प्रेमाच्या गावा जावे (आरती मिश्रा)

आरती मिश्रा (जन्म - १९७७) प्रसिद्ध हिंदी कवयित्री
रविवार, 18 डिसेंबर 2016

तुझी हृदयरेषा

किती दाट आणि ठसठशीत आहे
तुझ्या तळहातावरच्या रेषांचं जाळं
लहान-मोठ्या, सूक्ष्म-अतिसूक्ष्म रेषा...

लहान मुलानं कागदावर चिडबिडून
ठेवलेली गिचमिडच जणू !

या रेषांशी खेळत राहणं
हा आता माझ्या
सवयीचाच भाग बनून गेलाय...

त्या रेषांना स्पर्शणं...
त्या चाचपणं...
खरवडणंही !

आणि त्या रेषांमधून काहीतरी
वाचण्याचा प्रयत्न करत राहणं

मी हे असं काहीबाही करत राहते
अन्‌ त्यात कधी कधी तूही होतोस सहभागी

त्या रेषांमधून काही वाचण्याचा प्रयत्न
तूही करत राहतोस माझ्याबरोबर

तुझी हृदयरेषा

किती दाट आणि ठसठशीत आहे
तुझ्या तळहातावरच्या रेषांचं जाळं
लहान-मोठ्या, सूक्ष्म-अतिसूक्ष्म रेषा...

लहान मुलानं कागदावर चिडबिडून
ठेवलेली गिचमिडच जणू !

या रेषांशी खेळत राहणं
हा आता माझ्या
सवयीचाच भाग बनून गेलाय...

त्या रेषांना स्पर्शणं...
त्या चाचपणं...
खरवडणंही !

आणि त्या रेषांमधून काहीतरी
वाचण्याचा प्रयत्न करत राहणं

मी हे असं काहीबाही करत राहते
अन्‌ त्यात कधी कधी तूही होतोस सहभागी

त्या रेषांमधून काही वाचण्याचा प्रयत्न
तूही करत राहतोस माझ्याबरोबर

तुला तर काही काही
नावंसुद्धा ठाऊक आहेत !

* * *

बाहेर पाऊस कोसळतोय
तिकडं बरसणाऱ्या मोठमोठ्या थेंबांकडं
मी पाहतेय काचेच्या भिंतीमधून...

आजची रात्र अमावास्येसारखी काळी
आणि भीतिदायक आहे
पण मला अजिबात भीती वाटत नाहीय...!

तुझ्या हस्तरेषांचे अगणित स्पर्श
थोपटत आहेत मला...
त्या रेषांमध्ये कदाचित एक हृदयरेषाही असते

जेव्हा तुला गाढ झोप लागून गेलेली असते तेव्हा
ती रेषा माझ्याबरोबर
रात्रभर जागत राहते...

ती रेषा माझा हात हाती घेऊन
पुनःपुन्हा गुणगुणत राहते तीच कविता...
जी मला ऐकायची असते वारंवार !

Web Title: aarti mishra's poem in saptarang

टॅग्स