आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 जून 2021

पंचांग - मंगळवार : वैशाख कृष्ण ७, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय रात्री १२.४९, चंद्रास्त सकाळी ११.४१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०६, भारतीय सौर ज्येष्ठ ११ शके १९४३.
Astrology and Horoscope
Astrology and HoroscopeSakal

पंचांग -

मंगळवार : वैशाख कृष्ण ७, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय रात्री १२.४९, चंद्रास्त सकाळी ११.४१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०६, भारतीय सौर ज्येष्ठ ११ शके १९४३.

दिनविशेष -

1872 : ‘चाफा बोलेना’ या कवितेमुळे लोकप्रिय झालेले कवी ‘बी’ यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव नारायण मुरलीधर गुप्ते.

1929 : भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास घडविणारी महाराष्ट्रातील चित्रपटनिर्मिती संस्था, मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानल्या जाणाऱ्या ‘प्रभात फिल्म कंपनी’ची कोल्हापूर येथे स्थापना.

1948 : रस्ता वाहतूक सेवेचे राष्ट्रीयीकरण होऊन स्थापन झालेल्या राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) पहिली बस ‘पुणे ते नगर’ या प्रवासासाठी रवाना झाली.

1998 : ज्येष्ठ साहित्यिक व दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर यांचे निधन.

2000 : हास्यविनोदाचे एकपात्री कार्यक्रम रंगविणारे प्रसिद्ध कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचे निधन.

दिनमान -

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे निर्णय अभ्यास करून नंतरच घ्यावेत.

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात संधी लाभेल.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : काहींना कौटुंबिक चिंता लागून राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल.

तूळ : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

धनू : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आर्थिक सुयश लाभेल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com