आगळ अने पाछळ ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगळ अने पाछळ !
आगळ अने पाछळ !

आगळ अने पाछळ !

वेळ : बप्पोरे!

माननीय नमोजीभाई आणि उपमाननीय मोटाभाई दोघंही झोपाळ्यावर बसून झोके घेत आहेत. समोर दोन-चार नेहमीचे मोर टाइमपास करत आहेत. नमोजीभाई मोरांना दाणे टाकतात, पण मोर ढुंकायला तयार नाहीत, आणि तिथून जायलाही तयार नाहीत. नमोजी हैराण! अब आगे…

मोटाभाई : (गंभीर आवाजात) हवे शुं करवानुं?

नमोजीभाई : (चिंताग्रस्त सुरात) आ मोर लोग किसानजेवा बिहेव करे छे! खातो नथी, अने जातो पण नथी!! ऑ ऑ ऑ ऑ…

मोटाभाई : (मोरांना हाकलत) जॉ जॉ जॉ…हड हड हडी!!

नमोजीभाई : (हात झटकून) बध्दो लोच्यो थई गयो! ऑ ऑ ऑ…

मोटाभाई : (गंभीर आवाजात कंटिन्यू…) एटलामाटेज पुछ्यू छुं…हवे शुं करवानुं? जॉ जॉ जॉ…अरे, जा ने गधेडा!! (हे मोरांना उद्देशून…मोर फिक्कन हसल्याचा भास होतो.)

नमोजीभाई : (सुस्कारा सोडत) मी किती बेस्ट शेतकरी कायदा आणला होता! पण ‘ए तो जे खाय एनु अनाज, अने उगाडे एनु भगवान’!!

मोटाभाई : (गोंधळून) माने?

नमोजीभाई : (शेतकरीबांधवांच्या आठवणीनं टिपं गाळत) अरे, जे लोगां रोज खाना खाते, ते अन्न म्हणतात, अने जे बीज पेरतात, ते त्याला भगवान म्हणतात!!

मोटाभाई : (तरीही काहीही न कळल्याने) हांहां! हवे खबर पडी! जॉ जॉ जॉ…

नमोजीभाई : (स्वप्नाळू आवाजात) आमच्या फार्म लॉ आला असता तर देसातला शेतकरीभाई एकदम मालामाल होऊन गेला असता! बंगला, गाडी, मोटरसायकल, आयपेड, मोबाईल…बध्दा ए वन! वर्ल्ड मां नंबर वन फार्म लॉ हता!!...पण बध्दा खेल बगडी गया! ऑ ऑ ऑ…

मोटाभाई : (गुडघे चोळत) किसानभाईंना सिंघू बोर्डरवर बसायलाच द्यायला नाय पायजे होता! किती ट्राय केला, हवे जातोज नथी! पाणी माऱ्या, डंडा माऱ्या, खिला माऱ्या…पण आता आ लोग घरे ज्यायला तयारज नाय! हायवे उप्परथी ए लोगोंना जमावडा कायम छे!! मने तो डाऊट लागे छे के …एक दिवस हायवेच्या प्लॉट पाडूनशी आ लोग त्यांज घर बांधीने बसी जाइश!!

नमोजीभाई : (सुस्कारा सोडत) दिल्ली सबको प्यारी होती है! अहियां जो आवे छे, जातो नथी...ऑ ऑ ऑ…

मोटाभाई : (हताशेनं मान हलवत) आपडे केलेला हरेक कायदा मागे घेतला तर प्रोब्लेम होणार! मराठी मां एक केहवात छे- म्हातारी मेल्याच्या दुख नाय, पण काळ सोकवे छे!! (ही धेडगुजरी म्हण ऐकून मोर ‘म्याओ म्याओ’ असे हसतात…) जावो ने, मोरभाई, जाव जाव…! (शेवटले वाक्य मोरांना उद्देशून असते.)

नमोजीभाई : (झुल्याला पायाने रेटा देण्याचा प्रयत्न करत) आ झुला झुलतो नथी!!...किसानभाईए आ रडीनों डाव छे! शेतकरी कायदा रद्द करणार असा सांगितला, तो वापस जायला पाहिजे ने? ( धेडगुजरी ‘रडीनों डाव’ ऐकून मोरांना हसू आवरत नाही.)

मोटाभाई : (पुन्हा मुद्द्यावर येत) हवे शुं करवानुं?

नमोजीभाई : (विचारमग्न होत) नेहमीची स्ट्रॅटेजी! आगळच्या भविष्य बघून शेतकरी कायदा पाछळ घेतला, आ तो नमोजीभाईना मास्टरस्ट्रोक छे…असा सांगायच्या? सांभळ्यो?

मोटाभाई : (उजळलेल्या चेहऱ्याने) मास्टरस्ट्रोक? आ तो सर्जिकल स्ट्राइक छे! जे श्री क्रष्ण!!

ऑ ऑ ऑ…

loading image
go to top