

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (आरामखुर्चीत डोळे मिटल्या मिटल्या) हं!
बेटा : (हिरमुसल्या सुरात) कमॉन…मी इतका उत्साहानं आलो, तुम्हा लोकांना आनंद कसा नाही झाला?
मम्मामॅडम : (डोळे मिटूनच) झाला की! पण मी दमलेय रे..!
बेटा : (खांदे घुसळत) हॅ:, दमायला काय झालं? कुणी पैज लावली तर आत्ताच्या आत्ता पुन्हा भारत जोडो यात्रा करुन दाखवीन…नॉन स्टॉप!
मम्मामॅडम : (धसका घेत) नको बाबा आता तसलं काही…! मला पडू दे जरा! अहमदाबादचं अधिवेशन खूप थकवणारं होतं..! आपल्या अधिवेशनात विचारधारेवर चर्चा खूप होते, पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही, अशी तक्रार सॅम पित्रोडा अंकल करत होते…