अच्छे दिन आ गये! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाएब ह्यांशी, पायलचा नमस्कार. सक्‍काळीच पहाटे पहाटे साडेअकराला बबलूचा मोबाइल आला का ‘‘पगली सोती क्‍या? दिवाली मना! डान्स बार वाप्पिस शुरू होरेले हय’. मी त्याला बोल्ले का ‘सकाळधरनं कोनी भेटलं नाय का? जा मेल्या!’ मी फोन ठेवला. पन बबलू चांगला मानूस आहे. (बबलू रिक्षावाला रातच्याला न्यायाला येतो. जंटलमन आहे. काळजी नसावी.) डान्स बार पुन्ना सुरू होनार, ही त्याची खबर पक्‍की होती. जगात देव आहे! मेरे ‘मन की बात’ कोर्टाने ऐकली. अय्याबय्या, स्वोताची वळख सांगायलाच इसरले...सॉरी!

डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाएब ह्यांशी, पायलचा नमस्कार. सक्‍काळीच पहाटे पहाटे साडेअकराला बबलूचा मोबाइल आला का ‘‘पगली सोती क्‍या? दिवाली मना! डान्स बार वाप्पिस शुरू होरेले हय’. मी त्याला बोल्ले का ‘सकाळधरनं कोनी भेटलं नाय का? जा मेल्या!’ मी फोन ठेवला. पन बबलू चांगला मानूस आहे. (बबलू रिक्षावाला रातच्याला न्यायाला येतो. जंटलमन आहे. काळजी नसावी.) डान्स बार पुन्ना सुरू होनार, ही त्याची खबर पक्‍की होती. जगात देव आहे! मेरे ‘मन की बात’ कोर्टाने ऐकली. अय्याबय्या, स्वोताची वळख सांगायलाच इसरले...सॉरी!
पायल ऊर्फ सोनम ऊर्फ चमेली ऊर्फ दीपाली! सगळी नावं आपलीच! आमच्या बार इंडष्ट्रीत बार बारमध्ये वेगळी नावे असतात. सध्या मी सोनबावाडीच्या नाक्‍यावरील ‘नाइट लाइफ बार अेण्ड रेस्टारंट’ (विथ आर्चेष्ट्रा) मध्ये डूटीला असते. मला कायम सेकंड शिफ्टमध्ये, सांजच्याला सहा वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत. बारचा मालक जगनशेठ चांगला मानूस आहे. फार्फार्पूर्वी आबाशेट पाटील नावाचे एक होम्मिनिष्टर होऊन गेले, त्यांची ह्या क्षनाला लई आठवन येत आहे. त्यांच्यामुळे आमचा जगनशेठ बारच्या जागीच इडली विकायला लागला. जिथे गान्याच्या रेकॉर्डी लागायच्या थिते डोश्‍याचे तवे लागले! मग आर्चेष्ट्राला पर्मिशन भेटल्यावर त्याने पुन्ना बार सुरू केला. पन त्यात मज्जा नव्हती. बार पुन्ना सुरू व्हावा म्हनून जगनशेठ शिर्डीला पन जाऊन आला. आबाशेटनी डान्सबार बंद केल्यामुळे पोलिसलोकांची पन गोची झाली. कोनताही पोलिस आज ‘मयूर’ किंवा ‘टोपाझ’ला गेल्तो, असे राजरोस सांगू शकत असे. अगदी घरीसुद्धा! पन बॅन आल्यामुळे त्यांचे येनेजाने थंड झाले. डान्सबारमुळे पब्लिक बिघडते, अशी एक गलतफहमी पसरली. डान्सबारमुळे मानूस सोशल होतो. कान्फिडन्स वाढतो. चारलोकात उठबस वाढते. पैशाभोवती दुनिया गोल फिरते, असे म्हंतात. पन ते चूक आहे. पैसा भी क्‍या चीज है? वो तो कोई भी कमाता हय! पैशाचा मोह ठेवू नये, हातात आला देऊन टाकला असा दर्यादिल मानूसच खरा असतो. मानसाला पैशाच्या मोहातून सुटायचे असेल तर त्याने डान्स बारमध्ये जाऊन बसावे! (पैसे म्हंजे कागदाचे कपटे समजून आम्हाला द्यावे!) डान्स बारमध्ये पोलिस, नामचीन गुंडा, वकील, डाक्‍टर, पेशंट समदे एकत्र बसतात. सब सरिखे! लोकशाही म्हंजे तरी वेगळे काय असते? डान्स, गाने ह्यामुळे मण रिझते आनि संस्क.. संकरुत... संकृत...जाऊदे! असलेच काय तरी असते, ते वाढते.

डान्स बार इतके चांगले ठिकान असताना तुम्ही लोकांनी त्याचा संस्कारी बार करून टाकला होता. पन आता काही हरकत नाही. देर आए, दुरुस्त आए! मागल्या टायमाला डान्स बारच्या गोल्डन टाइममध्ये डान्स बारमधल्या नामचीन पोरी टाटा सफारीतून फिरायच्या. लाखा लाखाच्या गड्ड्या घरी नेयाच्या. आता शंभर-पाश्‍शे सुटले तरी खूप झाले अशी परिस्थिती होती. आता मी पन स्कॉर्पिओ बुक करीन!
कारन आज कोर्टाच्या निकालामुळे आपन घातलेली डान्स बारवरील बॅन एकदाची उठली आहे. आमची रोजीरोटी वापस भेटली आहे. आपल्या राज्यात आम्हाला लेट का होईना, पन अच्छे दिन आले!! त्याबध्धल थॅंक्‍यू. कधी ह्या साईटला आलात, तर मित्रांसंगट या!! सांजेला मी आसेन. कळावे. आपकी अपनी पायल ऊर्फ सोनू ऊर्फ सोनम ऊर्फ दीप्ती ऊर्फ दीपाली ऊर्फ काजल ऊर्फ बबली.
ता. क. : आमच्या बारमध्ये शीशीटीव्ही नाही!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article