न्यूनगंडावर मात

प्रा. राजा आकाश
गुरुवार, 28 मार्च 2019

‘मा झ्यात आत्मविश्‍वास नाही.’ ‘लहानसहान गोष्टींमुळे माझं मन विचलित होतं.’ ‘मी ॲबसेंट माईंडेड आहे.’ ‘अभ्यास करायचा म्हटलं की मला थकवा जाणवतो.’ ‘कुठल्याच गोष्टीवर मी दीर्घकाळ लक्ष केंद्रित करू शकत नाही.’ ‘मला काहीच जमत नाही.’ ‘मी कधीच कुठली गोष्ट लक्षात ठेवू शकत नाही.’ ‘माझा मूडच नसतो...’ अशाप्रकारची वाक्‍यं अनेकदा तुम्ही स्वत:बाबत वापरत असाल. ही आपल्या मेंदूला लागलेली वाईट सवय आहे. अशी सवय, ज्यावरून कुठलाही चांगला माणूस पाय घसरून पडू शकतो. या सवयी यश मिळवण्यात अडथळे आणतात. त्याच्या आठवण्याच्या मार्गात अडथळे आणतात. त्याच्या आठवण्याच्या, स्मरणशक्‍ती विकासाच्या मार्गात समस्या निर्माण करतात.

तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करत असता आणि मन मात्र भलत्याच विचारांत गुंतलेलं असतं. तुम्ही निराश होता, उदास होता, स्वत:ला हीन लेखायला लागता. परतपरत वरील वाक्‍यं मनाशी बोलत राहता. आणखी कन्फ्युज होता आणि अशा चक्रात अडकून राहता. आरशासमोर उभे राहा. स्वत:च्या डोळ्यांत डोळे घालून पाहा आणि स्वत:लाच सांगा, ‘‘आता मी या सवयीचा गुलाम राहणार नाही. मी या वाईट सवयींवर विजय मिळवेन’’ आणि लागा कामाला. या सवयीवर मात करण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपल्या अभ्यासाच्या, कामांचा ‘ॲक्‍शन प्लॅन’ बनविणं आणि त्याप्रमाणं कृती करणं. त्यावेळी तुमचा मूड आहे की नाही, हे महत्त्वाचं नाही. त्या वेळची तुमची इतर कामं महत्त्वाची नाहीत, तर केवळ ठरवलेलं कामच महत्त्वाचं आहे. रोज त्याच वेळेला ठरवलेलं काम, मग तो तुमचा अभ्यासही असू शकतो, तो करा आणि त्या ठराविक कालावधीला नाव द्या- ‘रिमेंबर’. हा झाला ‘की वर्ड’. आपल्याला स्मरणशक्‍ती वाढवायची आहे. कुठल्याही गोष्टींची आठवण ठेवण्यात यशस्वी व्हायचं आहे. तुम्ही ठरवलेल्या ‘रिमेंबर’ या कालावधीत ठरवलेलं काम मन लावून करा, ते आत्मसात करा.

आता दैनंदिन वेळापत्रकात आणखी एक वेगळी वेळ ठरवा. शक्‍यतोवर रात्री झोपण्यापूर्वी अथवा सकाळी जागं झाल्यानंतर या वेळेसाठी आपला दुसरा ‘की वर्ड’- रिफ्रेश. स्मरणशक्‍ती वाढवण्याची सवय विकसित करण्यासाठी तयार केलेला आणखी एक ‘की वर्ड’- ‘रिफ्रेश.’ झोपी जाण्यापूर्वी आपण ‘रिमेंबर’ या कालावधीत केलेल्या गोष्टी आठवा व झोपी जा. या गोष्टींची सवय विकसित झाल्यावर मनाची एकाग्रता वाढेल. अधिक चांगलं लक्षात राहील. तुम्ही तुमचा वेळ, शक्‍तीचा अधिक चांगला उपयोग करू शकाल. हा दैनंदिन प्लॅन नियमित वापरा. ‘मला जमणार नाही. मला शक्‍य नाही,’ असा विचार मुळीच करू नका. खरंच तुमच्या मनात तीव्र इच्छा असेल, स्वत:ची स्मरणशक्‍ती वाढावी, अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही निश्‍चित हे करू शकाल, नव्हे कराल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof raja aakash wirte pahatpawal aricle in editorial