पंढरपूरच्या लोटस स्कूलमध्ये जपानी 'यारोकी' पध्दतीचे गणित

अभय जोशी
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पंढरपूर: कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपूर संचलित लोटस इंग्लीश स्कूल मध्ये जपान मधील टोपान प्रिंटींग कंपनी लि. टोकिओच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. जपानी शाळांमधील विद्यार्थींच्या प्रमाणे या शाळेतील विद्यार्थ्यांकडून गणित सोडवण्यासाठी "यारोकी" पध्दतीचा अगदी सहजतेने वापर केला जात असल्याचे पाहून जपानी अधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले.

पंढरपूर: कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपूर संचलित लोटस इंग्लीश स्कूल मध्ये जपान मधील टोपान प्रिंटींग कंपनी लि. टोकिओच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. जपानी शाळांमधील विद्यार्थींच्या प्रमाणे या शाळेतील विद्यार्थ्यांकडून गणित सोडवण्यासाठी "यारोकी" पध्दतीचा अगदी सहजतेने वापर केला जात असल्याचे पाहून जपानी अधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले.

नोव्हेंबर महिन्यात लोटस इंग्लीश स्कूलने टोपान प्रिंटींग कंपनी लि.टोकिओ या कंपनी सोबत "यारोकी" या शैक्षणिक प्लॅटफॉर्मचा पायलट अभ्यास करण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. या पायलट प्रोजेक्‍टमुळे लोटस स्कूल मधील विद्यार्थ्यांना जपानी पध्दतीने गणित शिकण्याची संधी उपलब्ध झाली असून मुंबई वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील लोटस ही शाळा कंपनीने यासाठी निवडली आहे.

या प्रोजेक्‍ट मध्ये शिक्षक वर्गात टॅबद्वारे क्‍लासवर्क आणि होमवर्क देत आहेत. टॅब वरच प्रत्येक मुलाची प्रगती बघणे आणि त्यानुसार त्याला सल्ला देणे शक्‍य झाले आहे. या पायलट स्टडी प्रकल्पासाठी टोपान कंपनीने सर्व मुलांना व शिक्षकांना मोफत टॅब आणि यारोकी ऍप्लीकेशन दिले आहे.

कंपनीचे एक्‍झिकेटिव्ह जनरल मॅनेजर नावोकी किकुची, व्यवस्थापक कैजीरावो, सुपरवायझर नामिको शिन्हो, कन्सल्टंट फ्रॉम असेन्चर मसारु होरी तसेच इंडिया टेकच्या माधुरी सावंत यांनी शाळेत येऊन प्रोजेक्‍टच्या प्रगतीची पहाणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कंपनीने दिलेल्या टॅबचा वापर विद्यार्थी अगदी सहजतेने वापर करताना पाहून त्यांनी सर्व विद्यार्थींचे आणि शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. येथील विद्यार्थी आणि शिक्षकांकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला.

एक्‍झिकेटिव्ह जनरल मॅनेजर नावोकी किकुची यांनी "यारोकी" या शैक्षणिक प्लॅटफॉर्मचा वापर जपान मधील विद्यार्थ्यांच्या प्रमाणे या शाळेतील विद्यार्थी करत असल्याचे पाहून विद्यार्थी व व्यवस्थापनाचे कौतुक केले.

या पायलट स्टडीचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांची गणित विषयाबद्दल असलेली भिती दूर करण्यासाठी झाला असून सेल्फ लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण झाली असल्याचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष बी. डी. रोंगे, संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, उपाध्यक्ष एच.एम.बागल, कोषाध्यक्ष दादासाहेब रोंगे, लोटस इंग्लीश स्कूलच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी जपानी अधिकाऱ्यांचे स्वागत करुन त्यांना शाळेच्या प्रगतीची माहिती दिली.

Web Title: pandharpur news lotus school japan yaroki mathematics