उब 'माणुसकीच्या भिंती'ची...

अनिल पवार
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

समाजातील गरजूंची, छोट्या छोट्या गोष्टींनाही पारखे असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन- चार नव्हे, तर हजारो हात पुढे येण्याची गरज आहे. मागे पडलेल्या घटकांना त्यामुळे स्वप्न पाहण्याचं नि ते जिद्दीनं साकारण्याचं बळ मिळेल. समाजाच्या चांगुलपणाचा अनुभव पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हुरूप देईल.

समाजातील गरजूंची, छोट्या छोट्या गोष्टींनाही पारखे असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन- चार नव्हे, तर हजारो हात पुढे येण्याची गरज आहे. मागे पडलेल्या घटकांना त्यामुळे स्वप्न पाहण्याचं नि ते जिद्दीनं साकारण्याचं बळ मिळेल. समाजाच्या चांगुलपणाचा अनुभव पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हुरूप देईल.

इतरांना काही देण्यासाठी आधी मन मोठं असावं लागतं, सहृदय असावं लागतं. समोरच्याने स्वत...ची गरज बोलून न दाखविताही ती लक्षात येण्यासाठी संवेदनशीलता सजग असायला हवी. न मागता आपण गरजूंना काही देऊ शकलो, तेही त्यात काही विशेष आहे, असं न भासवता, तर ते अधिक मोलाचं. गरजूला मदतीचा हात देऊन त्याला उभारी देण्यात, त्याच्या आयुष्यात आनंद फुलविण्यात जे समाधान मिळतं, त्याची तुलना कशाशी होऊ शकेल? तुम्ही किती नि काय देणार आहात हे महत्त्वाचं नाही, तर इतरांसाठी काही करण्याची तुमची इच्छा आहे नि तुम्ही तुमच्या परीनं खारीचा वाटा उचलता हे अधिक महत्त्वाचं. मात्र हे करताना त्याचं प्रदर्शन केलं, गाजावाजा केला, की त्यातला अहंभाव, पोकळपणा जाणवतो. तेव्हा हे सगळं सहजगत्या व्हायला हवं. त्याच्या जोडीला इतरांना असं काही देण्याचा, इतरांविषयी संवेदनशील असण्याचा वसा पुढच्या पिढीच्या हाती द्यायला हवा. त्यांच्यावर माणुसकीचा संस्कार होण्यासाठी आणि समाजाशी असलेली नाळ तुटू नये यासाठी हे गरजेचं आहे.

अगदी साध्या साध्या गोष्टींपासूनही वंचित राहिलेल्यांची जाणीव ठेवून आपल्यापैकी बरेच जण काही ना काही करीत असतात. पण काही वेळा नेमकी कोणाला कसली गरज आहे नि त्यांच्यापयरत कसं पोहोचायचं हे माहीत नसल्यानं आणि कधी वेळ नसल्यानं इच्छा असूनही प्रत्यक्ष मदत करता येत नाही. तर काही वेळा ही मदत सत्पात्री पडते की नाही, अशीही शंका मनात असते. अशा परिस्थितीत सेवाभावी संघटनांच्या माध्यमातून गरजूंपयरत मदत पोहोचविता येऊ शकते. या बाबी लक्षात घेऊन इतरांसाठी काही करण्याची इच्छा असलेली मंडळी व गरजू यांच्यात दुवा बनण्याचं काम शिवराष्ट्र प्रतिष्ठान आणि "दृष्टी हेल्पिंग हॅंडस टू निडी आईज' या संघटनांनी हाती घेतलं आहे.

आपल्याला नको असलेल्या, पण सुस्थितीत असलेल्या नि इतरांना वापरता येतील अशा वस्तू म्हणजे कपडे, चादरी, उबदार कपडे, खेळणी आदी गोळा करून गरजूंना त्याचे वाटप करणे असे त्यांच्या उपक्रमाचे स्वरूप आहे. अकोला व कोल्हापूरमध्ये या उपक्रमाला प्रारंभ झाला आणि गेल्या आठवड्यात पुण्यात दोन ठिकाणी त्याला सुरवात झाली. हडपसरमध्येही शहीद भगतसिंग ट्रस्ट आणि व्हिजन हडपसर ट्रस्टतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे नाव आहे "भिंत उबदार माणुसकीची'. "नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा', ही त्यांची कॅचलाईन त्यांच्या कामाचे स्वरूप स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. या भिंतीपाशी कार्यकर्ते कपडे व वस्तूंचा स्वीकार करीत असतात. या कामात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी कार्यकत्यारनी कल्पकतेने भिंती रंगविल्या आहेत.

सार्वजनिक वा खासगी इमारतींच्या भिंतीवर व्यावसायिक, वा प्रचारकी स्वरूपाच्या बटबटीत जाहिराती पाहण्याची सवय झालेल्या आपल्या डोळ्यांना ही "माणुसकीची भिंत' वेगळी दृष्टी देते. रस्त्याने जाणाऱ्या लोकांना त्यांच्यातील माणूसपणाला आवाहन करणारी ही भिंत म्हणजे "आहेरे' व "नाहीरे' वर्गातील तफावतीची भिंत दूर व्हावी याकरिता या कार्यकत्यारनी टाकलेले छोटेसे पाऊल आहे. अशा छोट्या पावलांतूनच मोठी वाटचाल शक्‍य होत असते. वैयक्तिक वा संघटनात्मक पातळीवरील अशा प्रयत्नांमधूनच चांगले काही आकाराला येत असते. गेल्याच आठवड्यात आणखी अशाच एका बातमीने लक्ष वेधून घेतले. ती होती पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यातील शालेय विद्याथ्यारना काही संस्थांच्यावतीने 25 सायकलींचे वाटप करण्यात आल्याची. मावळ तालुक्‍यातील काही दूरच्या गावांमध्ये एसटीची सोय नाही किंवा एसटीच्या वेळा सोईच्या नाहीत. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी अनेक मुलींना रोज आठ- दहा किलोमीटरची वाट तुडवावी लागते. त्याची बातमी सात-आठ वषारपूर्वी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध करून आम्ही या समस्येकडे लक्ष वेधले. त्या बातमीचा अपेक्षित परिणाम झाला आणि या "सावित्रीच्या लेकीं'ची शिक्षणाची वाट सुकर व्हावी म्हणून पुण्यातील काही संघटना, पुढे आल्या नि त्यांनी या विद्यार्थिनींना सायकली पुरविल्या. तेव्हा गरजू व त्यांना मदतीचा हात देऊ इच्छिणारे यांना एकत्र आणून एका समस्येवर काही प्रमाणात का असेना मार्ग काढल्याचा आनंद झाला. त्यानंतरही वेळोवेळी विविध संस्था अशा विद्याथ्यारना सायकली पुरवीत आहेत.

या उपक्रमाबाबत वेगळी अन2 सुखावणारी बाब पुढेच आहे. ज्या मुलांना सायकली मिळाल्या, त्यांनी ती स्वत... ची वैयक्तिक मालमत्ता न समजता शाळेत "सायकल बॅंक' स्थापन केली आणि शाळेतील आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही सायकल या बॅंकेत जमा करून नव्या विद्याथ्यारची सोय केली. स्वत...च्या अडचणीच्या वेळी इतरांकडून मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवून आपल्यासारख्याच गरजूंना हात देणं हा संस्कार बालवयात अशा मार्गाने रूजविता आला, रूजला तर आणखी काय हवं?

समाजातील गरजूंची, छोट्या छोट्या गोष्टींनाही पारखे असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. तेव्हा त्यांच्यापयरत पोहोचण्यासाठी दोन- चार नव्हे, तर हजारो हात पुढे यायला हवेत. छोट्या कामातून का असेना, आपल्या क्षमतेनुसार जेवढं शक्‍य आहे तितकं का असेना, पण अशी कामं सुरू राहायला हवीत. कारण मागे पडलेल्या घटकांना त्यामुळेच स्वप्न पाहण्याचं नि ते जिद्दीनं साकारण्याचं बळ मिळेल. आपल्या छोट्याशा कृतीनं त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल. समाजाच्या चांगुलपणाचा हा अनुभव पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हुरूप देईल. समाजातील ठराविक वर्गानेच पुढे जाणे पुरेसे नाही अन2 ते यो1नाही. अन्य घटकांनाही आपण आपल्याबरोबर घ्यायला हवे. त्यातून दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले... असं म्हणता यावं यासाठी हे माणुसकीचे दीप आपण तेवत ठेवायला हवेत.

Web Title: Anil Pawar write about social issue