झेंडा! (ढिंग टांग)

- ब्रिटिश नंदी
बुधवार, 17 ऑगस्ट 2016

बेटा : (नेहमीच्या बालसुलभ उत्साहाने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण! मम्मा आयॅम बॅक!

मम्मामॅडम : (खुर्चीत बसल्या बसल्याच) आलाससुद्धा इतक्‍यात? आलाच आहेस तर लग्गेच-

बेटा : (पाय आपटत) नाय नो नेव्हर! मी पुन्हा आंघोळ, दाढी, ब्रेकफास्ट करणार नाही!

मम्मामॅडम : (समजूत घालत) बेटा, पण-

बेटा : (संतापाने) नो म्हंजे नोऽऽऽय!! गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच सक्‍काळी उठून आंघोळबिंघोळ आटोपून आपल्या पक्षाच्या मुख्यालयात झेंडावंदनाला गेलो! मस्त पांढरीशुभ्र टोपीबिपी घालून! मी अहमद अंकलना म्हटलंही होतं, की ह्या टोपीवर ‘मैं हूं बेटा’ असं लिहून द्या म्हणून!

बेटा : (नेहमीच्या बालसुलभ उत्साहाने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण! मम्मा आयॅम बॅक!

मम्मामॅडम : (खुर्चीत बसल्या बसल्याच) आलाससुद्धा इतक्‍यात? आलाच आहेस तर लग्गेच-

बेटा : (पाय आपटत) नाय नो नेव्हर! मी पुन्हा आंघोळ, दाढी, ब्रेकफास्ट करणार नाही!

मम्मामॅडम : (समजूत घालत) बेटा, पण-

बेटा : (संतापाने) नो म्हंजे नोऽऽऽय!! गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच सक्‍काळी उठून आंघोळबिंघोळ आटोपून आपल्या पक्षाच्या मुख्यालयात झेंडावंदनाला गेलो! मस्त पांढरीशुभ्र टोपीबिपी घालून! मी अहमद अंकलना म्हटलंही होतं, की ह्या टोपीवर ‘मैं हूं बेटा’ असं लिहून द्या म्हणून!

मम्मामॅडम : (धक्‍का बसून) तुला ही आम आदमीची बंडल आयडिया का सुचली? नशीब अहमद अंकलनी लिहून नाही दिलं!

बेटा : (आंगठा दाखवत) त्यांच्याकडे पेनच नव्हतं मुळी! म्हंजे त्यांनी असं सांगितलं! ते काहीही असो, तुझ्यामुळे मला ऑलरेडी लौकर उठून आवरावं लागलं आहे! तू झेंडावंदनाला येणार नाहीस, म्हणून मला जावं लागलं! मोतीलाल व्होरा अंकल म्हणाले, की मॅडमजींचा खांदा दुखावला आहे... आम्ही काँग्रेसजनांनी कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचं?

मम्मामॅडम : (किंचित थकलेल्या आवाजात) बेटा, अजून तितकंसं बरं वाटत नाही रे! गेली तीनेक वर्ष मीच करत होते ना झेंडावंदन? बाकी कार्यक्रम कसा झाला?

बेटा : कसा होणार? मी स्वत: होतो, त्यामुळे टॉपच झाला! सकाळी अहमद अंकल आले आणि त्यांनी झोपेतून उठवलं! ॲक्‍चुअली मी घड्याळाचा अलार्मच लावला होता! 

मम्मामॅडम : (प्रश्‍नार्थक) मग?

बेटा : (खुलासा करत) आय मीन अहमद अंकलच्या घरच्या घड्याळाचा अलार्म लावला होता! त्यांनी अलार्म ऐकून उठायचं, मग मला उठवायचं, अशीच मॅनेजमेंट होती! मी मनमोहन अंकलना उठवणार होतो! पण सगळ्यांच्या आधी ते झेंडावंदनाला हजर होते! मम्मा, मी तिथे मुलांना मिठाईसुद्धा वाटली!

मम्मामॅडम : (समाधानाने) बरं केलंस! त्या गरीब, किसान मजदूरांच्या मुलांना तरी कधी मिळणार मिठाई खायला!

बेटा : (निरागसपणाने) मी स्वत: एकच तुकडा खाल्ला! आणखी एक खाणार होतो, पण माझ्या हातातल्या बॉक्‍समधली मिठाई मनमोहन अंकलनी परस्पर उचलून गरीब मुलांना दिली!! म्हणाले, तेवढं तरी श्रेय मला मिळू दे! माझ्याच सगळ्या योजना हे मोदीजी त्यांच्या म्हणून राबवतायत!! खरं आहे का मम्मा?

मम्मामॅडम : (संताप आवरत) त्या व्यक्‍तीचं नावसुद्धा माझ्यासमोर उच्चारायचं नाही, अशी ताकीद होती माझी! विसरलास? 

बेटा : (दुर्लक्ष करत) मम्मा, काल तू पीएम अंकलचं भाषण ऐकलंस?

मम्मामॅडम : (नाक मुरडत) ऐकलं... थोडं थोडं! मला त्या विषयावर बोलायचं नाहीए!

बेटा : (पुन्हा दुर्लक्ष!) आपल्या मुख्यालयात मी आपल्या कार्यकर्त्यांना हाच प्रश्‍न विचारला होता! सगळे म्हणाले की फार वाईट भाषण होतं! तुम्ही केलं असतंत तर ग्रेट झालं असतं!

मम्मामॅडम : (कडवट सुरात) हे सांगायला कार्यकर्ते कशाला हवेत? देवच बोललाय!

बेटा : (इंटलेक्‍चुअल चेहरा करून) मी त्यांना सांगितलं की पीएमच्या भाषणाचं आत्ताच्या आत्ता विश्‍लेषण करा! अंबिका आंटी, मनमोहन अंकल, अहमद अंकल  सगळ्यांनी नावं ठेवली! मग आनंद शर्मा म्हणून कोणतरी बोलायला उभे राहिले-त्यांनी एकेका वाक्‍याचं विश्‍लेषण केलं!

मम्मामॅडम : (उजळलेल्या चेहऱ्यानं) आनंद शर्मा अगदी हुश्‍शार आहे हं! ऐकलंस ना त्याचं म्हणणं?

बेटा : (बेदखलपणे) छे! मला बहुधा डुलकी लागली! मम्मा, पुढच्या वर्षी तूच जा झेंडावंदनाला!!

मम्मामॅडम : (निक्षून) अंहं! तुलाच जावं लागणार!

बेटा : (वैतागून) बट व्हाय मम्मा! सकाळी लौकर उठायचं! झेंडा फडकवायचा! मग ही असली भाषणं ऐकायची! ह्या:!!

मम्मामॅडम : (चलाखीने तिढा टाकत)...मग प्रियांकादीदीला पाठवू? चालेल?

 

Web Title: flag

टॅग्स