अठरा नक्षलवाद्यांना सुकमामध्ये अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जून 2017

रायपूर - एप्रिल महिन्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या 18 नक्षलवाद्यांना पोलिसांनी आज अटक केली.

रायपूर - एप्रिल महिन्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या 18 नक्षलवाद्यांना पोलिसांनी आज अटक केली.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या अठरा जणांपैकी पाच म्होरके आहेत. यातील काही जणांनी 2013 मध्येही पोलिसांच्या गस्ती पथकावर हल्ला केला होता. आज या सर्वांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आजच्या कारवाईमुळे या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या 47 झाली आहे. 24 एप्रिलला सीआरपीएफच्या 74 व्या बटालियनवर झालेल्या हल्ल्यात 25 जवान हुतात्मा झाले होते.

Web Title: naxal arrested marathi news raipur