तेजस्वी जीवनासाठी योगासने

मंजूषा कुलकर्णी
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

योगविद्येचे महत्त्व प्राचीन काळापासून आजच्या विज्ञान काळापर्यंत अबाधित आहे. पतंजली मुनींनी या विद्येचा पाया रचला. शारीरिक, मानसिक स्वास्थासाठी योगासने करणे हा सर्वांत उत्तम व्यायामप्रकार आहे. शिवाय योगासने करण्यासाठी पैशाची गरज लागत नाही. कधीही, कोठेही कोणाला योगासने करता येतात. फक्त त्याविषयी माहिती व ती कशी करावीत याचे ज्ञान होणे आवश्‍यक आहे.

योगाचार्य बाळासाहेब काळे यांनी "तेजस्वी जीवनासाठी योगासने'मधून प्रत्येक आसनाची माहिती, ते कसे करावे, त्याचे परिणाम दिले आहेत. खेळाडूंना उपयोगी पडणारे ताडासन व वृक्षासन, उत्थित त्रिकोणासन व उत्थित पार्श्‍वकोनासन, वीरभद्रासन, अर्धचंद्रासन, उत्तानासन, धनुरासन, नौकासन, सुप्त भेकासन, घेरंडासन, नटराजासन अशी 70 पेक्षा जास्त योगासने यात आहेत.

प्रत्येक आसनाच्या नावाची व्युत्पत्ती, त्याचा अर्थ, कृती, त्याचे परिणाम याची माहिती दिली आहे. तसेच सूर्यमनस्काराची महती व करण्याचे टप्पे सांगितले आहे. आसनांच्या टप्प्यातील चित्रेही यात दिली आहेत. त्यामुळे ती कशी करायची हे पटकन लक्षात येते.

Web Title: yoga for better life

टॅग्स