esakal | ढिंग टांग : ...बीजा करे सो गोता खाय!

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : ...बीजा करे सो गोता खाय!
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही.

वेळ : बप्पोर!

प्रधानसेवक श्रीमान नमोजीभाई मोरांना बोलावून दाणे टाकत आहेत. मोर यायला तयार नाहीत. प्रधानसेवक नाराजी व्यक्त करतात. शेजारीच गुडघे चोळत बसलेले श्रीमान मोटाभाई दचकतात. अब आगे...

मोटाभाई : (नम्रपणे) मने शुं कह्यु?

नमोजीभाई : (नाराजीने) तमे नथी! आ मोरलोगने बुलाऊ छुं! गधेडा नजीक आतोज नथी!

मोटाभाई : (आणखी नम्रपणे) आ गधेडा नथी, मोर छे! सोसल डिस्टन्सिंग मेंटेन करे छे!!

नमोजीभाई : (विषय आणि भाषा बदलत) बंगालमधी ज्याऊन आला के?

मोटाभाई : (होकारार्थी) चुक!!

नमोजीभाई : (चिंताग्रस्त मुद्रेने) कशी होणार तिथली चूंटणी? मने तो बहु टेन्सन छे!

मोटाभाई : (डोळे मिटून) आपड्या विरोधकांनी बंगालमधी प्रचार केंपेन बंद केला! कोंग्रेसवाळा कहे छे के पेंडेमिकमां केंपेना ना करवाय! ममताबेन पण कहे छे के हवे बस थई गयो खेला!! आपडे शुं करवानुं?

नमोजीभाई : (धूर्तपणे) प्रचार आ तो आपडा कर्मयोग छे, मोटाभाई! आपडा कामज छे! जेणो काम तेणो थाय, बीजा करे सो गोतो खाय!! सांभळ्यो?

मोटाभाई : (भक्तिभावाने) चोक्कस!

नमोजीभाई : (निर्णायक सुरात) थांबून कसा च्यालेल? अबकी बार बंगाल मां दोसो पार करवानी छे! प्रचार केंपेन जारी राखजो!!

हेही वाचा: तरूणाचा अनोखा विक्रम; सोळा वेळेस रक्तदान आणि आता प्लाझ्मा दान

मोटाभाई : (आज्ञाधारकपणे) ठीक छे! तमारी आज्ञा सरउप्पर!!

नमोजीभाई : (स्वप्रेमी सुरात) माझा कालच्या टीव्हीवरचा भाषण बघितला के?

मोटाभाई : (डायरी बघत) जी! ओगणीस मिनटच्या होता...एकदम सरस!!

नमोजीभाई : (दाणे फेकत) माय स्मॉलेस्ट स्पीच एव्हर! एरवी मी मिनिमम पच्यास मिनट बोलतो!!

मोटाभाई : (भक्तीने ओथंबलेल्या सुरात) खबर छे! पण ओगणीस मिनटच्या स्पीचमधी ओगणीस युगांच्या मानवतेच्या दर्सन झ्याला!! प्रभु, तमे धन्य हो!!

नमोजीभाई : (मोरांना बोलावत) ऑ ऑ ऑ ऑ...!!

मोटाभाई : (विनम्रभावाने) मने कछु कह्यु?

नमोजीभाई : (ओठांची भेदक हालचाल करत) आ दिल्लीना मोरलोग बहु कृतघ्न छे!! अहियां देसभर मां लोगोंना ओक्सिजन ना मळ्ये! रॅमडेसिवीर ना मळ्ये! होस्पिटलमां बेड ना मळ्ये!! पण आ मोरलोगोंने दाणापानी मळ्ये छे! बहु कृतघ्न!!

मोटाभाई : (समंजसपणाने) जवां दो, भाई! दिल्लीनो मोर एऊज करशे! नोनकोपरेटिव आम मोर पार्टी छे आ तो!! डोण्ट वरी, आवती चूंटणी मां हुं एना सूपडा साफ करीश!!

नमोजीभाई : (पुन्हा विषय आणि भाषा बदलत) लोकडाऊन करायच्या नाय असा मी स्पीचमधी सांगितला! बराबर केला ने? बंगाल, आसाम की चूंटणी होनेतक हमें लोकडाऊनसे बचना है!!

मोटाभाई : (चतुर हसत) पण महाराष्ट्र मां बहु लोच्यो थई गयो!! तुमच्या भाषण टीव्हीवर शुरु झ्याला, तेव्हा आपडा मऱ्हाटी नान्हाभाई याने की उधोजीभाई महाराष्ट्रमां लोकडाऊननी तय्यारी करता हता! एने खबर पडी के टोटल लोकडाऊन करवानी जरुरत नथी!! बस, थई गयो लोच्यो!!

नमोजीभाई : (धूर्तपणे) एने बोलो, करजो हवे लोकडाऊन! छेल्ला वखत लोकडाऊनमाटे मने गाळी आपता हता! हवे तमे गाळी खाओ!! जेणो काम तेणो थाय, बीजा करे सो...

मोटाभाई : (सुरात सूर मिसळत) गोता खाय!!