शेअर बाजार पडला; मग भाजप जिंकल्यावर पुन्हा उसळला!

शेअर बाजार पडला; मग भाजप जिंकल्यावर पुन्हा उसळला!

मुंबई: गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात नाटकीय चढ-उतार सुरु असून शेअर बाजाराने मोठा 'यू-टर्न' घेतला आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 800 अंशांची घसरण झाल्यांनतर बाजार पुन्हा तेजीत आहे.

सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात 32 हजार 595.63 अंशांची नीचांकी पातळी गाठली होती. आता बाजार सावरला असून 291 अंशांनी वधारला असून 33 हजार 754.71 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 92 अंशांनी वधारला आहे. निफ्टी 10 हजार 426.20 पातळीवर व्यवहार करतो आहे.

गुजरातमध्ये पुन्हा सत्ताधारी पक्ष असलेल्या 'भाजप'ला सत्ता मिळण्याची शक्यता असल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. गुजरातमध्ये मोदी लाट कायम असल्याने आर्थिक सुधारणांना आता आणखी जोर येणार असल्याचे बोलले जात आहे. एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा भाजपने स्पष्ट बहुमत दर्शविल्यानंतर सेन्सेक्सने वरच्या दिशेने वाट धरली आहे.

हेवीवेट स्टॉक असलेला एचडीएफसी बँकेचा शेअर १ टक्क्यांनी वधारला आहे. परिणामी निर्देशांकाला बळ मिळाले आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात एशियन पेंट्स, सन फार्मा आणि सिप्ला यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर भारती एअरटेल, कोल इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com