अच्छी और बुरी खबर! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 26 मे 2017

"खाविंद, एक बुरी खबर आहे,
आणि दुसरी अच्छी...परवानगी असेल,
तर सुनावतो...,'' असे म्हणत
सिपाहसालार मजनू खानाने
तुकवली मान कमरेपर्यंत.

पुढ्यातील अंगूरांचा खात्मा करत
खाविंद म्हणाले, ""अच्छी खबर
आधी सुनव. क्‍यों की बुरी खबर
सुनाने के बाद तुझी जुबां
छाटून टाकणार आहे...बको!''

"खाविंद, एक बुरी खबर आहे,
आणि दुसरी अच्छी...परवानगी असेल,
तर सुनावतो...,'' असे म्हणत
सिपाहसालार मजनू खानाने
तुकवली मान कमरेपर्यंत.

पुढ्यातील अंगूरांचा खात्मा करत
खाविंद म्हणाले, ""अच्छी खबर
आधी सुनव. क्‍यों की बुरी खबर
सुनाने के बाद तुझी जुबां
छाटून टाकणार आहे...बको!''

मजनू खान म्हणाला, ""सूरज आणि चांद
ज्यांच्या आज्ञेबाहेर उगवू किंवा मावळू
शकत नाहीत, अशा शहंशाह ह्यांच्या
महलवर बगलवाल्या दुश्‍मनाने
हमला चढवला. महलच्या बाहेरील
आपल्या चौक्‍या उद्‌ध्वस्त करून
दरोदराज फोडून काढत त्यांनी
आपल्या मुदपाकखान्यातील
नायाब किशमिश पळवले.
टोप, कढया, डेगची सारे काही
उलथे पालथे करून चूल्ह्यामधली
आगसुद्धा विझवून टाकली...
आपल्या सिपाह्यांची सलवारसुद्धा
जागेवर टिकू दिली नाही, खाविंद!
तोंप आणि बरच्यांची बारीश करून
गोलाबारूद डागून डागून
दुश्‍मनांनी आपले सैन्य तहस नहस केले,
लेकिन हमनें भी दिलेरी दिखाते,
त्यांना चोख जबाब दिला, आणि
बमबारीची एक रंगीन खौफनाक
तसबीर बनवून त्यांना दाखवली,
म्हटले, खामोश रहो, नहीं तो ऐसी
हालत करेंगे की तुम्हारी
आनेवाली नस्लें भी
याद रख्खेगी..!''

सोन्याच्या परडीतील आणखी एक
सेब उचलत खाविंद म्हणाले,
""शाब्बाश, अब बुरी खबर सुनाओ!''

""बुरी खबर...अ...अ...ह्या गोलाबारीमुळे
आपला मुदपाकखाना नष्ट झाला आहे.
सबब, आज खाविंदांना खान्यामध्ये
गोश्‍त के जगह गोभी खानी पडेगी!''

गरागरा आंखे फिरवीत
खाविंदांनी सेब फेकून देत
फमार्विले, ""खामोऽऽश! ही बुरी खबर
देण्यापूर्वी तुझे दात का नाही पडले?
बदतमीज कहीं का!! अरे,
कौन है वहां? इस बेहया की
जुबां नहीं, मुंडी काट दो!

Web Title: Sakal Editorial Dhing Tang British Nandi