मां, मानुष अने माटीनां लड्डू! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 8 मे 2019

नमोजीभाई : (खुशीत) जे श्री क्रष्ण...तमे क्‍यारे आव्या?
मोटाभाई : (विषण्णपणे) अमणाज!
नमोजीभाई : (उत्साहात) हूं पण अमणाज आव्यो! बंगालमधी गेला होता ने!
मोटाभाई : (खचलेल्या सुरात) शुं कहे छे आपडी ममताबेन? सारु छे ने?
नमोजीभाई : (प्रेमाने) चिंता ना कोई कारण नथी! मी तिला सांगून आला के, बंगालमाटे बहु काम किधु तमने...हवे आराम करजो!

नमोजीभाई : (खुशीत) जे श्री क्रष्ण...तमे क्‍यारे आव्या?
मोटाभाई : (विषण्णपणे) अमणाज!
नमोजीभाई : (उत्साहात) हूं पण अमणाज आव्यो! बंगालमधी गेला होता ने!
मोटाभाई : (खचलेल्या सुरात) शुं कहे छे आपडी ममताबेन? सारु छे ने?
नमोजीभाई : (प्रेमाने) चिंता ना कोई कारण नथी! मी तिला सांगून आला के, बंगालमाटे बहु काम किधु तमने...हवे आराम करजो!
मोटाभाई : (चिंतामग्न स्थितीत) ममतादिदी ऐकेल असं वाटत नाही!! दिनभर काम ने काम ने काम ने काम!! मी पण तिला सांगितला के, आवती चूंटणीमधे तुमच्या तृणमूलच्या सूपडा साफ करीने नमोजीभाई आवीश! तमे आराम करजो!! मारी वात मानो... पण...(डोळे टिपतात...)
नमोजीभाई : पण शुं मोटाभाई, बतावो तो?
मोटाभाई  : ए कहे छे के तमारी वात माने मारी चप्पल! एक थोप्पड दूंगी तो दोनो गॉल में रोशोगुल्ला बन जॉएगा!!
नमोजीभाई : (च्याट पडत) अरे बाप रे!! आपडी ममताबेन तो फणसजेवी छे...उप्परथी कांटा कांटा, अंदरथी मधुरबांटा!! आ जो एने मारीमाटे शुं मुक्‍या छे!! (एक बॉक्‍स दाखवतात...)
मोटाभाई  : (डोळे पुसत) शुं छे? आ तो बोक्‍स छे!
नमोजीभाई : (खुलासा करत) ममताबेन माझ्यासाठी हरसाल एकदोन वखतला बंगाली कुर्ता स्वत: जाऊन सिलेक्‍ट करते आणि मला पाठवते!! खबर छे?
मोटाभाई : (आठवून) अक्‍सयभाईला दिलेल्या मुलाखतीत पण तुम्ही सांगितला होता हाच!!
नमोजीभाई : (सावधपणे) पण मारी मुलाकात अपॉलिटिकल हती हं!!
मोटाभाई  : (खोल आवाजात) तुम्ही त्या बंगाली कुर्त्याच्या काय करते?
नमोजीभाई : (कात्रीने कापड कापल्याचा अभिनय करत) बंगाली कुर्त्याचा बाही कापून नमोकुर्ता करून टाकते!! हाहा!!
मोटाभाई : (आणखी खचून) सारु छे!! आ बीजा बोक्‍स मां शुं छे?
नमोजीभाई : (हुरळून) मारीमाटे एने बंगाली मिठाई पण पाठवली हाय! आ जो!!
मोटाभाई : (तोंडाला सुटलेले पाणी आवरत) रोशोगुल्ला छे के शोंदेश?
नमोजीभाई : (आडमुठेपणाने) अजून बोक्‍स उघडला नाय! पण रोशोगुल्ला असेल!! उघडू?
मोटाभाई : (उतावळेपणाने) खोलो ने!! बे बे खाईश!! मने तो बंगाली मिठाई बहु गमे छे!!
नमोजीभाई : पण आ तो मारीमाटे छे, तमारी माटे नथी!! तमे ढोकला खाओ, हुं रोशोगुल्ला खाईश!!
मोटाभाई : (अजीजीने) खोलो तो!!
नमोजीभाई : (अनिच्छेनेच तयार होत) ठीक छे! पण एकज मळशे हं! बे बे नथी!! भलते लाड नाहीत!!
मोटाभाई : (अट मान्य करत) चालसे!
नमोजीभाई : (बॉक्‍स उघडत) आहा! रोशोगुल्ला! शोंदेश!! लड्डू!!
मोटाभाई : (तपशील पुरवत) एने खीरकोदोम कहे छे! लड्डू नथी!! दूध फाडीने छेना बनावीने...
नमोजीभाई : (त्यांना रोखत) जवां दे ने मोटाभाई! आ बंगाली लोगोंनी एक वात मने समझती नथी!! दूध दिसला के आ लोग लिंबू घेऊन फाडतात! अरे, पेल्ला चाय तो बनावो!!
मोटाभाई : (हात पुढे करत) आपो ने!!
नमोजीभाई : (दुर्लक्ष करुन एक लाडू तोंडात टाकत) ओय ओय ओय!! अरे एमा तो माटी अने पथ्थर छे!! माझ्या दात पडला ने!!
मोटाभाई : (शांतपणे पुढे केलेला हात मागे घेत) ममताबेननी सांगितला होता के हुं एने दगडमाटीच्या लड्डू पाठवणार, अने त्यांच्या दात पाडणार!! पडला ने!! पती गयो!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article