ढिंग टांग : ट्रॅक्‍टर आणि पेरणी!

ढिंग टांग : ट्रॅक्‍टर आणि पेरणी!

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅण! मम्मा, आयम  बॅक!
मम्मामॅडम : (तोंडावर हात ठेवत) ईऽऽ...! काय हा अवतार? कपडे किती मळलेत! आधी आंघोळ करून ये पाहू!!
बेटा : (धीर देत) जातोय जातोय आंघोळीला! डोण्ट वरी! थोडा चिखल लागला अंगाला तर काय बिघडलं?
मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) कुठे पडलास की काय? लागलं बिगलं नाही ना?
बेटा : (सहज सुरात) इतना भी मत डरो माँ!! त्यांना मी धक्का दिला, त्यांनी मला धक्का दिला...दॅट्‌स इट!
मम्मामॅडम : (कळवळून) शोभतं का हे आपल्याला? या वयात मारामाऱ्या कसल्या करायच्या त्या? छे, मला तर अगदी घोर लागला होता...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेटा : (फिल्मी हिरोप्रमाणे समजूत घालत) मैं ऐसावैसा नहीं हूं माँ! तुम्हारे संस्कारों में पला हूं! मारामारी क्‍यूं करुंगा?
मम्मामॅडम : (हादरून जात) बघू कुठे लागलंय ते? काय मेली ही माणसं! जरा कुणी विरोध केला की सरळ धक्काबुक्कीवर उतरतात!
बेटा : (स्टोरी सांगत) मी त्यांना एवढंच सांगत होतो की मला पुढे जाऊ द्या! पण त्यांनी अडवलंन! त्यांनी धक्का मारल्यावर मी खाली पडलो! 
मम्मामॅडम : (कानावर हात ठेवत ) आईग्गं!! ईश्वर त्यांना कधीही क्षमा करणार नाही! एका निष्पाप, निरागस, इनोसंट
बेटा : (थांबवत) जाऊ दे ना! मी त्यांना धक्का दिला, त्यांनीही दिला! फिट्टंफाट झाली!
मम्मामॅडम : (सात्त्विक संतापाने) पण त्यांच्या धक़्क्‍याने तू पडलास! तुझ्या धक्‍क्‍याने ते पडले नाहीत!
बेटा : (विजयी  मुद्रेने) पण माझ्या धक्‍क्‍यानं त्यांचं डोकं सुन्न झालं! डोळ्यांसमोर मुंग्या आल्या! हातपाय लटलपटले! हाहा!! 
मम्मामॅडम : (फर्मावत) आत्ताच्या आत्ता आधी आंघोळीला जा! हा पक्षादेश आहे, असं समज!
बेटा : (विषय बदलत) मी आता ट्रॅक्‍टर चालवायला शिकलोय मम्मा! धम्माल येते!! 
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) अरे देवा! यूपीत मागल्या वेळेला त्या अखिलेशसोबत सायकलवर फिरला होतास! विमानं, हेलिकॉप्टर तर आहेतच! आता थेट ट्रॅक्‍टर? काय काय बघायला लावणार आहेस मला!! देव जाणे!!
बेटा : (ड्रायव्हिंगच्या पोजमध्ये) पंजाब, हरयाणात मी ट्रॅक़्टरवरच फिरलो! ट्रॅक्‍टरवर बसून मी पंजाबची सुपीक भूमी नांगरली, असं म्हण!!
मम्मामॅडम : (कोरडेपणाने) ती शेतीची कामं आपल्याला कशाला जमणार आहेत? आपण आपलं उघड्या जीपमधून वगैरे जावं! उगीच ट्रॅक्‍टरचं रिस्क नको!
बेटा : (अजूनही त्याच मूडमध्ये...) मला तर आता शेतकरी असल्यासारखं वाटू लागलं आहे!
मम्मामॅडम : (अभिमानाने) हा देशच मुळी शेतकऱ्यांचा आहे, बेटा! आपण सारेच शेतकरी आहोत!
बेटा : (निरागसपणे) तरीच! ट्रॅक्‍टर चालवताना मला मुळीच कठीण गेलं नाही! आजूबाजूला खूप गर्दी होती! पण मी कौशल्याने चालवत हरयाणा बॉर्डरपर्यंत गेलो! 
मम्मामॅडम : (घाईघाईने सूचना देत) हे बघ, आपण त्या भानगडीत पडू नये! धक्काबुक्की करणं, ट्रॅक्‍टरवर बसून मिरवणुका काढणं हे आपल्या पक्षशिस्तीत बसत  नाही! आज तू ट्रॅक्‍टरवर बसलास तर ते ‘जेसीबी’वर बसून येतील! मग काय करायचं?
बेटा : (शेतकऱ्याच्या पवित्र्यात) मी ट्रॅक्‍टरवर बसून पेरणी करीन! नाहीतरी आपण सगळे शेतकरी आहोत! काही शितांचे, काही मतांचे! क्‍यों सही है ना?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com