ढिंग टांग : न बोलवा मां नौ गुण!

Dhing-Tang
Dhing-Tang
Updated on

(स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, दिल्ली.)
मोटाभाई : (खाकरत) जे श्री क्रष्ण नमोजीभाई!
नमोजीभाई : (डोळे मिटून ध्यानस्थ) हुं!
मोटाभाई : (गंभीरपणे) लोच्यो थई गयो!
नमोजीभाई : (ध्यानधारणेत निमग्न) हुं!
मोटाभाई : (गुडघ्यातनं जाणारी कळ सोसत) हे राम! हवे शुं करवानुं?
नमोजीभाई : (एक डोळा उघडून दटावल्यागत) हुंफ!
मोटाभाई : (भाबडेपणाने) हुंफ कहे छे के चूप कहे छे! कछु सांभळतो नथी! (नेटाने) आपडा पार्टीना लोग कहे छे के नमोजीएक कछु करवानुं पडशे!
नमोजीभाई : (दुसरा डोळा उघडत) हुंऽऽ..हुंऽऽ…हुंफ!
मोटाभाई : (दुर्लक्ष करत) आ तो आपडा लक था के, इंग्लंडवाळा बोरिसभाई जोन्सनसाहेब आपडी गणतंत्र परेड जोवामाटे नथी आव्या! आवता तो इज्जतना फलुदा थई जाता! बराबर ने?
नमोजीभाई : (दोन्ही डोळे मिटत प्रश्नार्थक…) हुंऽहुं?
मोटाभाई : (आवाज खाली आणत कोड लँग्वेजमध्ये…) तुम्ही मघापास्नं हुं हुं हुं हुं करताय,मी काय समजावं? तुम्ही मोरांना बोलावताय का?
नमोजीभाई : (रागानं) हुंहुफ!!
मोटाभाई : (पडेल आवाजात) …असं आपण किती दिवस गप्प बसणार? ज्यांनी गप्प बसावं असं आपल्याला वाटतंय, ते किसानभाई बोल बोल बोलताहेत, आणि आपण मात्र गप्प! एम ना च्याले, नमोजीभाई!
नमोजीभाई : (दीर्घ श्वास घेत) ओऽऽम...!
मोटाभाई : (हतबल होत्साते) ते काँग्रेसवाले लोक आता माझा राजीनामा मागायला लागले! उद्या तुमचा मागतील! मग काय करायचं? परिस्थिती कठीण आहे!!
नमोजीभाई : (अखेरीस मौन सोडत) अरे, फिकर नॉट, मोटाभाई! हुं छूं ने! मैं हूं ना!
मोटाभाई : (मौन सोडल्याच्या आनंदातिरेकात) तुम्ही चक्क बोललात! मी धन्य झालो!
नमोजीभाई : (सहज विषय बदलत ) ही माझी ध्यानाची आणि मोरांना चारा देण्याची वेळ आहे! पण ते जाऊ दे! मघाशी काय बोलत होता तुम्ही? आपल्या बंगालमधल्या मोहिमेचं कुठवर आलं?
मोटाभाई : (हबकून) मी किसान आंदोलनाबद्दल बोलत होतो!
नमोजीभाई :(डोळ्यात पाणी आणत) किसानभाईंच्या भल्यासाठीच तर माझी ध्यानधारणा चालू आहे! त्यांची मिळकत दुप्पट व्हावी, म्हणून मी काय नाही केलं? मोरांना चारा दिला! वाराणसीला जाऊन गंगामाईला साकडं घालून आलो! शिवाय अयोध्येत जाऊन-
मोटाभाई : (घाईघाईनं) पण किसानभाई तर इथं आपल्या दाराशी येऊन बसले आहेत! लोक विचारताहेत की एवढं भयंकर घडूनही तुम्ही एवढे गप्प का? काय उत्तर द्यायचं?
नमोजीभाई : (उपदेश केल्यागत) आपडे गुजराथी मां एक केहवात छे- न बोलवा मां नौ गुण! खबर छे ने? मतलब , न बोलण्याला नऊ अर्थ असतात!
मोटाभाई : (मुद्दा मनोमन पटत) चोक्कस!
नमोजीभाई : (युक्तिवाद करत) कोंग्रेसपेक्षा आपल्या सरकारने दुप्पट विकास करुन दाखवला की नाही?
मोटाभाई : (भक्तिभावाने) खरेखर नमोजीभाई! सरस काम थया!
नमोजीभाई : (युक्तिवाद पुढे नेत) कोंग्रेसच्या टायमात एकने एकज मौनीबाबा हता! बराबर ने?
मोटाभाई : (हसत) हां, हां, खबर छे! आपडा डोक्टर मनमोहनसिंगसाब!
नमोजीभाई : (टाळी वाजवत) हवे बे बे मौनीबाबा छे! हूं अने तमे! सांभळ्यो?

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com