आखाडात मारा नॉनव्हेजवर ताव, फक्त या चार हॉटेल्समध्ये!

टीम ईसकाळ
Saturday, 20 July 2019

खवय्ये पुणेकरांचे लाडके ‘हॉटेल तिरंगा’

खवय्ये पुणेकरांचे लाडके ‘हॉटेल तिरंगा’
पुण्याच्या मध्यवस्तीत, पासोड्या विठोबा मंदिराजवळ आणि दगडूशेठ गणपती मंदिरापासून अवघ्या दोन मिनिटांवर असलेले ‘हॉटेल तिरंगा’ हे व्हेज, नॉन-व्हेज चवीने खाणाऱ्या खवैय्या पुणेकरांचे लाडके ठिकाण आहे. श्रीराम आदमाने यांनी १५ ऑगस्ट १९९३ रोजी सुरू केलेल्या या व्यवसायाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आणि आजमितीला तिरंगाच्या सात शाखा पुणे, पिंपरी, कॅम्प या भागांत कार्यरत आहेत. Image result for tiranga biryani pune

पुण्यात प्रथमच तिरंगा हॉटेलने स्वतंत्र एसी रूम्स उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यात बसून ग्राहक आपले कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत खाण्या-पिण्याचा मनमुराद आनंद लुटू शकता. ज्यामुळे आपले खासगीपणही जपले जाऊ शकते. इथे मिळणारे मटण व चिकन बिर्याणी तर लोकप्रिय आहेच; पण त्याशिवाय मटण थाळी, चिकन थाळी, गावरान व बॉयलर चिकन हंडी, विविध प्रकारचे मासांचे पदार्थही ग्राहकांच्या पसंतीची दाद मिळवितात. व्हेज पदार्थातही विविध पंजाबी डिशेस, सूप्स लोकप्रिय आहेत. केवळ आखाड पार्टीचं नाही तर कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी ‘हॉटेल तिरंगा’मध्ये पार्टी करायला पुणेकरांना आवडते याची दोन मुख्य कारणे म्हणजे इथल्या पदार्थांचा आस्वाद आणि स्मित व हार्दिक या दोन मुलांसाहित श्रीराम आदमाने व संपूर्ण आदमाने कुटुंबियांकडून केले जाणारे आदरातिथ्यही होय.

मसालेदार बिर्याणी हाऊस
बिर्याणीप्रेमींसाठी उत्तम फूड जॉईंट
सदाशिव पेठ म्हटलं की, अनेक नॉनव्हेज खवय्यांसाठी जणू मांसाहारी जेवणाची पर्वणीच. येथील अनेक हॉटेल्स नॉन-व्हेजसाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये एक मुख्य म्हणजे ‘मसालेदार बिर्याणी हाऊस’. सदाशिव पेठेतील जोंधळे चौकातील या हॉटेलची सुरुवात जवळपास सव्वा वर्षांपूर्वी झाली आहे; परंतु अल्पावधीतच येथील मटण चॉप्स अंडा फ्राय या सिग्नेचर रेसिपीज ग्राहकांनी पसंत केल्या आहेत. याशिवाय येथील मटण व चिकन थाळी ग्राहकांना आवडते. बिर्याणीच्या प्रकारामध्ये येथील खास कोळशाच्या चुलीवरची शाही मटण दम बिर्याणी व शाही चिकन दम बिर्याणी प्रसिद्ध आहे. अनिकेत रामकृष्ण फुले व विनय रवींद्र कुदळे या बंधूंनी होम डिलिव्हरीच्या आपल्या अनुभवातून हे हॉटेल सुरू केले आहे आणि ग्राहकांकडून त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी रूम देखील असल्यानेे अनेक फॅमिलीज चविष्ट, लज्जतदार, मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून येतात. हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतलेल्या या बंधूंचे ‘मसालेदार बिर्याणी हाऊस’ आणखी प्रशस्त होईल असा आत्मविश्‍वास त्यांनी दाखविला आहे. मसालेदार बिर्याणी हाऊसमध्ये ग्राहकांच्या सुविधेसाठी किलोप्रमाणे ऑर्डर स्वीकारल्या जातात. तसेच येथे सर्व प्रकारची डेबिट व क्रेडिट कार्ड्‌स स्वीकारली जातात. यामुळे या वैशिष्ट्यपूर्ण हॉटेलमध्ये आखाड साजरा करण्यासाठी ग्राहकांनी जरूर यावे, असे आवाहन या दोघांनी केले आहे.

chicken

महाराष्ट्रात कुठेच नाही मिळणार... ते 'श्रीमंत'मध्ये मिळणार!!!
नमस्कार पुणेकर, सलग १४ वर्षे तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे खूप आभार ! खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय आमची तिसरी शाखा तेही थोडं वेगळ्या ढंगात, कोल्हापुरी जेवणाची चव पुण्यालाही अनुभवता यावी, मग ते कोंबडी वडे असो वा चिकनचा झणझणीत काळा रस्सा, तुपातील भाकर वा चिकनच्या आळणीत शिजवलेला भात या सगळ्या आमच्या स्पेशल डिशेससहित आम्ही आलोय सदाशिव पेठेत, निंबाळकर तालीम चौकात मटका बिर्याणीची सोबत. आषाढ सुरू झाला की, नाॅन-व्‍हेज खवय्यांना आखाडाचे वेध लागतात आणि मग पावले वळतात ती सदाशिव पेठेतल्या हॉटेल श्रीमंतकडे, कारण नॉन-व्‍हेजमधल्या आगळ्या डिशेससाठी हॉटेल श्रीमंत संपूर्ण पुण्यात सुप्रसिद्ध आहे. श्रीमंतचे माहाेल इतके सुंदर आहे की, खाण्यासोबतच गप्‍पाही मस्‍त रंगतात. तर यंदाही हॉटेल श्रीमंत आखाडासाठी सज्‍ज आहे.

biryani

हॉटेल महाबळेश्वर - इथली चवच लय भारी 
कात्रज-कोंढवा रस्त्यावर   व्हेज, नॉन-व्हेज खवैय्यांसाठी अनेक हॉटेल्स आहेत, पण इथे एक फॅमिली रेस्टॉरंट अल्पवधीतच प्रसिद्ध झाले आहे आणि ते म्हणजे हॉटेल महाबळेश्वर. आता लवकरच श्रावण सुरू होणार आहे. त्यामुळे येथील अनेक लज्जतदार, चविष्ट डिशेसची भुरळ ग्राहकांना नक्कीच पडेल. शाकाहारी खवैय्यांसाठी पनीर पंजाबी टिक्का, पनीर हॉट पॅन , चीज चिली शीग कबाब, क्रिस्पी चिली पोटॅटो,  नॉन व्हेज  खवैयांसाठी चिकन अंगारी टिक्का, चिकन अफगाणी कबाब, चिकन हॉट पॅन, चिकन ओरिएंटल कॉरिएंटल असे अनेक मस्त मस्त स्टार्टर्स इथे मिळतात. मेन  कोर्समध्ये महाबळेश्वर स्पेशल व्हेज, व्हेज ताज पनीर पापडी मसाला, पनीर खजाना अशा व्हेज डिशेस, नॉन-व्हेजमध्ये चिकन खजाना, चिकन मालवणी, मुर्ग मुसल्लम अशा बहारदार डिशेस ग्राहकांना खूप आवडतात.

biryani

बिर्याणीच्या   प्रकारांमध्ये  व्हेज मटका बिर्याणी, चिकन मटका बिर्याणी, मटण  मटका बिर्याणी, प्रॉन्स मटका बिर्याणी असे बिर्याणीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय उत्तम सी फूड देखील खूप ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. इथे जवळपास २०० ग्राहक एकाच वेळी बसू शकतील एवढी प्रशस्त जागा असून, आकर्षक आणि मनमोहक सजावट, फॅमिलीसाठी खास एअर-कंडिशन बैठक व्यवस्था , सर्व पदार्थांचा उत्तम दर्जा, स्वच्छता, सस्मित सेवा तसेच चांगले आदरातिथ्य यांमुळे डिसेंबर १८ मध्ये सुरू झालेले हॉटेल महाबळेश्वर सात महिन्यांत सर्वांनी पसंत केलेले हॉटेल आहे हे नक्की. अनेकजण आपल्या मित्रपरिवारासोबत, कुटुंबासोबत इथे  आवर्जून येतात आणि इथल्या विविध डिशेसचा आस्वाद घेतात. या हॉटेलचे व्यवस्थापन अमित शेट्टी व हरीश शेट्टी यांचे असून, या हॉटेलमध्ये  ग्राहकांनी  ‘आखाड’ साजरा करावाच, पण इतर वेळी पण अवश्य यावे आणि आपला स्नेह  वाढवावा, असे आवाहन हॉटेल महाबळेश्वरचे  मालक महेश चोरगे यांनी केले आहे.

mahabaleshwar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 best hotels for non veg in pune