अब्दुल्ला! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

चलो आज सुनाते है
तुमकू अब्दुल्ला की ष्टोरी
तुमच्या-आमच्यासारखी नाही,
फिल्लम टाइप भारी!

अब्दुल्ला आहे मिलनसार
हसून खेळून राहणारा
सबका अच्छा तो अपना अच्छा
असं काहीसं मानणारा

शादी कुणाचीही असली तरी
अब्दुल्लाचं गातं दिल
अब्दुल्ला बोले तो है समंदर
किसीका भी भरेगा बिल!

‘‘कुछ भी हो उल्टापुल्टा
आपुन कू कुछ फिकर नही’’
असं म्हणणाऱ्या चेहऱ्यावरचं
स्मित काही ढळत नाही

दु:खाच्या प्रसंगातही
शोधत असतो काहीबाही
दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख
मानतो आमचा अब्दुलभाई

चलो आज सुनाते है
तुमकू अब्दुल्ला की ष्टोरी
तुमच्या-आमच्यासारखी नाही,
फिल्लम टाइप भारी!

अब्दुल्ला आहे मिलनसार
हसून खेळून राहणारा
सबका अच्छा तो अपना अच्छा
असं काहीसं मानणारा

शादी कुणाचीही असली तरी
अब्दुल्लाचं गातं दिल
अब्दुल्ला बोले तो है समंदर
किसीका भी भरेगा बिल!

‘‘कुछ भी हो उल्टापुल्टा
आपुन कू कुछ फिकर नही’’
असं म्हणणाऱ्या चेहऱ्यावरचं
स्मित काही ढळत नाही

दु:खाच्या प्रसंगातही
शोधत असतो काहीबाही
दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख
मानतो आमचा अब्दुलभाई

एक दिन ऐसा हुवा की,
लोखंडाचे झाले चणे
पाकिटातल्या नोटा एकदम
महज कागज के टुकडे बने

नोटा बदलून घेण्यासाठी
सगळे येडे गेले ब्यांकेत
पूरा देश उभा राहिला
बंद एटीएमच्या रांगेत

नोटाबंदीच्या काळामध्ये
पब्लिक होती हैराण
अब्दुल्ला मात्र आमचा
होता आनंदाने बेभान

नोटाबंदीच्या काळजीने
फिरत होतो बापडा
अब्दुल्ला आला घेऊन
कंदी पेढ्याचा पुडा!

विचारले तर म्हणाला,
‘‘मूंह मीठा करो हुजूर,
करीना-सैफ कू बच्चा हुआ
...नाव ठेवलं तैमूर!’’

सोनम कपूरच्या शादीतही
अब्दुल्ला मस्त नाचला
आधार कार्डासाठी तेव्हा
देश होता फसला!

डोकलाममध्ये चिनी सैन्य
घुसले होते जेव्हा
विराट आणि अनुष्काची
शादी झाली तेव्हा

अब्दुल्ला म्हणतो जिंदगी है
कभी खुशी है, कभी गम
जब तक है जान नाचूंगा प्यारे,
...कभी न थकेंगे हम!

विराट-अनुष्कासाठी त्याने
खूप पाहिली वाट
रिसेप्शनला बोलावतील म्हणून,
कपडे शिवले साठ

मीटूच्या महापुरात
सगळेच गेले वाहून
अब्दुल्ला मात्र टिकून राहिला
लव्हाळी लव्हाळी होऊन

अच्छे दिन कधी येणार?
महागाईचे करू काय?
पेट्रोलने उडवले होश
रुपया कधी उठेल काय?

अब्दुल्लाला कधीच पडत
नाहीत असले प्रश्‍न
त्याच्यासाठी जिंदगी म्हणजे
फुलटाइम जश्‍न!

काल भेटला अब्दुल्ला
म्हणाला मिठाई खा ना!
दीपिका-रणवीरच्या शादीला
नोव्हेंबरात येणार ना?

बेगाने शादी में असतो
असा अब्दुल्ला दिवाना
ऐसे मनमौजीको अब
मुश्‍किल आहे समझाना!

अब्दुल्लाची छबी बघायला
डोकवा जरा मनात
किंवा फुर्सतीच्या वेळी
बघा जरा आरशात!

Web Title: editorial dhing tang british nandi article