RTO Rules- घरबसल्या चेक करा E-Challan स्टेटस, वेळेत दंड भरा नाहीतर... | How to Check Traffic E-Challan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How to Check Traffic E-Challan

Traffic E-Challan: घरबसल्या चेक करा ई-चलन स्टेटस, वेळेत दंड भरा नाहीतर...

अलिकडे वाहतूक पोलिस चांगलेच सतर्क झाले आहेत. जवळपास प्रत्येक चौकात तुम्हाला एक तरी वाहतूक पोलिस कर्मचारी Traffic Police दिसून येईल.

एवढचं नव्हे तर नियम तोडणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता अनेक सिग्नलवर तसंच महामार्गांवर ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. Know How to Check and pay traffic E challan

अनेकांकडून न कळत नियम Rules तोडले जातात. तुमचा कडून एखाद्या नियमाचं उल्लंघन झालं असेल तर आता तुम्हाला थेट इ-चलनच्या रुपात दंड Fine आकारला जातो. बऱ्याचदा अनेकांना ई-चलन लागल्याची कल्पनादेखील नसते.

जेव्हा ई-चलन E-Challan लागल्याचा मेसेज येतो तेव्हा आपल्याला धक्का बसतो. तुम्हाला नेमकं चलन कधी आणि कोणत्या कारणासाठी लागलं आहे हे तपासता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत. 

घरबसल्याच तुम्ही ई-चलनचं स्टेटस चेक करू शकता तसचं तुम्हाला लागलेला दंड देखील भरू शकता. त्यासाठी तुम्हाला पोलिस स्टेशन किंवा परिवहन कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. 

चलान स्टेटस असं करा चेक

- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल.

- यानंतर वेबसाइटवरील Check Challan Status या पर्यायावर क्लिक करा. 

- तुम्हाला स्क्रिनवर चलान नंबर, वाहन नंहर आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबरचा पर्याय दिसेल.

- इथं वाहन नंबरच्या पर्यायावर क्लिक करा.

- इथं गाडीचा रजिस्टेशन नंबर टाका.

- त्यानंतर कॅप्चा कोड भरा.

- त्यानंतर 'Get Detail' या पर्यायावर क्लिक करा.

- यानंतर तुम्हाला चलान निघालं आहे कि नाही हे कळू शकेल,. 

याच वेबसाइटवरून तुम्ही ऑनलाइन ई-चलान भरू शकता. 

हे देखिल वाचा-

E-Challan कसं भराल

- याच वेबसाइटवरील पे नाऊ Pay Now' या पर्यायावर क्लिक करा.

- तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल.

- त्यानंतर तुमच्या राज्याची ई-चलन पेमेंट वेबसाइट ओपन होईल. 

- Next ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पेजवर पेमेंट कंफर्मेशनचं पेज ओपन होईल.

- त्यानंतर Proceed या ऑप्शनवर क्लिक करा.

- तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगच्या मदतीने पेमेंट करू शकता. 

- पेमेंट करताच तुमचं चलान भरलं जाईल. 

ई-चलान वेळेवर भरणं आवश्यक आहे.नाहीतर त्यामुळे तुमचं नुकसान होवू शकतं. कारण तुम्ही जेवढे नियम मोडले असतील तेवढे ई-चलान हे तुमच्या नावे कापले गेलेले असतील. जे भरणं तुम्हाला बंधनकारक आहे. हे ई-चलान दिर्घकाळ न भरल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होवू शकते. 

टॅग्स :rtotraffice police