आता कुठे जाशील टोळंभट्‌टा! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 
किती काळ धराल तग? 
शेवटी न्याय असतोच! 

सगळं काही आहे इथंच, 
आणि इथंच राहणार आहे 
"वर' काही न्यायचं नाही, 
खाली हाथ जायचं आहे 

तेवढंच खावं पाखरानं, 
जेवढं उचलेल चोच! 
कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 

संधी होती तेव्हा लेको 
खा खा खाल्लंत! 
उष्टंमाष्टं न पाहता 
नरड्यात ढकललंत! 

न खाऊंगा न खाने दूंगा 
यही है हमारी सोच 
कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 

कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 
किती काळ धराल तग? 
शेवटी न्याय असतोच! 

सगळं काही आहे इथंच, 
आणि इथंच राहणार आहे 
"वर' काही न्यायचं नाही, 
खाली हाथ जायचं आहे 

तेवढंच खावं पाखरानं, 
जेवढं उचलेल चोच! 
कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 

संधी होती तेव्हा लेको 
खा खा खाल्लंत! 
उष्टंमाष्टं न पाहता 
नरड्यात ढकललंत! 

न खाऊंगा न खाने दूंगा 
यही है हमारी सोच 
कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 

हमारा घी देखा लेकिन 
देखा नही बडगा 
बादशहाच्या हातात आता 
येणार आहे वाडगा! 

हीच तर आहे आपल्या 
लोकशाहीतली खोच 
कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 

पाची बोटं लोण्यात, 
आणि ताटात पंचपक्‍वान 
नशीब असेल जोरावर तर 
गध्दा होईल पेहेलवान 

चैन असते तेव्हा लेको, 
नसते कसलीच बोच 
कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 

साठ-सत्तर वर्षातली 
पुंजी जाईल वाया! 
खरं सांगा, पोट फुटस्तवर 
खाय के नहीं खाया? 

अजीर्णावर काहीतरी 
जालीम उपाय असतोच! 
कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 

आपलेच दात, आपलेच ओठ 
आपली भूक, आपले पोट 
हजारहस्ते देणाराचे 
लाखमोलाचे असते व्होट 

ज्याच्या हातात ससा आहे, 
खरा पारधी तोच! 
कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 

ताटातल्या पोळीवर तेव्हा 
ओढून घेतलंत तूप 
साखरेचं खाणाऱ्याला 
देव देई गपचूप 

तळ्याचा राखणदार शेवटी 
पाणी चाखतोच! 
कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 

सांग आता कुठे कुठे 
जाशील टोळंभट्‌टा 
सुरू होईल आता माझ्या 
जिभेचा दांडपट्‌टा 

दिवस फिरले की पाठीत 
नशिबाचा रट्‌टा बसतोच 
कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 

सब के दिन आते है, 
दिन बदलतात बर्खुर्दार! 
आज असेल शहजादा, पण 
उद्याचा निव्वळ नामदार! 

नशिबाच्या फाश्‍यांमागे 
शकुनीचा हात असतोच! 
कायद्याच्या कचाट्यातून 
कसे सुटता बघतोच! 

आज माझे दिवस आहेत, 
उद्याचं कुणी पाहिलंय? 
कुणाला माहीत भविष्यात 
काय वाढून ठेवलंय? 

तुझ्या पापाचा भरलाय घडा, 
तुला जन्माचा धडा शिकवतोच! 
कायद्याच्या कचाट्यातून तुम्हि 
कसे सुटता बघतोच! 
-ब्रिटिश नंदी 

Web Title: Pune Edition Editorial Article on Dhing Tang

टॅग्स