
‘एग्झिट पोल’ देखा क्या? कहां है तुम्हारा नमो फॅक्टर! मुझे कहा गया था की आपण निश्चिंत रहो, बाकी चमत्कार हम करेंगे! नमोजीभाई की एक रॅली विरोधकोंका लालटेन बुझा देगी! कहां है वह
स्थळ : लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही.
वेळ : मोरांना शेंगदाणे खिलवण्याची.
नमोजीभाई : (मोरांना उद्देशून) ऑ ऑ ऑ ऑ...आवो ने! अरे मयुरभाई, एटला भाव ना खाव! भरुचनी प्रख्यात सिंग आपू छूं, खाओ तो! ऑ ऑ ऑ...(इथे मोर संशयस्पद डोळ्याने वटारुन पाहतात. पण शेंगदाण्यांना तोंड लावत नाहीत...) अरे, शुं थयुं?
मोटाभाई : (गुडघे चोळत) नमोजीभाई, आजना दिवस ठीक नथी!
नमोजीभाई : (करवादून) गधेडा!
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मोटाभाई : (दचकून) आँ? (इथे नमोजीभाईंनी मोरांना गाढव म्हटल्याचे त्यांच्या लक्षात येते. ते थोडे निश्चिंत होऊन पुन्हा आपले दुखरे गुडघे चोळू लागतात. मोरांना मात्र गाढव म्हटल्याचे फारसे काही वाटत नाही. ते शेंगदाणे खायला अजिबात तयार नाहीत...)
नमोजीभाई : (आडमुठ्या मोराला रागावत) ...नाश्तो आपो, खावडामाटे काईपण आपो, आ मोरलोग बहु नखरा करे छे! छेल्ला वखत यांच्यासंगती ब्रेकफास्ट करताना मी सेल्फी पण काढली होती! तवा कसा पिसारा फुलवूनशी नाचला होता! हवे शुं थयु?
मोटाभाई : (भक्तिभावाने) पब्लिक कहे छे के तमे खातो नथी, अने खावा देतो नथी! पण मने गमे छे के आ मोर अपवाद छे! (एवढे ऐकल्यावर मोर एकमेकांकडे आश्चर्याने बघतात...)
मोटाभाई : (गुडघे चोळत गंभीरपणे) अमरिका मां कोण छे विनर? काई खबर पडली के?
बायडेनसेठ जिंकला के आपडा डोलांडभाई?
नमोजीभाई : (चिडून मोरांना दाणे फेकून मारत) आपडे शुं फर्क पडे छे? मी तर बायडेनला कोंग्रेच्युलेशन केला, अने डोलांडभाईला पण!! दोघांनी पण ‘थेंक्यू’ रिप्लाय पाठवला! ऑ ऑ ऑ ऑ...(हे मोरांना!)
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मोटाभाई : (समंजसपणे) बायडेनसेठ भला माणस छे!! एने आपडे अमदावाद मां बुलावो ने!!
नमोजीभाई : (दाणे टाकत) चोक्कस!! पक्का बुलावीश!! जोभाई एकदम जंटलमन छे! ना नथी पाडीश!! (विचार करत) आपडे एक प्रोग्राम करशे! ‘हौडी जो’!! हाहा!! लोकडाऊन संपला के मी पण अमरिकाला ज्याणार!!
मोटाभाई : (नेहमीप्रमाणे होकार भरत) चालेछ!
नमोजीभाई : (मोरांवर भडकून) मने लागे छे के आ मोर तो बिहारजेवा वर्तन करे छे! एटला सिंग ओफर करु छूं, मुंह ना लगाडे छे!!
मोटाभाई : (गंभीर होत) बिहार मां परिस्थिती ठीक नथी! आपडा सूफडा साफ थईश!!
एग्झिट पोलनी रिझल्ट पण एऊज कहे छे!! आपडे नितिसभाई तो पती गयो!! खेल खतम!!
नमोजीभाई : (बेफिकिरीने) डोण्ट वरी, मोटाभाई! हूं छूं ने!! जेणो काम तेणे थाय!!
मोटाभाई : (दु:खी सुरात) नितीसबाबूना फोन आव्या हता?
नमोजीभाई : (बेपर्वाईने) जवां दे ने मोटाभाई! शां माटे एटली फिकर करे छे?
मोटाभाई : (उदासपणे) मने आव्या हता!! खूप ओरडत होते! म्हणाले, ‘एग्झिट पोल’ देखा क्या? कहां है तुम्हारा नमो फॅक्टर! मुझे कहा गया था की आपण निश्चिंत रहो, बाकी चमत्कार हम करेंगे! नमोजीभाई की एक रॅली विरोधकोंका लालटेन बुझा देगी! कहां है वह
चमत्कार! लगता है मुझे आजही रिटायर होना पडेगा!’’
नमोजीभाई : (थंडपणाने) तो एने कहो, रिटायरमेंट डिक्लेअर करजो! आज छे नमो फेक्टर!
सांभळ्यो? ऑ ऑ ऑ ऑ...
(इथे मोर चटकन पुढे येऊन शेंगदाणे खातात. इति.)