सोशल मीडियावरचं गाजलेलं... (अंबर कर्वे)

सोशल मीडियावरचं गाजलेलं... (अंबर कर्वे)

‘संधीसाधू’ बना

  •   १९३८ मध्ये ली-ब्युंग-च्युलनं ही कंपनी किराणा मालाचं दुकान म्हणून सुरू केली.
  •   १९४० मध्ये किराणा व्यापारातल्या अतिस्पर्धेमुळे शिल्लक मालातून त्यांनी ‘नूडल्स’ बनवून विकायला सुरवात केली.
  •   १९५० मध्ये नूडल्सचा व्यवसाय सोडून साखर उत्पादन करायला सुरवात केली.
  •   १९५४ मध्ये त्यांनी साखर सोडून चक्क लोकरीचे कपडे तयार करून विकायला सुरवात केली.
  •   १९५६ मध्ये लोकरीचे कपडे सोडून वेगळाच म्हणजे विमा आणि ठेवींचा व्यवसाय सुरू केला.
  •   १९६० मध्ये विमा आणि ठेवींचा व्यवसाय सोडून ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या उत्पादनात उतरले.
  •   १९८० मध्ये त्यांनी टेलिफोनचे स्विचबोर्ड बनवण्याकडे आपला मोर्चा वळवला.
  •   १९८७- संस्थापक-मालक ‘ली’ मरण पावले. त्यानंतर कंपनीचं डिपार्टमेंटल स्टोअर, रासायनिक आणि पुरवठा, कागद/टेलिफोन आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स अशा चार भागात विभाजन झालं.
  •   त्याच वर्षी त्यांनी सेमी कंडक्‍टर्समध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करण्याकडं आपलं लक्ष केंद्रित केलं.
  •   १९९० च्या दशकात, दक्षिण आशियाई सेमी कंडक्‍टर्समध्ये आपली गुंतवणूक करत असताना, यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सोडून ‘रिअल इस्टेट’मध्ये लक्ष घातलं. अल्पावधीतच मलेशियात जगातले सध्याचे सगळ्यात उंचीचे पेट्रोनास टॉवर्स, तैवानमध्ये तैपई, दुबईत प्रसिद्ध ‘बुर्ज खलिफा’ या उत्तुंग इमारती बांधल्या.
  •   १९९३ मध्ये नवीन सीईओ झालेल्या लीच्या मुलानी जागतिक मंदीमुळे कंपनीचा अवास्तव आकार कमी करून (डाउनसायझिंग) लहान उपकंपन्या विकत कंपनी पुन्हा एकत्र केली. सगळ्या कंपन्या एकत्र केल्यावर ‘मेमरी चिप्स’ बनवणारी ही जगातली सगळ्यांत मोठी कंपनी बनली.
  •   १९९५ मध्ये त्यांनी ‘एलसीडी स्क्रीन्स’ बनवायला सुरवात केली आणि दहा वर्षात फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन बनवणारे ते जगातले सगळ्यात मोठे उत्पादक बनले.
  •   २०१० मध्ये एलसीडी क्षेत्रातल्या गळेकापू स्पर्धेनंतर त्यांनी पुढच्या दहा वर्षाच्या व्यवसायवृद्धीची योजना आखली.
  •   सध्या आयफोनपेक्षाही दुपटीने फोन विकत, आता ते जगातले सगळ्यात मोठे मोबाईल फोन निर्माते बनले आहेत.
  •   या कंपनीचं नाव आहे - सॅमसंग
  • दक्षिण कोरियाच्या निर्यातीतला वीस टक्के वाटा फक्त एकट्या ‘सॅमसंग’चा आहे.
  •   सध्याची वार्षिक विक्री २५० बिलियन डॉलर्स (+)
  •   रुपयांतच बघायचं असेल, तर साधारण १,६२,५०,००,००,०००

...सारांश ः व्यवसाय जर थंडावत असेल/भविष्यातल्या संधी दिसत नसतील, तर उगाच जुन्या श्रीमंतीच्या आठवणींना चिकटून राहू नका. एकाच एक गोष्टीला चिकटून राहण्यात पाण्याचं डबकं बनायचा धोका जास्ती असतो. स्वतःला कालानुरूप बदललं नाही, तर अडगळीत जाण्याचा धोका जास्त. त्याच वेळी नवीन क्षेत्राकडे डोळसपणे पाहा. बिझनेसमनकरिता धोका पत्करणं हे आयुष्य आहे. त्यामुळं आपल्या व्यवसायाच्या भविष्याचा आढावा घेत राहा. आपल्या व्यवसायाची कल्पना जुनी होत असेल, तर बदल करायला घाबरू नका. चांगल्या अर्थाने ‘संधीसाधू’ बना, डबक्‍यात पोहत बसण्यापेक्षा ते कित्येक पटीनं चांगलं. व्यवसाय क्षेत्रातील धरसोडीचं समर्थन करणे हा या लेखाचा उद्देश नाही. मुळात उपदेश करण्याएवढा मी निश्‍चित मोठा नाही. मॅनेजमेंटचं थोडंफार शिक्षण, वेगवेगळ्या क्षेत्रांत फटके खात घेतलेले अनुभव, त्यातून आलेले किंचित शहाणपण यातून ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ अशा प्रकारे उपयोग होऊ शकेल म्हणून व्यक्त केलेला सारांश आहे.
पुणेरी तळटीप- ‘सॅमसंग’च्या फोनबद्दलच्या तक्रारी असतील, तर त्यांच्या ‘डीलर्स’कडे कराव्यात, इथं नाही.
(सोशल मीडियामध्ये लोकप्रिय झालेल्या
पोस्ट्‌स या सदरात समाविष्ट करण्यात येतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com