esakal | ढिंग टांग : मध्यस्थ! 
sakal

बोलून बातमी शोधा

trump

इंडिया आणि चायनाला मी एकत्र बसवीन!दोघांमध्ये मांडवली घडवून आणीन!त्यामुळे मला नोबेलबिबेल मिळेल!आशियाचा शांतीदूत म्हणून प्राइझ मिळेल! शिवाय सेकंड टर्मसाठी निवडून येणं सोपं जाईल! मग करू ना मी मध्यस्थी?

ढिंग टांग : मध्यस्थ! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

नमोजीभाई : (सावधपणे फोन उचलत) जे श्री क्रष्ण...कॉण छे? 

ट्रम्पतात्या : (अघळपघळपणे) हौडीऽऽ...डॉनल्ड हिअर! 

नमोजीभाई : (दबक्‍या आवाजात) रोंग नंबर छे! पण तमे वात करो, डोलांडभाई! नो प्रोब्लेम! तमे और हायड्रोक्‍सीक्‍लॉरोक्विन जोईये के? मारी पासे घणा स्टोक छे!! 

ट्रम्पतात्या : (डायरेक्‍ट विषयाला हात घालत) फर्गेट एचसीक्‍यू! मला वेगळंच बोलायचं आहे...! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नमोजीभाई : (कंटाळून) आजे मूड नथी! पछी फोन करजो तो! 

ट्रम्पतात्या : (सपशेल दुर्लक्ष करत डायरेक्‍ट मुद्यावर येत) तुमचं आणि चायनाचं भांडण चालू आहे, त्यात मी मध्यस्थी करायला तयार आहे! आयम रेडी, विलिंग आणि प्रिपेअर्ड टु मिडिएट!! 

नमोजीभाई : (भोळेपणाचा आव आणत) तुमच्या काईतरी मिसअंडरस्टेंडिग झ्याला हाय!! आपडा कोणेसाथे झगडो नथी! बद्धा प्यारमुहब्बतने साथे च्याले छे! 

ट्रम्पतात्या : (नाराजीने) नाऊ कमॉन! लडाखमध्ये त्या पेनगॉंग लेकच्या जवळ तुमचे आणि चायनाचे सैनिक काय एकत्र भांगडा करताहेत का? बॉर्डर डिस्प्यूट आहे तुमचा! सरळ सरळ दिसतंय!! 

नमोजीभाई : (आवरतं घेत) रेहवा दो, डोलांडभाई! तमे फिकर ना करो! हूं छूं ने!! 

ट्रम्पतात्या : (हट्टाने) असं कसं? तुम्ही दोघं भांडताना मी नुसतं बघत राहू? इंपॉसिबल! नाही म्हटलं तरी मी तुमच्या अहदमदाबादला येऊन ढोकळा खाऊन गेलो आहे! खाल्ल्या ढोकळ्याला जागणारा आहे मी! 

नमोजीभाई : (गडबडीने) अरे, त्याची काय जरुरत नाय हाय! जस्ट डोण्ट वरी! अजून एचसीक्‍यू पायजे,तर ओर्डर प्लेस करजो! 

ट्रम्पतात्या : (अधीरतेने) पाकिस्तानचं आणि तुमचं मॅटर मिटलं का? 

नमोजीभाई : (अनिच्छेने) मिटेल, मिटेल! 

ट्रम्पतात्या : (मूड गेल्यागत) त्याच्यातही मी मध्यस्थी करायला उत्सुक होतो! 

नमोजीभाई : (फोन ठेवण्याच्या घाईत) हायड्रोक्‍सीक्‍लोरोक्विन केटला जोईये? मी ओर्डर लिहून घेणार अमणाज! अर्जंट डिलिवरी पण करणार! बोलो!! 

ट्रम्पतात्या : (संतापून) गोली मारो एचसीक्‍यू गोली कू!! काहीही करून मला मध्यस्थी करू द्या, असं किती वेळा सांगायचं? पाकिस्तानच्या टायमालासुद्धा तुम्ही मला मध्यस्थी करू दिली नाही! आता चायनाशी मॅटर झाला तरी करू देत नाही! याला काय अर्थय? 

नमोजीभाई : (समजूत घालत) शांती राखो, डोलांडभाई! 

ट्रम्पतात्या : (आणखी चिडून) शांती राखो काय शांती राखो? इथे मी केव्हाचा सूटबूट घालून बसलोय! एक जण मला मध्यस्थीला बोलवेल तर शपथ! (कळवळून) मला एकतरी चान्स द्या ना, प्लीज! 

नमोजीभाई : (प्यारमुहोबत्तसह...) मळशे, तमे पण चानस मळशे! थोडु पेशन्स राखीने काम करजो!! ओके? 

ट्रम्पतात्या : (उतावळेपणाने) डोंबलाचा पेशन्स! गेली अनेक वर्षं बघतोय, तुम्ही लोक नुसते ढोकळे खायला घालता! मध्यस्थी करायचा विषय काढला की टोलवता! मी हे टॉलरेट करणार नाही! सांगून ठेवतोय!! 

नमोजीभाई : (शांतपणे) मध्यस्थी एटले तमे शुं करवानुं छे? 

ट्रम्पतात्या : (उत्साहात) इंडिया आणि चायनाला मी एकत्र बसवीन! दोघांमध्ये मांडवली घडवून आणीन! त्यामुळे मला नोबेलबिबेल मिळेल! आशियाचा शांतीदूत म्हणून प्राइझ मिळेल! शिवाय सेकंड टर्मसाठी निवडून येणं सोपं जाईल! मग करू ना मी मध्यस्थी? 

नमोजीभाई : (गोड बोलून वाटेला लावत) लोकडाउन खतम झाल्यावर फोन करजो हां! मग बघू! बाय द वे, तुमच्या अने चायनाच्या पण झगडा च्यालू हाय! त्येच्यामंधी मी मध्यस्थी करू के? बतावो!

loading image