उगवते नेतृत्व

सारंग खानापूरकर
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनपेक्षित विजयाबरोबरच कॅलिफोर्नियामधून सिनेटर म्हणून निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (वय 52) यांनीही भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातच, त्यांच्यामध्ये अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याची क्षमता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने त्यांच्याविषयी भारतीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
कमला यांच्या आई भारतीय होत्या. कमला यांचा जन्म कॅलिफोर्नियामधील ऑकलंड येथे झाला.

हॉर्वर्ड विद्यापीठातून पदवी मिळविल्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायदा विषयात डॉक्‍टरेट मिळविली. निर्णयांवर शिक्कामोर्तब होत असलेल्या ठिकाणी काम करण्याची इच्छा असलेल्या कमला यांनी कॅलिफोर्नियाच्या अलमेडा कौंटीच्या डिस्ट्रिक्‍ट ऍटर्नी म्हणून कामास सुरवात केली. 2003 मध्ये त्यांनी सॅनफ्रान्सिस्कोचे डिस्ट्रिक्‍ट ऍटर्नीपद मिळविले. याच काळात कॅलिफोर्नियातील सर्वाधिक यशस्वी अशा शंभर वकिलांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. डिस्ट्रिक्‍ट ऍटर्नी म्हणून त्यांनी अंमली पदार्थ तस्करीत अडकलेल्या युवकांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या या पदावरील आठ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तीनशे तस्करांना मुख्य प्रवाहात आणले.

2010 मध्ये कॅलिफोर्नियाच्या ऍटर्नी जनरलपदासाठी त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळवत विजय मिळविला. या पदावरील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्ती बनल्या. हॅरिस यांनी लिहिलेल्या "स्मार्ट क्राइम' या पुस्तकातून त्यांनी विविध घटनांची मांडणी करत गुन्हे रोखण्यासाठीच्या उपायांवर चर्चा केली आहे. कॅलिफोर्नियामध्ये विविध पदांसाठी लढविलेल्या निवडणुकीमुळे एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांचे वारंवार कौतुक झाले आहे. कॅलिफोर्नियामधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर बार्बारा बॉक्‍सर यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर उमेदवारी जाहीर करणाऱ्या कमला या पहिल्या व्यक्ती होत्या. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी पक्षासाठी मोठा निधी उभारत सर्वांचा विश्‍वास संपादन केला. या महिन्यात झालेल्या अंतिम निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी सिनेटरपदापर्यंत मजल मारली आहे.
कमला या स्थलांतरितांच्या प्रश्‍नाबाबत संवेदनशील आहेत. अध्यक्षपदासाठी निवड झालेल्या ट्रम्प यांच्या निर्वासितविरोधी धोरणापासून नागरिकांचा बचाव करणे आपले कर्तव्य असल्याचे त्या मानतात. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शस्त्रविक्रीवर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्याचे त्यांनी समर्थन केले आहे. याशिवाय पर्यावरण, गर्भपात, आर्थिक गुन्हे आणि शिक्षण यासंबंधी त्यांनी विविध पातळ्यांवर घेतलेल्या निर्णयाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.

Web Title: rising leader kamala harris