हॅप्पीवाला मराठी डे..!  (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके १९३८ फाल्गुन शुक्‍ल प्रतिपदा.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : आय लव्ह मराठी!

नमो नम: नमो नम: नमो नम: (१०५ वेळा लिहिणे) सकाळी उठलो. उठल्या उठल्या आरशासमोर उभे राहून स्वत:लाच ‘शुभ प्रभात’ असे अभीष्ट चिंतिले. आज मराठी भाषा दिन! आज सगळ्यांशी मराठीत बोलायचे ठरवले आहे. तशा मला बऱ्याच भाषा येतात. हिंदी, इंग्रजी, मराठी, वऱ्हाडी...जागा आणि माणूस पाहून मी भाषा बदलतो. हल्ली तर गुजरातीसुद्धा थोडुथोडु यायला लागली आहे. पुढच्या निवडणुकांपर्यंत मी नक्‍की गुजरातीत अस्खलित बोलू लागीन. असो.

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके १९३८ फाल्गुन शुक्‍ल प्रतिपदा.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : आय लव्ह मराठी!

नमो नम: नमो नम: नमो नम: (१०५ वेळा लिहिणे) सकाळी उठलो. उठल्या उठल्या आरशासमोर उभे राहून स्वत:लाच ‘शुभ प्रभात’ असे अभीष्ट चिंतिले. आज मराठी भाषा दिन! आज सगळ्यांशी मराठीत बोलायचे ठरवले आहे. तशा मला बऱ्याच भाषा येतात. हिंदी, इंग्रजी, मराठी, वऱ्हाडी...जागा आणि माणूस पाहून मी भाषा बदलतो. हल्ली तर गुजरातीसुद्धा थोडुथोडु यायला लागली आहे. पुढच्या निवडणुकांपर्यंत मी नक्‍की गुजरातीत अस्खलित बोलू लागीन. असो.

आंघोळबिंघोळ करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री थेट सैपाकघरात गेले. पण तेथे सौभाग्यवती सैपाकाच्या ओट्याशी उभ्या होत्या. त्यांनी भिवया उडवून ‘काय हवाय?’ असे विचारले. ‘‘हवे आहे मुंबईचे महापौरपद...देणार आहात का?’ असे सांगणार होतो. पण जीभ आणि मन दोन्ही आवरले. म्हटले, ‘हो’ म्हणाल्या तर काय घ्या? शिवाय त्यांच्या हातात झारा होता. 

‘‘न्याहारीला काय आहे?,’’ मी.

‘‘न्याहारीचं माहीत नाही, पण ब्रेकफास्टला टेम्पर्ड फ्राइड राइस केला आहे!,’’ सौ. म्हणाल्या. टेम्पर्ड फ्राइड राइस? ही काय नवीन भानगड? पण तेवढ्यात ट्यूब पेटली. फोडणीचा भात!! हात्तिच्या!! मग त्यांना ‘हॅप्पी मराठी डे’ म्हटले. त्यांनी ‘सेम्टुयू’ असे पुटपुटून आमच्या विशेस रिटर्न केल्या.  

दोन बश्‍या फोडणीचा भात चेपून मुख्यमंत्री मंत्रालयात आले. आल्या आल्या समोर कोण भेटावे? आपले विनोदवीर तावडेजी! आज मराठी भाषा दिन असल्याने आजचा दिवस आपणच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत होते. मला म्हणाले, ‘‘आफ्टर ऑल मराठी लॅंग्वेज शाळांमधून कंपल्सरी केली पाहिजे. मदरटंग ऑप्शनल कशी काय असू शकते? आय बेग टु डिफर...मराठी कंपल्सरी, आणि वऱ्हाडी ऑप्शनल असं ॲक्‍चुअली असलं पाहिजेलाय!’’ मी काही बोललो नाही. उगीच क्षीण हसलो. शिक्षण खात्याच्या माणसांचा हा एक प्रॉब्लेमच असतो. काहीही सांस्कृतिक घडामोड असली की हे लोक हक्‍काने घुसतात. ‘संध्याकाळी गेटवेवर या’ असे सांगून ते तरंगतच निघून गेले. लिफ्टमध्ये शेलारमामा भेटले. आमच्याकडे बघून हसले. मीही हसलो. ते पुन्हा हसले. मी मोठ्यांदा हसलो. त्यांनी टाळी मागितली. मी दिली!! एवढेच घडले, पण... बाहेर पडल्यावर पत्रकारांना (निवडक हं!) ते सांगत होते की ‘मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. काहीही झालं तरी आम्ही त्या कांग्रेसवाल्यांशी हातमिळवणी करणार नाही.’ आणखी पुढे ते सांगू लागले की ‘‘काहीही झालं तरी मुंबईचा महापौर आमचाच असेल. तसं मुख्यमंत्र्यांनीच ठरवलं आहे. वेळ आली की तुम्हाला आमचा बेत कळेलच!’’ वगैरे. कसला बेत नि कसले काय!! ह्यातले मी काहीही अजून ठरवलेले नाही, एवढेच सत्य आहे. 

भाषा दिनाच्या निमित्ताने आमचे परममित्र श्रीमान उधोजी ह्यांना फोन लावला. ‘इस रुट की सभी लाइनें व्यस्त है’ असे एक राजकीय वाक्‍य ऐकू आले. शेवटी त्यांना व्हाट्‌सॲपवर ‘हॅप्पी मराठी डे!’ असा मेसेज पाठवला. त्यावर त्यांनी अंगठा उंचावलेली खूण असते, ती पाठवली. आता ती ‘चीअर्स’ची खूण आहे की ठेंगा दाखवताहेत, कसे कळणार? जाऊ दे. तोच मेसेज मग त्यांच्या दादरच्या चुलतबंधूंकडे पाठवला. त्यांनी उत्तरादाखल दात विचकणारी स्माइली पाठवली. पुन्हा म्हटले जाऊ दे!! जे काही होईल ते मुंबई पालिका सभागृहातच होईल. आता पुढचे काही दिवस मुंबईतच ठाण मांडून बसणार आहे. जरा नागपूरला गेलो की इथे काहीतरी घोळ होणार, हे ठरलेले आहे. काहीही झाले तरी मुंबईचा महापौर हातात कमळाचे फूल घेऊन सभागृहात आलेला मला बघायचा आहे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. हातात कमळाचे फूल ‘मस्ट’ आहे!! जय महाराष्ट्र.

Web Title: happywala marathi day