विजयाची मालिका (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

भारतीय क्रिकेट संघाचा विजयी अश्‍व आता चौखूर उधळला आहे. किमान मायदेशात तरी त्याला अडविण्याची हिंमत कुणी करणार नाही. कर्णधार विराट कोहली आणि त्याची सेना एक नाही, दोन नाही, तर सलग अठरा कसोटी सामन्यांत अपराजित राहिली आहे. आतापर्यंत वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अशाच संघांची विजयी मालिकेची कहाणी क्रिकेटविश्‍वात सांगितली जात होती. पण, आता यात भारताचेही नाव घेतले जाईल. मोहंमद अजहरुद्दीनने सर्वप्रथम भारतीय संघाला विजयाचा विश्‍वास दिला. त्यानंतर सौरभ गांगुलीने त्या विश्‍वासाचे आत्मविश्‍वासात रूपांतर केले. पुढे महेंद्रसिंह धोनी आणि आता विराट कोहलीने त्यावर कळस चढवला.

भारतीय क्रिकेट संघाचा विजयी अश्‍व आता चौखूर उधळला आहे. किमान मायदेशात तरी त्याला अडविण्याची हिंमत कुणी करणार नाही. कर्णधार विराट कोहली आणि त्याची सेना एक नाही, दोन नाही, तर सलग अठरा कसोटी सामन्यांत अपराजित राहिली आहे. आतापर्यंत वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अशाच संघांची विजयी मालिकेची कहाणी क्रिकेटविश्‍वात सांगितली जात होती. पण, आता यात भारताचेही नाव घेतले जाईल. मोहंमद अजहरुद्दीनने सर्वप्रथम भारतीय संघाला विजयाचा विश्‍वास दिला. त्यानंतर सौरभ गांगुलीने त्या विश्‍वासाचे आत्मविश्‍वासात रूपांतर केले. पुढे महेंद्रसिंह धोनी आणि आता विराट कोहलीने त्यावर कळस चढवला. सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी आणि गुंडप्पा विश्‍वनाथ यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली भारतीय संघाने २० कसोटींत अपराजित राहण्याची कामगिरी केली होती. मात्र, यात विजयापेक्षा अनिर्णित सामन्यांचा अधिक समावेश होता. विराट सेनेने मात्र १८ अपराजित कसोटीत १४ विजय मिळविले आहेत. हाच सर्वांत मोठा फरक त्या वेळच्या आणि आताचा भारतीय संघ यांच्यात दिसून येतो. 

इंग्लंडविरुद्ध संपलेल्या मालिकेत भारताने ४-० असा विजय मिळविला. या मालिकेने भारतीय संघाकडून विक्रमाची शिखरे उभारली गेली. विराट कोहलीचे फलंदाजीतील सातत्य, अश्‍विन, रवींद्र जडेजा यांनी फिरकी गोलंदाजीत दाखवलेला ‘खडूसपणा’ आणि आक्रमकता क्रिकेटप्रेमींच्या नक्कीच लक्षात राहील. दमदार सलामीच्या जोडीचा प्रश्‍न सोडला, तर या मालिकेने भारताला खूप काही दिले. लोकेश राहुल, करुण नायर या उदयोन्मुख खेळाडूंनी संधीचा फायदा उठवला. त्यामुळे भारतीय संघात मधल्या फळीत आता भक्कम पर्याय आहेत. पूर्वपुण्याईवर संघात स्थान टिकवणे पूर्वीइतके सोपे नाही. करुण नायरच्या फलंदाजीमुळे निवड समितीची डोकेदुखी वाढणार आहे. अश्‍विन, जडेजा आणि जयंत यादव यांच्या रूपाने धावा करणारे गोलंदाजही मिळाले आहेत. पार्थिव पटेलनेही आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय जिंकले अशी चर्चा होईलही. पण, मग चेन्नई कसोटीचे काय? धावांचा रतीब घालणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडचा दुसरा डाव शतकी सलामीनंतरही कोसळला. त्यामुळेच विराट सेनेचे हे यश विसरून चालणार नाही. विराट सेनेचा हा विजयरथ आता परदेशातही दौडावा, अशीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे.

Web Title: india win series