ढिंग टांग : शिमग्याच्या नावानं...!

महाराष्ट्रात जो राजकीय शिमगा सुरु आहे तो पाहता वेगळ्या शुभेच्छा देण्याची गरज नाही
holi festival 2023 political holi maharashtra politics election
holi festival 2023 political holi maharashtra politics election sakal
Summary

महाराष्ट्रात जो राजकीय शिमगा सुरु आहे तो पाहता वेगळ्या शुभेच्छा देण्याची गरज नाही

प्रि य मित्रवर्य मा. रा. दादासाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम, सर्वप्रथम तुम्हाला होलिकोत्सवाच्या अनेक शुभेच्छा. होळीच्या शुभेच्छा वेगळ्या शब्दात द्यायच्या असतात, हे मला ठाऊक आहे. परंतु, गेले काही महिने महाराष्ट्रात जो राजकीय शिमगा सुरु आहे तो पाहता वेगळ्या शुभेच्छा देण्याची गरज नाही, असे मला वाटते.

holi festival 2023 political holi maharashtra politics election
Sharad Pawar : औरंगजेब फोटो प्रकरणी चौघांवर गुन्हा; शरद पवार म्हणाले, तो फोटो औरंगजेबाचा कशावरून?

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या अतिशय गढूळ झाले आहे. हवेत विखार भरुन राहिला आहे. मोटारीतून जाताना नुसती काच खाली केली तरी या राज्यात शिमगा सुरु असल्याचे सहज कळते! असो. राजकीय कटुता कमी करण्यासाठी मी, म्हणजे नानासाहेबांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मध्यंतरी होत होती. होलिकोत्सवाच्या निमित्ताने त्या दिशेने काही करता येते का, हे पाहण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.

holi festival 2023 political holi maharashtra politics election
Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या झळकलेल्या पोस्टर्सबाबत पवारांनी केला खुलासा

हल्ली जो उठतो तो दणादण तोंडाला येईल त्या लाखोल्या (आम्हाला) वाहताना दिसतो. कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने तोंड उघडले की शिमगा सुरु होतो. त्याचे तोंड मिटले की दुसरा सुरु करतो, आणि त्याचा शिमगा आटोपेपर्यंत तिसरा सुरु होतो! गेले काही महिने हे असेच चालू आहे. रेडा काय, खोकी काय, गद्दार काय…

आमचे माजी मित्र मा.राऊतसाहेब तर बारमाही शिमगा करत हिंडत आहेत. त्यांनी तर अगदी हद्दच केली आहे. रात्रीच्या सुमारास होळ्या पेटवण्याची प्रथा आहे. हे राऊतमहाशय सकाळी नऊ-दहा वाजताच होळी पेटवतात! असे किती दिवस चालणार?

holi festival 2023 political holi maharashtra politics election
Sushma Andhare यांची Raj Thackeray, Devendra Fadnavis सह Eknath Shinde वर हल्लाबोल

आपण साऱ्या पक्षाच्या नेत्यांनी मिळून निदान एक दिवस तरी सौजन्य दिवस पाळावा, आणि तो होळीचा असावा, असे वाटते. त्या दिवशी एकमेकांशी सौहार्दाने बोलावे, मग वर्षभर शिमगा सुरु ठेवता येईल! हे सहज शक्य होईल, पण तुमचे नवे मित्र मा. उधोजीसाहेब आणि त्यांचे शिलेदार राऊतसाहेब यांना कोणी पटवून द्यावे? ते माझा (अजूनही) फोन घेत नाहीत. तुम्ही हे काम कराल का? या कामाचे थोडे क्रेडिट तुम्हालाही मिळेल. नाहीतरी हल्ली तुम्ही त्यांचे प्रवक्ते असल्यासारखेच बोलत असता. कळवा!

holi festival 2023 political holi maharashtra politics election
Uddhav Thackeray: खेडमध्ये पोहचताच उद्धव ठाकरेंची नारळाने काढली दृष्ट

आपला पहाटेचा मित्र. नानासाहेब फ.

मा. उधोजीसाहेब, सर्वपक्षीय कटुता टाळण्यासाठी तुमचे माजी मित्र नानासाहेबांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. गेले काही दिवस तुम्ही त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना ज्या लाखोल्या वाहात आहात, त्या बंद व्हाव्यात म्हणून त्यांनी ही नवी खेळी केली असावी, असा अंदाज आहे. होळीचा एक दिवस आपण साऱ्यांनी मौनव्रत पाळून बारमाही शिमगा सुरु ठेवावा, अशी त्यांची सूचना आहे. तुमचे मत काय? कळावे. तुमच्या मताला महाविकास आघाडीचा विरोध असणार नाही. खात्री बाळगा.

आपलाच दादासाहेब (बारामतीकर)

प्रिय दादासाहेब, जय महाराष्ट्र! त्या नानासाहेबांच्या नादाला कृपा करुन (पुन्हा) लागू नका! अतिशय घातकी गृहस्थ आहे. माझी काय अवस्था केली आहे, पाहता आहात ना? कुणाला खड्ड्यात ढकलले तर पडणारा मनुष्य काय मंगलाष्टकं म्हणणार आहे का? तो शिमगा करणारच. एक दिवसाचे मौनव्रत वगैरे सब झूठ आहे. ही धूळफेक आहे. आपला आवाज दाबण्यासाठी केलेली खेळी आहे !

सर्वपक्षीय शिमगा असाच चालू राहावा, किंबहुना होळीच्या दिवशी तर मी जास्त जोरात शिमगा करणार आहे. तशा सूचना आमच्या (उरल्या सुरल्या) कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. सर्वपक्षीय कटुता टाळायची असेल तर आधी गद्दारांची गादी आणि खोके काढून घ्या. मगच कटुता कमी करण्याचे बघता येईल. तुम्ही तर यामध्ये बिलकुल न पडणे. कळावे.

आपला उधोजीसाहेब (सध्या : मातोश्री)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com