प्रेमाच्या गावा जावे (अमृता भारती)

अमृता भारती
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

आठवण

...तेव्हा कुणीच नसतं
माझ्या आसपास
माझ्या सोबत
असतो केवळ तो
त्याच्या विचारांतून...
त्याच्या आठवणींतून...
आणि
त्याच्याविषयीच्या जाणिवांतून...

मी बाहेर येते
निर्जन रानवाटेवर
उदयाला येत असलेल्या
चंद्राच्या दिशेनं निघते
किंवा
मी आतल्या भागात जाते
जिथं
खडकाशी लगटून
वाहत असते छोटीशी जलधार...

आठवण
किती एकटं,
किती एकाकी बनवून टाकते
मला
त्याच्यासोबत!

आठवण

...तेव्हा कुणीच नसतं
माझ्या आसपास
माझ्या सोबत
असतो केवळ तो
त्याच्या विचारांतून...
त्याच्या आठवणींतून...
आणि
त्याच्याविषयीच्या जाणिवांतून...

मी बाहेर येते
निर्जन रानवाटेवर
उदयाला येत असलेल्या
चंद्राच्या दिशेनं निघते
किंवा
मी आतल्या भागात जाते
जिथं
खडकाशी लगटून
वाहत असते छोटीशी जलधार...

आठवण
किती एकटं,
किती एकाकी बनवून टाकते
मला
त्याच्यासोबत!

- अमृता भारती
(जन्म ः १९४०) विख्यात हिंदी कवयित्री
(‘प्रेम’ या विषयाचे विविध पैलू उलगडणाऱ्या विविध कवींच्या अनुवादित /भावानुवादित कविता या सदरातून वाचायला मिळतील.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amruta bharti's poem

टॅग्स
फोटो गॅलरी