राज आणि नीती : उपरती की अगतिकता?

भारत-पाकिस्तान सीमेवरील शांततेच्या प्रयत्नांचे संग्रहित छायाचित्र.
भारत-पाकिस्तान सीमेवरील शांततेच्या प्रयत्नांचे संग्रहित छायाचित्र.

अमेरिका, चीन आणि रशिया या त्रिकोणातून पाश्‍चात्यांबरोबर राहाताना मोठी किंमत मोजलेल्या पाकिस्तानला आर्थिक दुबळेपण आले आहे. त्यातून स्वतःला सावरण्यासाठी तो प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. 

पीपल्स लिबरेशन आर्मी (चीन) आणि भारत यांच्यातील लष्कर मागे घेण्याची प्रक्रिया प्याँगयाँग सरोवर आणि परिसरातून संपत आली आहे. इतर भागातील माघारीची प्रक्रिया चीनच्या अनुत्सुकतेमुळे थांबलेली आहे. असे असताना, चीन आणि भारत यांच्यातील पेचाचा फायदा पाकिस्तान का उठवत नाही, असा मूलभूत प्रश्न पडत आहे. खरे तर पाकिस्तानच्या लष्करातील अधिकारी आणि चिनी लष्कर यांचे संबंध अगदी ऐतिहासिक आहेत, जितके पाकिस्तानी लष्कर आणि अमेरिकेतील लष्करी अधिकारी यांच्यातील आहेत. अमेरिका आणि चीन दोघांशीही संबंध चांगले राखण्यात पाकिस्तान यशस्वी ठरलेले आहे. १९५४आणि १९५६मध्ये अनुक्रमे, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सीएटो (साऊथ ईस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन) आणि सेन्टो (सेंट्रल ट्रिटी ऑर्गनायझेशन) यांचा पाकिस्तान सदस्य होता. त्याचवेळी दुसरीकडे चीन-पाकिस्तान सीमा करारानुसार, १९६३मध्ये पाकिस्तानने साक्‍शागम खोरे चीनला देऊ केले होते.

जर कोणाला आठवत असेल तर, पाकिस्तानने, खरे तर जनरल याह्याखान यांनीच अमेरिकेचे मंत्री हेन्री किसींजर यांची १९७१मधील चीन भेट घडवून आणलेली होती. आणखी रंजक बाब ही की, तत्कालीन सोव्हिएट रशियावर हेरगिरी करणारी अमेरिकेची यू-२ ही विमाने पाकिस्तानच्या तत्कालीन वायव्य सरहद्द प्रांतातील बडाबेर येथील तळावरून उड्डाण घ्यायची. हे सगळे घडत होते तेव्हा सोव्हिएट रशिया आणि चीन हे एकमेकांचे मित्र होते, ते अगदी १९६०च्या मध्याला या दोन देशात कटुता निर्माण झाली तोपर्यंत.

काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसे पाकिस्तान आणि चीन यांच्यातील सख्य अधिकाधिक घट्ट होत गेले. ते राजकीय, आर्थिक आणि साहजिकच व्यूहरचनात्मक बाबीतही घट्ट झाले. अमेरिकेवरील अवलंबित्व जसजसे घटले तसतसे चीनवरील अधिकाधिक विस्तारत गेले. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरने (सीपीइसी) उभा आडवा पाकिस्तान व्यापलाय. त्याने पाकिस्तानची चीनशी नाळ इतकी बांधली आहे की, सोडवू म्हटले तरी सुटणार नाही. पाकिस्तानवरील १५टक्के कर्ज म्हणजे, १७.१अब्ज डॉलर (पाकिस्तानच्या जीडीपीच्या ६.१५टक्के) एवढे एकट्या चीनमधून आलेले आहे. भविष्यात ग्वादर हे दुसरे हमनबनोटा होऊन पाकिस्तानही श्रीलंकेच्या वाटेने जावू शकते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेली चार दशके पाकिस्तान भारताविरोधात छुपे युद्ध लढत आहे. ऑगस्ट २०१९मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी किंवा भारतीय जनता पक्षाने जम्मू आणि काश्‍मीरच्या प्रशासकीय रचनेत बदल केल्यानंतर ते अधिक धारदार झाले. तथापि, एप्रिल २०२०मध्ये चीन आणि भारत यांच्यात सीमावर्ती भागात तणाव निर्माण झाल्यानंतर अगदी अनपेक्षितरित्या शांतता स्थापित झाली आहे. 

पाकिस्तान शांत का?
या शांततेबाबत विविध पद्धतीने मांडणी केली जात असली तरी पाकिस्तानच्या अशा वर्तनबदलाबाबत विश्वासार्ह स्पष्टीकरण काही मिळत नाही. असे मत मांडले जाते की, पाश्‍चात्यांच्या दबावामुळे पाकिस्तानचे हात बांधलेले आहेत. तथापि, त्यात तितकासा अर्थ नाही. कारण पाश्‍चात्यांचा प्रभाव ओसरतोय. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारविरोधात २००१पासून पाश्‍चात्यांनी केलेल्या कारवायांबाबत पाकिस्तान अनुत्सुकच होते, त्याची केवळ मूकसंमतीच होती. पाकिस्तानच्या अफगाणिस्तानविषयक लवचिकतेला नऊ वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनचा अबोटाबाद येथे खात्मा केला, तेव्हा सुरूंग लागला होता. वस्तुस्थिती अशी आहे की, दोहा येथे अमेरिकी प्रशासन आणि तालिबानी यांच्यात चर्चेची फेरी झाली, तेव्हा ती घडवण्यामागे पाकिस्तानच होता, यातून पाकिस्तानचे तालिबानींशी असलेले वर्षानुवर्षांचे लागेबांधे आणि कायमची जवळीक पुन्हा सिद्ध होते. पाश्‍चात्य देश पाकिस्तानचा वापर करू पाहात असतानाच, त्याचा अन्य कोणी वापर करतंय हेही दिसते. पाकिस्तानवर २०१६मध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९मध्ये बालाकोटच्या जब्बा टॉपवर केलेला हवाई हल्ला यामुळे पाकिस्तानवर चांगला परिणाम झाला, असेही काहीजण प्रतिपादन करतात. तथापि, वस्तुस्थिती अशी आहे, की पाकिस्तानने केवळ त्याची कबुली दिली आहे. एक प्रशंसनीय कारण इतकेच की, चीनने पाकिस्तानला त्याबाबत तोंड उघडू दिले नसेल. पाकिस्तानच्या सहभागाने परिस्थिती अधिकच अस्थिर आणि गुंतागुंतीची झाली असती. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना, चीनने भारतीय भूभागावर घुसखोरी का केली, याचे उत्तर व्यूहरचनातज्ञ देऊ शकलेले नाहीत.  

याच स्तंभात गेल्यावेळी मी त्रिसूत्रीद्वारे त्याची कारणे मांडलेली होती. चीनने दक्षिण चीन समुद्रात नवीन प्रशासकीय जिल्ह्यांची रचना जाहीर केली, हाँगकाँगच्या राजकीय सार्वभौमत्वावर अंकुश आणला आणि पूर्व लडाखमध्ये आपले सैन्य घुसवून भारत-चीन सीमेवरील वातावरण तापवले, यामागे व्यापक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कोरोनाच्या प्रसाराबाबत बेजबाबदारपणा दाखवला, हा मुद्दा पुढे करून जर चीनला जबाबदार धरले जाणार असेल, तर चीन त्याला अत्यंत प्रखरपणे उत्तर देईल, असे दाखवून द्यायचे होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे भारताने हातात घेण्याआधी बरोबर एक महिना भारतीय भूप्रदेशात चीनने घुसखोरी केलेली आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. घोंगावत असलेल्या वाऱ्याचा ग्रामीण, दूरस्थ आणि गोठविणाऱ्या थंडीचा प्रदेश बळकावण्यासाठी ही घुसखोरी नव्हतीच मुळी. त्यामागे दुसराच कोणता तरी हेतू होता. जागतिक आरोग्य संघटनेने चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणूचा प्रसार होवू दिलेला नाही, अशी क्‍लिनचीट त्याला दिली, त्यानंतर दोनच दिवसांनी सैन्यमाघारीच्या प्रक्रियेला गती मिळाली. या संघटीत बाबीत पाकिस्तानलाही गृहीत धरले तर परिस्थिती आणखी गतीमान झाली असते, तर ते चीनलादेखील नियंत्रणाबाहेर गेले असते. 

अनुभवातून घेतले धडे
पाकिस्तानला काळाच्या ओघात असे काही दणके बसले आहेत, की त्यातून त्याने कोणीतरी भडकावले म्हणून कृती करून काहीही साधत नाही, हा धडा घेतलेला आहे. १९८० मधील अफगाण जिहादवेळी अमेरिका आणि पाश्‍चात्यांनी भरीस घातल्याने पाकिस्तान आघाडीवर होता, आणि त्या साहसवादाने पोळले गेल्याने त्याच्या पाकच्या जखमा आजही लाहीलाही करत आहेत. त्यामुळेच २००१पासून अफगाणिस्तानबाबत ते हातचे राखूनच सहभागी होताना दिसत आहेत. त्यातच आपले राष्ट्रीय हित सामावलंय, असे त्यांना वाटतंय. त्याचप्रमाणे चीन-पाकिस्तान संबंधही खूपशा ताणतणावाने भरलेले आहेत. तथापि, ते तुटेपर्यंत ताणले गेलेले नाहीत. चीनकडे राजकीय सार्वभौमत्व गहाण टाकल्याने आर्थिक अवलंबित्व आलेले आहे, याचीही पाकिस्तानला जाणीव आहे. भारताशी संबंध सुरळीत करून चीनबाबत काहीशा सुस्कारा मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. भारतातील व्यूहरचनात्मक बाबींच्या अभ्यासकांनी गेल्या नऊ महिन्यातील पाकिस्तानचे वर्तन आणि त्यासाठी ते करत असलेले प्रयत्न यांच्याकडे पारावरील गप्पांसारखे न पाहता त्यांचे गांभीर्यपूर्वक परिशीलन करावे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्या डायरेक्‍टर जनरल ऑफ मिलीटरी ऑपरेशन्सच्या चर्चेअंती, २५फेब्रुवारी २०२१रोजी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीच्या घटनेने वरील विधानाला उलट आणखी बळकटीच मिळते आहे. भारताच्या दृष्टीनेही ही स्वागतार्ह पावले आहेत. आर्थिक आव्हानांच्या स्थितीत उचललेली ही पावले महत्त्वाची अशीच आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com