काव्यनिष्ठेचा गौरव

संतोष शेणई
सोमवार, 12 डिसेंबर 2016

डोंबिवली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अक्षयकुमार काळे यांची निवड करून मराठी साहित्यप्रेमींनी जणू अविचल काव्यनिष्ठेचाच गौरव केला आहे. कविता हाच अक्षयकुमारांचा ध्यास आहे. किंबहुना, कवितेचा विचार ही त्यांनी त्यांची जीवननिष्ठा केली आहे. अक्षयकुमारांनीही साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते कविता रचून. त्यानंतर काही काळ ते ललितबंध आणि लघुकथाही लिहित होते. पण एका क्षणी हे सारे मागे पडले आणि कवितेचा ध्यास असलेला समीक्षक म्हणून त्यांचे नाव तेजाळत राहिले. त्यांच्यावर वाङ्‌मयीन संस्कार झाले ते घरांतूनच. त्यांच्या आई-वडिलांना वाचनाची अतोनात आवड होती.

डोंबिवली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अक्षयकुमार काळे यांची निवड करून मराठी साहित्यप्रेमींनी जणू अविचल काव्यनिष्ठेचाच गौरव केला आहे. कविता हाच अक्षयकुमारांचा ध्यास आहे. किंबहुना, कवितेचा विचार ही त्यांनी त्यांची जीवननिष्ठा केली आहे. अक्षयकुमारांनीही साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते कविता रचून. त्यानंतर काही काळ ते ललितबंध आणि लघुकथाही लिहित होते. पण एका क्षणी हे सारे मागे पडले आणि कवितेचा ध्यास असलेला समीक्षक म्हणून त्यांचे नाव तेजाळत राहिले. त्यांच्यावर वाङ्‌मयीन संस्कार झाले ते घरांतूनच. त्यांच्या आई-वडिलांना वाचनाची अतोनात आवड होती. अमरावती जिल्ह्यातल्या वरूड गावी त्यांच्या वाड्यातच "देशबंधू दास वाचनालय" होते. त्यामुळे अक्षयकुमारांचा वाङ्‌मयीन पिंड येथील अनिर्बंध वाचनातून घडला. वाङ्‌मयप्रेमाचा आणि सामाजिक आस्थेचा वारसा त्यांनी वडिलांकडूनच घेतला. त्यांचं घराणं दीडशे वर्षांचा इतिहास असलेलं. स्वाभाविकच अशा कुटुंबात एक प्रकारची अभिजातता विकसित होत गेलेली असते.

त्याचाही लाभ अक्षयकुमारांना झाला. आवडलेल्या कवितेने आपल्याला दिलेला आनंद दुसऱ्यांनाही द्यावा या हेतूने ते काव्यास्वादाकडे वळले. त्यांच्या समीक्षेत नेहमीच स्नेहशील औदार्य दिसून येते. हे औदार्य आणि स्नेहशीलता ही खरी तर वैदर्भी रीतीच आहे. पण वैदर्भी रीतीतील अस्ताव्यस्तपणा किंवा सैलसरपणा टाळून नेमकेपणाने व्यक्त होणे हे अक्षयकुमारांचे वैशिष्ट्य आहे. "स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील
प्रवाह' हा प्रबंध लिहून त्यांनी पंचविशीतच पीएच.डी. प्राप्त केली खरी, पण त्याच उत्साहात तो पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला नाही. आपला अभ्यास अजून सखोल आणि विस्तृत व्हायला हवा या जाणिवेतून त्यांनी आधुनिक मराठी कवितेचा व्यापक पट अभ्यासाला घेतला आणि पुढे "अर्वाचीन मराठी काव्यदर्शन' हा ग्रंथ सादर करून डी.लिट्‌. मिळवली. अशी अभ्यासाने डी.लिट्‌. मिळविणारे डॉ. माधव पटवर्धन तथा माधव ज्युलियन, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. द. न. गोखले यांच्या पंक्तीत डॉ. अक्षयकुमार काळे हे नाव शोभले. मर्ढेकर, कुसुमाग्रज, ग्रेस, गालिब यांच्या कवितेसंदर्भातील त्यांचे ग्रंथही मोलाचे आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भोक्ते असलेले अक्षयकुमार यांच्याकडे विद्यमान पर्यावरणात मराठी साहित्य क्षेत्राने नेतृत्व देणे ही खूपच लक्षणीय गोष्ट आहे.

 

Web Title: Song dedication glory

फोटो गॅलरी