जमा-खर्च आयुष्याचा!

सुनीता तारापुरे
बुधवार, 3 एप्रिल 2019

वर्षारंभ! वर्षभरात आपण किती वेळा नवनव्या वर्षांचं स्वागत करतो ना! एक जानेवारीला इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे दोन हजार एकोणीसचं आगमन झालं. एक एप्रिलला नव्या आर्थिक वर्षाचा प्रारंभ झाला. एक चैत्र म्हणजे गुढीपाडव्याला भारतीय कालगणनेनुसार शके १९४१ची सुरवात होईल. दिवाळी पाडव्याला व्यापाऱ्यांचं नववर्ष, जूनमध्ये नवं शैक्षणिक वर्ष, मृग नक्षत्राच्या आगमनाबरोबर शेतकऱ्यांच्या नव्या कृती संवत्सराची सुरवात... असे आणखीही काही वर्षारंभ आहेतच. ना आदि, ना अंत अशा अथांग गणना करण्याची ही आपली रीत.

वर्षारंभ! वर्षभरात आपण किती वेळा नवनव्या वर्षांचं स्वागत करतो ना! एक जानेवारीला इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे दोन हजार एकोणीसचं आगमन झालं. एक एप्रिलला नव्या आर्थिक वर्षाचा प्रारंभ झाला. एक चैत्र म्हणजे गुढीपाडव्याला भारतीय कालगणनेनुसार शके १९४१ची सुरवात होईल. दिवाळी पाडव्याला व्यापाऱ्यांचं नववर्ष, जूनमध्ये नवं शैक्षणिक वर्ष, मृग नक्षत्राच्या आगमनाबरोबर शेतकऱ्यांच्या नव्या कृती संवत्सराची सुरवात... असे आणखीही काही वर्षारंभ आहेतच. ना आदि, ना अंत अशा अथांग गणना करण्याची ही आपली रीत. रोजच्या रोज मावळणाऱ्या सूर्याबरोबर दिवसभरातल्या बऱ्या-वाईट आठवणींच गाठोडं उराशी बाळगत आपण दिवसाला निरोप देतो आणि दुसऱ्या दिवशी उगवणाऱ्या सूर्याबरोबर नव्या अनुभवांना सामोरं जातो. वर्षानुवर्षे, चालू असलेल्या या प्रवाहात सिंहावलोकनासाठी क्षणभर थांबता यावं, यासाठी कदाचित वर्षाच्या अखेर, आरंभाचं प्रयोजन असावं. आयुष्याचा जमाखर्च मांडण्यासाठी किंवा मूल्यांकनासाठी मिळालेली एक संधी.

व्यावसायिक आयुष्यात ‘अप्रेझल’च्या रूपात असा ताळेबंद आपण नित्यनेमानं मांडतो. पण व्यक्तिगत आयुष्याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न क्वचितच कोणी करतो. त्यातही घोळ असा आहे, की आपण व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याची सार्थक, निरर्थकता मानतो. त्यामुळे उत्पन्नाचे वाढते किंवा घटते आकडे, सोन-नाणं, घर, गाडी... वगैरेत त्याची मोजदाद करतो. खरं तर, ही दोन वेगवेगळी आयुष्यं दोन स्तरांवर आपण एकाच वेळी जगत असतो; जी एकमेकांशी निगडित तरीही खूप अलिप्त आहेत. त्यामुळे दोन्हीतला जमाखर्च निरनिराळाचा मांडावा लागणार. आजवर नसेल मांडला तर आतापासून सुरवात करूया. व्यावसायिक मूल्यांकनासाठी छापील फॉर्म असतो तसा या व्यक्तिगत आयुष्यासाठी नसेल. पण एक प्रश्‍नावली आपणच तयार करू शकतो ‘स्वतःसाठी. इच्छा-आकांक्षांच्या पूर्तीकरता मी काय पणाला लावलंय? पकडलेली दिशा अचूक आहे? मिळालेली गती योग्य आहे? अवलंबलेली पद्धत उचित आहे? मला हवं होतं, तेच आणि तसंच मिळतंय? मी खरंच आनंदी, समाधानी आहे? माझ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचं भान मला आहे? किती माणसं जोडली, किती दुरावली? माणूस म्हणून माझी वाढ झाली का खुंटली?...’ कितीतरी प्रश्‍न विचारता येतील स्वतःला. उपयुक्तता, कार्यक्षमता, निर्मितिशीलता, यशस्विता, संघटनकौशल्य, नेतृत्वगुण अशा काही निकषांवर व्यावसायिक यशापयशाची मोजदाद होते. तसे काही निकष घेऊन व्यक्तिगत आयुष्याचा आलेख मांडला तर तोही जमा-खर्च समजले आपल्याला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunita tarapure write pahatpawal in editorial