हौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष !

येत्या काही दिवसात आपण अभिजात भाषेत बोलू, लिहू आणि वांचू! अभिजात भाषेतला प्रत्येक साहित्यिक आपोआप अभिजात ठरणार असल्याने (माझ्यासारख्या साहित्यिकेने) थोडी कळ सोसायलाच हवी. नाही का?
CM and PM
CM and PMSakal Media
Summary

येत्या काही दिवसात आपण अभिजात भाषेत बोलू, लिहू आणि वांचू! अभिजात भाषेतला प्रत्येक साहित्यिक आपोआप अभिजात ठरणार असल्याने (माझ्यासारख्या साहित्यिकेने) थोडी कळ सोसायलाच हवी. नाही का?

नअस्कार! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मंगलमय क्षण नजीक आल्याची सुखद जाणीव मला होऊ लागली आहे. हृदयी हुरहूर दाटूं लागली आहे. कुठल्याही क्षणी माझी माय मराठी अंतर्बाह्य अभिजात होऊन जाईल, आणि ज्याच्यासाठी मराठी साहित्यिक आणि रसिकांची धडपड गेली कैक वर्षे चालू आहे, ती सत्कारणी लागेल, या भावनेने कृतकृत्य वाटत आहे. याजसाठी केला होता अट्टहास, बरं का!

महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी मुळीच हयगय न करता थेट दिल्लीच गाठलीन, याबद्दल त्यांचे अभिनंदन. आजवर एकाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने हे ‘करुन दाखवलं’ नाही. ‘‘(माझ्या) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता की नाही, बोला?’’ असा थेट

सवाल त्यांनी (पुन्हा लाडक्याच) पंतप्रधानांना केलान! दोघेही जनतेच्या लाडाचे!! भाषाही लाडाची! मग का नाही होणार काम?

मराठी भाषेच्या दर्जाचं काम तातडीने करण्याचं आश्वासन लाडक्या पंतप्रधानांनी लाडक्या मुख्यमंत्र्यांना लाडालाडातच दिल्याचं कळतंय. तसं झालं तर आम्ही लाडक्या मुख्यमंत्र्यांचा मराठी भाषेतर्फे ‘मसाप’चा जीवनगौरव पुरस्कार देऊ. एखादी भाषा अभिजात ठरवणं हे सोपं काम नाही. आधी तिची प्राचीनता ठरवावी लागते. त्यासाठी त्या त्या भाषेला प्राचीन करावं लागतं. सांगायला आनंद होतो की मराठी भाषेला प्राचीन करण्याचं काम गेली अनेक वर्ष सुरु आहे. भाषा प्राचीन करण्याचा उपाय म्हंजे तिला लोणच्यासारखी उन्हात ठेवणे आणि नंतर चिनी मातीच्या बरणीत ठेवून त्या बरणीचे तोंड फडक्यात घट्ट बांधून ठेवणे! एकदा भाषा मुरली की आपोआप तिच्यात प्राचीनता येत्ये.

CM and PM
ढिंग टांग : कुणीही कुणाचं असतं..!

मराठी भाषा प्राचीन करण्याच्या कामी आपल्या साहित्यिक आणि वैचारिकांच्या अनेक पिढ्या खर्ची पडल्या. विशेषत: मराठीच्या प्राध्यापकांच्या! आमच्या ओळखीचे एक मराठीचे प्राध्यापक मोहेंजोदाडो काळापासून असावेत, अशा चेहऱ्याचे होते. ते नावाजलेले साहित्य समीक्षक होते, हा भाग अलाहिदा. त्यांना दिल्लीला नेऊन उभे केले असते तरीही मराठीला केवळ प्राचीनतेच्या निकषावर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असता.

एखादी भाषा किती प्राचीन आहे, त्या भाषेत किती ज्ञान निर्माण झाले, शब्दसंग्रह किती समृद्ध आहे, असले काही

निकष असतात, त्या निकषांवरच अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. मराठी ही भाषा पहिल्यापासूनच ‘अमृतातें पैजा जिंकणारी’ आहे. त्यात प्राचीन गधेगाळीपासून अर्वाचीन ‘भ’च्या बाराखडीपर्यंत समृध्द शब्दसंपन्नताही आहे. ज्या भाषेत शिवीदेखील ओवीसारखी प्रभावीपणे वापरली जाते, त्या भाषेच्या समृद्धीची किती उदाहरणे सांगावीत? प्राचीन मराठी भाषेचा पुरावा म्हणून मला कुणीतरी एकदा ‘गधेगाळीचा दगड’ दाखवला होता.

CM and PM
भाष्य : ट्रम्प यांच्या मार्गाने नेतान्याहू

‘अमूक अमूक गृहस्थांस अमक्या देवस्थानाच्या देखभालीसाठी अमूक इतकी जमीन देण्यात येत असून हा आदेश न पाळणाऱ्याच्या…’ असे बरेच काही त्या गधेगाळीच्या दगडावर लिहिलेले होते. (याबद्दल तपशीलात सांगायची काही सोय नाही!) पुरावा म्हणून असा

एखादा दगड दिल्लीला नेऊन दाखवला असता आणि त्याचे अर्थासहित लिप्यंतर करुन सांगितले असते, तरीही दिल्लीश्वरांनी कधीच मराठीला अभिजात दर्जा निमूटपणे बहाल केला असता, असे वाटते. सरोजताई, तुम्हाला नुसतं बघूनही दिल्लीश्वरांना मराठी भाषेचे प्राचीनत्त्व पटेल, असे मला कुणीतरी कुत्सितपणाने म्हणाले. मी दुर्लक्ष करत्ये! रसिकहो, आता प्रतीक्षा संपत आली!

येत्या काही दिवसात आपण अभिजात भाषेत बोलू, लिहू आणि वांचू! अभिजात भाषेतला प्रत्येक साहित्यिक आपोआप अभिजात ठरणार असल्याने (माझ्यासारख्या साहित्यिकेने) थोडी कळ सोसायलाच हवी. नाही का?

(Edited by : Ashish N. Kadam)

संपादकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com