ्या बापूंचा विचार?

तूच काही तरी कर रे सर्किट
वाचव तुझा राष्ट्रपिता
नोटेवरच्या छबीत उरलाय
आणि बाकी इव्हेंटपुरता!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com