स्वातंत्र्यात सावधानता बाळगा 

स्वातंत्र्यात सावधानता बाळगा 

लॉकडाउन ५.० मुळे नागरिकांना आपले हरवलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळतेय, दीर्घ कालावधीनंतर लोक बाहेर पडताहेत. यावेळी प्रतिबंधांची यादीही कन्टेमेंट झोनपुरती मर्यादितही करण्यात आली आहे. मात्र, सर्वच नागरिकांनी या स्वातंत्र्याचा सावधानतेने आणि जबाबदारीने वापर करायला हवा. अन्यथा हे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येऊ शकते. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मानवी जीवनाला कार्यान्वित करणारे दोन प्रमुख घटक असतात - देश आणि काळ (अर्थात स्थान आणि वेळ). आपले जीवन म्हणजे याच प्रमुख दोन घटकांची अभिव्यक्ती असते. या दोन्हींपैकी वेळ आपल्या हातात नाही. तो आपल्याच गतीत पुढे सरकत राहतो. आपण त्याचे नियंत्रण करू शकत नाही. मात्र, देश किंवा स्थान यावर आपले नियंत्रण असते. कोणत्याही स्थानी, ठिकाणी लोकांचे फिरण्याचे स्वातंत्र्य कमीजास्त केले जाऊ शकते. देशातच सर्व सामाजिक, आर्थिक व्यवहार असतात. जीवन संपूर्णपणे जगण्यासाठी आपण आपल्या स्वातंत्र्याचा परीघ विस्तारण्याचा प्रयत्न करतो. 

लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापासून सरकारकडून घोषित झालेल्या त्याच्या पाचव्या टप्प्यापर्यंतचा (ज्याला लोक ‘अनलॉक १.०’ सुद्धा म्हणत आहेत.) प्रवास आपण पाहिला. तो देशातील जनतेकडून त्यांच्यासाठी अधिक स्वातंत्र्याच्या न्यायोचित मागणीचे प्रतीक आहे. यावर्षी २५ मार्चनंतर पुढील ६८ दिवस देशातील १३० कोटी नागरिकांनी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी स्वेच्छेने स्वत:ला आपापल्या घरामध्येच बंदिस्त केले. आता, लॉकडाउन ५.० मुळे नागरिकांना आपले हरवलेले स्वातंत्र्य, स्वच्छंदी जीवन पुन्हा मिळण्याची सुरवात झालीयं. त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर लोक बाहेर पडताहेत. यावेळी प्रतिबंधांची यादी केवळ कमीच केलेली नाही तर ती कन्टेन्मेंट झोनपुरती मर्यादितही करण्यात आलीयं. मात्र, सर्वच नागरिकांनी या स्वातंत्र्याचा सावधानता आणि जबाबदारीने वापर करायला हवा. लॉकडाउन १.० मध्ये १३० कोटी नागरिक राहणाऱ्या देशातील सात लाख गावे आणि ४५०० हून अधिक शहरे, महानगरांमध्ये लादलेले निर्बंध नव्या लॉकडाउनमध्ये कन्टेन्मेट झोनपुरते मर्यादित ठेवले आहेत. देशात आता फक्त सहा हजार कंटेन्मेंट झोन राहिले आहेत. तेही प्रामुख्याने कोरोनाच्या ७० टक्के रुग्ण आढळलेल्या १३ शहरे आणि सहा राज्यांच्या राजधान्यांमध्ये आहेत. यापैकी प्रत्येक कन्टेन्मेट झोनची लोकसंख्या काही शेकड्यांपासून काही हजारांपर्यंतच असेल. त्यामुळे, लॉकडाउन ५.० मधील निर्बंधांमुळे फारच कमी लोक प्रभावित होतील. उर्वरित बहुतांश नागरिकांसाठी स्वातंत्र्याचा परीघ खूपच अधिक विस्तारलाय. त्यानुसार, लोक स्वतःला अभिव्यक्तही करू शकतात. 

१८ मेनंतर लॉकडाउन ४.० च्या काळात कोरोनाच्या दररोजच्या रुग्णसंख्येत नव्याने वाढ झालेली नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत आठ हजार रुग्णांसह दैनंदिन रुग्णसंख्येत सर्वांत मोठी वाढ दिसली, त्याच दिवशी अनलॉक १.० ची घोषणा करण्यात आली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या निर्बंधांनंतर बाहेर पडताना आवश्यक सावधानता बाळगण्याचा संदेश देत आहे. ती आपल्याला अनलॉक १.० च्या स्वातंत्र्याचा उपयोग खूप सावधानतेने करायला हवा, अन्यथा, या स्वातंत्र्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे सावधही करतेय. 

कोरोनाच्या दोन महिन्यांच्या बंदीने आम्हाला सांगितले की, जीवन किती अनमोल आहे. ते किती लवकर, मोठ्या संकटात सापडू शकते आणि या संकटातही कसे जगावे, हेही या बंदीने आपल्याला शिकविले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता त्यांचे संतुलन राखणे, हा अर्थपूर्ण आयुष्याचा अर्थ आहे. एकीकडे कोरोनामुळे कोलमडलेले जीवन आपण सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचवेळी जीवन सावधानतेने जगा. हाच सिद्धांत अनलॉक १.० मध्येही आपल्याला लागू असेल. कोरोनाविरुद्धच्या या युद्धात केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारची भूमिकाही प्रशंसनीय राहिली आहे. अनलॉक १.० मध्ये राज्यांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत. अंतिमतः त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. आपण नक्कीच यश मिळवू. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com