महात्मा गांधींचे 10 अजरामर Quote

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

भारताचे महापुरुष महात्मा गांधी यांची आज दिडशेवी जयंती आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगाला सत्य आणि अहिंसा शिकवणाऱ्या महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांचे अजरामर कोट्स

भारताचे महापुरुष महात्मा गांधी यांची आज दिडशेवी जयंती आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगाला सत्य आणि अहिंसा शिकवणाऱ्या महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांचे अजरामर कोट्स

Image result for mahatma gandhi HD images

1. तुम्ही करोडो रुपये खुशाल मिळवा पण लक्षात ठेवा की ती संपत्ती तुमची नाही, ती जनतेची आहे

2. सोन्या चांदीचे तुकडे नाही तर तुमचे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे

3. तुम्ही मला कैदेत टाकू शकता. पण माझ्या मनाला कैद करता येणार नाही

4. तारुण्य हे वाया घालविण्यासाठी नव्हे तर विकासावर विजय मिळविण्यासाठी मिळाले आहे

5. तोडफोड, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, रास्ता रोको यासारख्या कृतींना लोकशाहीत काहीही स्थान नाही. जो अशा कृतींना प्रोत्साहन देतो त्याला लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही

6. ईश्वर सत्य आहे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा.

7. असे जगा जसे तुमचा उद्या शेवटचा दिवस आहे. असे शिका जसे तुम्हाला कायम जिवंत राहायचे आहे

8. भिती तुमच्या शरिराचा रोग आहे जो तुमच्या आत्म्याला मारतो.

9. प्रथम ते तुम्हाला हसतील, नंतर ते तुमच्याशी लढतील आणि त्यानंतर तुमचा विजय होईल

10. त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 quotes of Mahatma Gandhi on his 150th Birth Anniversary