दहावीनंतर सायन्सला ऍडमिशन घ्यावी का?

science
science

वाटा करिअरच्या 

आपण आजच्या लेखाची सुरवात अकरावी सायन्स घेऊन अडचणीत आलेल्या पालकांसाठी चार शब्दांनी करूयात. छानसा क्‍लास लावून कॉलेजच्या जोखडातून सुटका करून घेतलेले सारेच पालक या गटात प्रामुख्याने मोडतात. ज्यांचे छान चालले आहे, त्यांचा प्रश्‍नच नाही. पण अनेकांना जून उजाडला तरी अकरावीचा निकालच मिळालेला नाही किंवा समजलेला नाही. असा एक मोठा गट दरवर्षी असतो. क्‍लासच्या टेस्टचे मार्क त्यांना आवर्जून पाठ असतात. अशा साऱ्यांनी अकरावी "पीसीएमबी'चे गुण आवर्जून अभ्यासावेत. ते पन्नासपेक्षा कमी असल्यास त्यांनी खडबडून जागे होण्याची गरज आहे. सोप्या शब्दांत म्हणजे छानसा क्‍लास आपल्यासाठी उपयुक्त नाही. आपला पाल्य तिथे फक्त जात आहे, शिकत नाहीये. तशीच सूचना कॉमर्ससाठीची. अकरावीला सत्तर टक्के नसल्यास सीएचा रस्ता सध्या नको. त्याचा क्‍लासही नको. दहावीचे टक्के जितके लवकर विसराल तेवढे उत्तम. 

इयत्ता बारावी झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला खरेतर स्वत:ला कोणते विषय कळतात, कठीण जातात याचा किमान अंदाज आलेला असतो. मग फिजिक्‍स न कळणाऱ्यांनी, गणिताचे भीती वाटणाऱ्यांनी कॉम्प्युटर, इंजिनिअरिंग याच्या वाटेला निव्वळ प्रवेश मिळतो म्हणून जायचे का, याचा दहा वेळा तरी विचार करावा. त्यातूनही सामान्य ठोकताळा असे सांगतो की बारावी शास्त्रात साठ टक्के व सीईटीमध्ये साठ (म्हणजे तीस टक्के) गुण असतील त्यांचे इंजिनिअरिंग लांबते तरी किंवा अनेकांचे अडकतेही.

बारावी कॉमर्स झालेल्या साऱ्यांनीच सीपीटी किंवा फाउंडेशनचा क्‍लास लावून फायदा होत नाही. इथेसुद्धा त्या परीक्षेचा किमान अभ्यास झेपण्याचा विचार गरजेचा असतो. इकॉनॉमिक्‍स व गणित हे विषय त्यासाठी महत्त्वाचे ठरतात. केवळ टक्केवारीचा इथे फारसा उपयोग होत नाही. म्हणून सायन्ससाठीचा ठोकताळा वापरता येत नाही. खरेतर सर्वच बारावीवाल्यांनी बारावीनंतरच्या जाता येणाऱ्या डझनभर रस्त्यांची माहिती घ्यावी. ग्राफिकच्या माध्यमातून ती याआधीच या लेखमालेत येऊन गेली आहे. यानंतर अर्थातच आपण पदवीनंतरच्या विविध वाटांकडे पुन्हा वळणार आहोत. जून, जुलैमध्ये पदवीधरांचे निकाल सुरू होतात म्हणून. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com