esakal | ढिंग टांग :  बांधावरचे अभंग!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  बांधावरचे अभंग!

येवढा प्रलय । का रे धाडिलासी।
झालो वनवासी । रातोरात ।।

होत्याचे नव्हते। झाले एका दिस ।
जीव कासावीस। झाला झाला।।

वाहोनिया गेले। घर नि शिवार।
नुरे पारावार । दु:खालागी ।।

ढिंग टांग :  बांधावरचे अभंग!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बरे जाले देवा। केले कास्तकार।
जालो निराधार। तुझ्या कृपें।।

संपता संपेना । नशिबाचा भोग।
शेती हाचि रोग। दुर्धरचि।।

हजार हातांनी। देशी तूच मशी।
काढोनिया घेशी। हातोहात।।

येवढा प्रलय । का रे धाडिलासी।
झालो वनवासी । रातोरात ।।

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

होत्याचे नव्हते। झाले एका दिस ।
जीव कासावीस। झाला झाला।।

वाहोनिया गेले। घर नि शिवार।
नुरे पारावार । दु:खालागी ।।

कोसळली वीज । फुटला गे मेघ ।
पाण्याचा आवेग । मृत्यूसम ।।

पर्जन्याचे पाय । उलटे की काय ।
केले धरणीठाय । जीव मात्र ।।

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय करू आता? । किती पिटू छाती।
आयुष्याची माती । झाली देवा।।


बैसलो रिकामा । बडवीत भाळ ।
नांगराचा फाळ । घरावरी ।।

अस्मानीचा शाप । भोविन्नला मज ।
नुरे काही वज । जगण्याला ।।

थिजला काळोख। साकळला नेत्री।
दिवस नि रात्री। एक झाल्या।।

पर्जन्य पिशाच्च । यथेच्छ नाचले ।
शिवार झोपले । कायमचे ।।

नशिबाला बोल । बैसलो लावीत ।
कपाळाला हात । अहर्निश ।। 

आणि अचानक । माझ्या बांधावर।
कुणि अवतार । प्रकटले ।।

झाली धावाधाव । उडाली झुंबड ।
सर्कारी गडबड । शेतामाजी ।।

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


दूर आभाळात। दिसले चॉपर ।
त्यातूनी ईश्वर । उतरले ।।

रडू नको भावा । नको सोडू धीर।
तूचि खरा वीर । दौलतीचा ।।

मंजुळ स्वरांनी। बोले घुणघुणा ।
मैं हू ना, मैं हू ना। ऐसे काही ।।

धावोनिया आला । बांधावर भाऊ।
म्हणे, देऊ देऊ । रोख साह्य ।।

सेल्फी, फोटो छान । टीव्हीचे क्‍यामेरे।
उद्‌ध्वस्त शिवारे। बहरली ।।

पडियले पार । सारे यथासांग।
झाली पांगापांग । लगोलग ।।

ओल्या दुकाळाची। धरोनिया पाठ ।
कोरडा सुकाळ । दिलाशांचा ।।