esakal | ढिंग टांग : बिहार मां बहार!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : बिहार मां बहार!

कौन जीता? कौन हारा? कौन क्‍यों जीता? कौन क्‍यों हारा? मैंने क्‍या पाया था, जो मैंने खोया? कुछ समझ नहीं रहा... मैं जीता, या हारा? कुछ समझ में नहीं आ रहा!! मी जिंकलोय, यावर माझा विश्वासच बसत नाही! हरलोय, असंही म्हणवत नाही! महाभारत के युधिष्ठिर जैसी मेरी अवस्था हो गई है!

ढिंग टांग : बिहार मां बहार!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

नमोजीभाई : (हळूवारपणे फोन फिरवत) जे श्री क्रष्ण... कोण वात करे छे?

सुशासनबाबू : (तंद्रीत फोन उचलत) अं? क... क... कौन?

नमोजीभाई : (हळूवारपणे) सुशासनबाबू घरे छे के?

सुशासनबाबू : (कपाळ चोळत अनिच्छेने) छे..! (भानावर येत) हम सुसासनबाबूही बोल रहे बा! कौन बोल रहा बा?

नमोजीभाई : (उत्साहात) सतप्रतिसत प्रणाम, सुसासनबाबू! हूं तमारा लाडला मित्र नमो वात करु छूं! ओळखाण लागे छे के नथी?

सुशासनबाबू : (ओशाळलेल्या आवाजात) हां हां! पेहचाना! आपको कैसन भूल सकत बा?

नमोजीभाई : (खणखणीत सुरात) हार्टिएस्ट कोंग्रेच्युलेशन हं! चूंटणी मां आपडी जीत थई गई! खबर तो पडी छे ने?

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुशासनबाबू : (गोंधळून) कौन जीता? कौन हारा? कौन क्‍यों जीता? कौन क्‍यों हारा? मैंने क्‍या पाया था, जो मैंने खोया? कुछ समझ नहीं रहा... मैं जीता, या हारा? कुछ समझ में नहीं आ रहा!! मी जिंकलोय, यावर माझा विश्वासच बसत नाही! हरलोय, असंही म्हणवत नाही! महाभारत के युधिष्ठिर जैसी मेरी अवस्था हो गई है!

नमोजीभाई : (दिलासा देत) एम ना केहवाय मेरे मित्र! तमे तो अर्जुन छो, अर्जुन!! आ तो बिहारनी जीत छे! सत्य नी जीत छे! विकासनी जीत छे! आ तो तमारी जीत छे!!

सुशासनबाबू : (ओढून ताणून) धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद! किती वेळा थॅंक्‍यू म्हणू? कालपासून दोन वेळा ट्विट केलं... आणखी किती वेळा करु? बिहारमध्ये मला जिंकवून आणलंत, त्याबद्दल आभार! आमच्या पक्षाच्या जागा घटल्या! तरीही जिंकलो!! तुमच्याशिवाय हे शक्‍य झालं नसतं!

नमोजीभाई : (अघळपघळपणे) अरे, शुं वात करे छे! आपडा तो डब्बल इंजिन छे ने!! हमतुम काई अलग छे के? हवे आपडे बद्धा काम करीश अने बिहार मां विकासनी गाडी दौडावीश!! तमे तय्यार रहो!! तमे शपथ क्‍यारे लेवानी?

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुशासनबाबू : (खचलेल्या सुरात) शपथ? अंऽऽ... घेऊ घेऊ!!

नमोजीभाई : (आग्रही सुरात) अरे, घेऊनशी टाकायच्या शपथ!! हूं तमारे पाछड छूं!! कल करै सो आज कर, आज करै सो अब, पल में परलय होगी, बहुरी करैगा कब? सुशासनबाबू आगे बढो, हम तुम्हारे साथ है!!

सुशासनबाबू : (पडेल आवाजात) न्यम न्यम न्यम! एवढं सोपं आहे का? बरीच कामं बाकी आहेत! मंत्रिमंडळही ठरवायला लागेल!

नमोजीभाई : (सल्ला देत) हूं तमे लिस्ट भेजूं छूं! मंत्रिमंडल आरामथी होऊन ज्याणार!

सुशासनबाबू : (हताशपणे) म्हणजे तुम्हीच माझं मंत्रिमंडळ ठरवणार! थॅंक्‍यू अगेन!!

नमोजीभाई : (खोट्या नम्रतेने) हूं तो एक निमित्तमात्र छूं!! तुम्ही असा करा... (कॅलेंडर बघत) सोळ तारीखला शपथ घेऊनशी टाका!!

सुशासनबाबू : (आवंढा गिळत) सोळ? आय मीन... सोलह? ठीक ठीक! और कुछ?

नमोजीभाई : (सूचना देत) शपथ कार्यक्रमना आमंत्रण मने मुको हं! हूं आवीश!!

सुशासनबाबू : जरुर! आणखी काय काय करु?

नमोजीभाई : (विचारपूर्वक, सहजपणे) एक काम करजो! शपथ लेता वखत केसरिया रंगना कुर्ता परिधान करजो हं! आ एकदम इंपोर्टंट छे!!

सुशासनबाबू : (मनातली खदखद दाबत) क्‍या? केसरिया रंगाचा कुर्ता?

नमोजीभाई : (ठामपणे) चोक्कस!!

loading image