इम्तहान! (ढिंग टांग!)

इम्तहान! (ढिंग टांग!)
इम्तहान! (ढिंग टांग!)

रिक्षाच्या भर्रर्र आवाजात
वळून वळून आरिफमियां
होता सांगत त्याची आपली
एक छोटीसी कहानी...

""सुनो ना साब, मेरी लडकी
रुखसार भोत हुश्‍शार है,
घरका देखती, कालिजकू जाती,
सोब हवं-नको बघती...
पढेली है, बारावी हो गएली है...हांऽऽऽ''

आरिफमियांच्या आवाजात
अभिमान नव्हता मावत...
डोळ्यांत होते फज्जरचे रंग
होते साकळत...
बडी खोली घेण्याचे त्याचे स्वप्नदेखील
तरंगत होते रिक्षाभर बराच काळ...

""गए वख्त रुखसार बोली,
अब्बू, कित्ते दिन रिक्षा मारेंगे?''
मैं बोला,""तेरे निक्‍का तलक''
वो बोली, ""मारो गोली निक्‍का कू,
मेरेकू नै करना निक्‍का-वक्‍का''
मैं बोला, ""तू पढ-लिख,
बडी हो, निक्‍का करके चली जा,
तेरेकू क्‍या फिकीर होनी?''
वो बोली, ""सतरा नंबर का फॉर्म आता,
उससे दसवी की इम्तहान देनेकू होती''
ैंमैं बोला, ""अब्बी इस उमर में इस्कूल जाऊं?
सुबेहसे रात तलक रिक्षा मारके,
जैसे तैसे रोटी कमा लेता हूं.
तेरी पढाई, तेरा निक्‍का,
अस्लम अब्बी छोटा है...
तेरी दसवीसे कुच्च नै होना, पगली!''

""लेकिन साब मेरी रुखसार भोत बोले तो भोतच जिद्दी.
फारम लाई, भर के भेजी,
किताबां लाई, मेरेकू बोली,
""अब्बू, शामकू जल्दी घर आना,
मैं लेती तुम्हारी ट्यूशन
इस्कूल गया तेल लेने...''

तो फिर?

""तो फिर क्‍या साब? वोइच...
खारा वारा, मतलई वारा
प्रेअरी, सुदान, प्रोटोझोआ,
सल्फुरिक ऍसिड, न्यूटन की बात,
हाहाहाहाहाहाऽऽऽ''

तेवढ्यात आले ठिकाण
आणि थांबवली रिक्षा :
सांगितलेला दाम घेण्यासाठी
त्याने पुढे केला ओबडधोबड हात,
तेव्हा दिसले...

हातावर होता क्रमांक,
आणि टोटल 257!

अभिमानाने हात पुढेच ठेवत
तो म्हणाला : भाडा रेहनदो भाई,
ये देखो अपना रिजल्ट.
अब्बीच मिला...

खिशाला अटळपणे लटकणाऱ्या
त्रिकोणी बिल्ल्याला स्पर्श करत
आरिफमिया गर्द आवाजात म्हणाला :
""ये है मेरी रोजीरोटी, और
ये है मेरी रुखसार...
सच्ची, मेरी रुखसार
अब्बी भोत खुश होगी, ना?''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com