विदर्भाची विजयी पताका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

विदर्भ क्रिकेट संघाने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर दिल्लीचा पराभव करून प्रथमच रणजी करंडक जिंकला आणि एकच जल्लोष झाला. हा जल्लोष पुढील काही दिवस असाच सुरू राहील यात शंकाच नाही. विदर्भ संघाला मिळालेले हे यश केवळ एका दिवसात किंवा एका वर्षात मिळालेले नाही. विदर्भाला अशी, कोणती जादूची छडी मिळाली, की ज्यामुळे या संघाने थेट रणजी विजेतेपदाला गव     सणी घातली? पंधरा वर्षे मागे वळून पाहिले, तर याचे उत्तर मिळेल. मंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष एम. एन. दोराईराजन यांनी या विजयाचे बीजारोपण केले होते. त्याची फळे आता मिळू लागली आहेत. दोराईराजन यांनी अध्यक्ष ॲड.

विदर्भ क्रिकेट संघाने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर दिल्लीचा पराभव करून प्रथमच रणजी करंडक जिंकला आणि एकच जल्लोष झाला. हा जल्लोष पुढील काही दिवस असाच सुरू राहील यात शंकाच नाही. विदर्भ संघाला मिळालेले हे यश केवळ एका दिवसात किंवा एका वर्षात मिळालेले नाही. विदर्भाला अशी, कोणती जादूची छडी मिळाली, की ज्यामुळे या संघाने थेट रणजी विजेतेपदाला गव     सणी घातली? पंधरा वर्षे मागे वळून पाहिले, तर याचे उत्तर मिळेल. मंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष एम. एन. दोराईराजन यांनी या विजयाचे बीजारोपण केले होते. त्याची फळे आता मिळू लागली आहेत. दोराईराजन यांनी अध्यक्ष ॲड. शशांक मनोहर यांच्या पाठिंब्याने ‘मनोलक्ष्य’ हे ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी अभियान सुरू केले. तरुण खेळाडूंचा शोध घेणे, विदर्भातील इतर जिल्ह्यांतील खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे, नवीन सुविधा निर्माण करणे, ‘व्हीसीए’ची अकादमी सुरू करणे हे सर्व ‘मनोलक्ष्य’चा भाग आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांतील खेळाडू एकत्र आले आणि शहर-ग्रामीण ही दरी कमी झाली. सध्या विदर्भाच्या विविध संघांतून खेळत असलेले खेळाडू हे केवळ नागपुरातील नव्हे, तर अनेक जिल्ह्यांतील आहेत. त्यातून ज्युनियर पातळीवर यश मिळू लागले. गेल्याच वर्षी इंदूरमध्येच विदर्भाच्या १६ वर्षांखालील संघाने विजय मर्चंट करंडक जिंकला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवर अपेक्षित यश मिळत नव्हते. त्यासाठी विदर्भाने व्यावसायिक खेळाडूंचा आधार घेतला आणि चित्र बदलू लागले. खेळाडूंच्या जोडीला चंद्रकांत पंडित यांची प्रशिक्षकपदी नियुक्‍ती झाली. खेळाडूंनीही त्यांना योग्य साथ दिली आणि नववर्षाची अविस्मरणीय भेट विदर्भाला मिळाली. आता पुढे काय, असा प्रश्‍न उभा ठाकला आहे. या विजेतेपदाचा सकारात्मक दीर्घ परिणाम विदर्भ क्रिकेटवर होईल. विशेषतः नागपूरवगळता विदर्भातील इतर जिल्ह्यांत क्रिकेटला आणखी पोषक वातावरण निर्माण होईल. जास्तीत जास्त खेळाडू येतील, स्पर्धा वाढेल आणि त्यातून दर्जेदार खेळाडू विदर्भाला मिळतील. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनाही जोमाने कार्य करण्यास हुरूप येईल. या खेळाडूंनी विदर्भाची विजयी पताका फडकावली आहे, आता यापैकी काहींना ‘इंडिया कलर’ मिळाला, तर ‘सोने पे सुहागा’!

Web Title: editorial ranji trophy 2018 win vidarbha