esakal | ढिंग टांग : कन्फ्युजन आणि प्रजाजन!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : कन्फ्युजन आणि प्रजाजन!

सत्तेत राहून विरोधकासारखं वागणं, आणि विरोधात राहून सत्ताधारी असल्यागत वागणं आम्हाला चांगलं जमतं! म्हणून हे लोक आम्हाला ‘कन्फ्यूज्ड’, ‘गोंधळलेले’ असं म्हणतात!

ढिंग टांग : कन्फ्युजन आणि प्रजाजन!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

चि. विक्रमादित्य : (नेहमीप्रमाणे एण्ट्री घेत) हाय देअर...मे आय कम इन बॅब्स?

उधोजीसाहेब : (नेहमीप्रमाणे निक्षून सांगत) नोप! सोशल डिस्टन्सिंग पाळा! दुसऱ्याच्या घरी जाऊ नका!!

विक्रमादित्य : कमॉन! मी माझ्याच घरात आहे!!

उधोजीसाहेब : (युक्तिवाद करत) पण माझ्या खोलीत आहेस त्याचं काय?

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विक्रमादित्य : (गोंधळून डोकं खाजवत) मी जाम कन्फ्यूज झालोय!!

उधोजीसाहेब : (समंजसपणाने) गोंधळाने गोंधळ वाढतो! गर्दी टाळा, गोंधळ आपोआप कमी होईल!! हे घे हातावर...सॅनिटायझर आहे!!

विक्रमादित्य : आपली पार्टी कन्फ्यूज्ड आहे का हो बॅब्स?

उधोजीसाहेब : (आठ्या घालत) कोण म्हणतं असं?

विक्रमादित्य : आधी सांगा! हो की नाही ते!!

उधोजीसाहेब : कसं सांगणार? मी मास्क लावलाय!! 

विक्रमादित्य : (‘युरेक्का’ क्षण आल्यागत)  याचा अर्थ आपण कन्फ्यूज्ड पार्टी आहोत...करेक्‍ट?

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उधोजीसाहेब : (खालच्या आवाजात) लोक काहीही बोलतात! आपण लक्ष देऊ नये!! 

विक्रमादित्य : (मोठ्या आवाजात) आपला पक्ष सर्वात कन्फ्यूज्ड पक्ष आहे, असं देवेंद्र अंकल म्हणत होते!!

उधोजीसाहेब : (खवळून) मग तर ते साफ खोटंच असणार! ‘म ी पुन्हा येईन’ असं सांगून एकदाही न आलेल्या गृहस्थाच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवायचा?

विक्रमादित्य : (पोक्तपणाने) आपण एकाच वेळी सत्तेत असतो, आणि त्याच वेळी विरोधकाची भूमिकाही पार पाडत असतो, असं म्हणतात ते! खरं आहे का?

उधोजीसाहेब : (अजीजीने) तू झोपायला जा बघू!!

विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत)  सांगा ना! आपण एका सभागृहात एक भूमिका घेतो आणि दुसऱ्या सभागृहात दुसरंच बोलतो, असाही आरोप केलाय त्यांनी! 

उधोजीसाहेब : (ठणकावून) कन्फ्यूजन-बिनफ्यूजन मला माहीत नाही! माझ्या प्रजाजनांच्या भल्यासाठी जे गरजेचं असेल ते मी बोलतोच!  गरज पडली तर मी स्वत:लासुद्धा विरोध करीन!

विक्रमादित्य : रिअली? दॅट्‌स ग्रेट, बॅब्स!! स्वत:लाच स्वत: विरोध करण्याची आयडिया खरंच भारी आहे!!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उधोजीसाहेब : (गंभीरपणाने हाताला सॅनिटायझर चोळत) सत्तेत राहून विरोधकासारखं वागणं, आणि विरोधात राहून सत्ताधारी असल्यागत वागणं आम्हाला चांगलं जमतं! म्हणून हे लोक आम्हाला ‘कन्फ्यूज्ड’, ‘गोंधळलेले’ असं म्हणतात! शक्‍य असेल तिथं आम्ही विरोध करु, पण केवळ विरोधासाठी विरोध कधीही करणार नाही! 

विक्रमादित्य : याला म्हंटात विचारांची सुस्पष्टता!!

उधोजीसाहेब : (राजकारणाचे धडे देत) माणसानं कसं खुल्या मनानं राजकारण केलं पाहिजे! बंद दाराआड एक, आणि उघड्यावर दुसरंच...हे कमळवाल्यांचं दुष्ट वागणं!! ते आपल्याला बिलकुल पसंत नाही! 

विक्रमादित्य : (गोंधळून) पण एकाच वेळी सत्तेत आणि विरोधात...हे कसं शक्‍य आहे?

उधोजीसाहेब : (ठामपणाने) शक्‍य आहेच मुळी! आम्ही ‘करुन दाखवलं’ आहे की!

विक्रमादित्य : (विचारमग्न होत्साते) याचा अर्थ खुद्द देवेनअंकलच कन्फ्यूज्ड आहेत...हो ना?

उधोजीसाहेब : (खुशीत) दे टाळी!  (पुढे केलेला हात लागलीच काढून घेत) नको, नको! नकोच देऊस!! 

विक्रमादित्य : (खुंटा बळकट  करत) याचा अर्थ आपण कन्फ्यूज्ड पार्टी नाही! हे अगदी शंभर टक्के खरं ना?

उधोजीसाहेब : (गोंधळून) अगदी शंभर टक्के वगैरे नाही, पण...अंऽऽ...कसं सांगणार? एवढं ठामपणे गणित करायचं म्हंजे...कुणास ठाऊक?