स्मशानभूमी... पाळीव प्राण्यांची!

पॅरिसमध्ये असलेली प्राण्यांची स्मशानभूमी फक्त नागरिकांच्या प्राणीप्रेमातूनच सुरू झालेली नाही. पर्यावरण वाचवणं आणि प्रदूषण कमी करणं हा त्यामागचा हेतू होता...
animal cemetery in Paris love for animals save  environment and reduce pollution
animal cemetery in Paris love for animals save environment and reduce pollutionsakal
Summary

पॅरिसमध्ये असलेली प्राण्यांची स्मशानभूमी फक्त नागरिकांच्या प्राणीप्रेमातूनच सुरू झालेली नाही. पर्यावरण वाचवणं आणि प्रदूषण कमी करणं हा त्यामागचा हेतू होता...

- रोहिणी गोसावी

फ्रेंच नागरिकांचं श्वानप्रेम जगविख्यात आहे. मात्र पॅरिसमध्ये असलेली प्राण्यांची स्मशानभूमी फक्त नागरिकांच्या प्राणीप्रेमातूनच सुरू झालेली नाही. पर्यावरण वाचवणं आणि प्रदूषण कमी करणं हा त्यामागचा हेतू होता... या स्मशानभूमीच्या जन्मकथेसह, प्राण्यांच्या गोष्टीही चकित करणाऱ्या आहेत...

animal cemetery in Paris love for animals save  environment and reduce pollution
Animal husbandry March : पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांकडून २५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा

प्रसिद्ध फ्रेंच लेखक व्हिक्टर हुगो यांनी म्हटलंय की, ‘तुम्ही तुमच्या कुत्र्याच्या डोळ्यात पाहिलं तर तुम्ही हे कधीही म्हणू शकणार नाही की, त्यात आत्मियता नाही.’ पॅरिसच्या दफनभूमीत फिरताना व्हिक्टर हुगोच्या या वाक्याचा पावलोपावली प्रत्यय येतो.

जिवंतपणी जेवढं प्रेम हे प्राणी आपल्याला देतात, तेवढ्याच प्रेमानं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणी जपून ठेवणारी ही जागा म्हणजेच पॅरिस शहरातील पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी. १८९९ मध्ये सुरू झालेल्या या स्मशानभूमीत जवळपास ४० हजार प्राणी चिरनिद्रा घेत आहेत.

animal cemetery in Paris love for animals save  environment and reduce pollution
Gaur Animal : आंदगावला गवा ग्रामस्थांमध्ये भिती

आधुनिक काळात पाळीव प्राण्यांसाठीची ही जगातली पहिलीच सार्वजनिक स्मशानभूमी असल्याचे सांगितले जाते. १८९०च्या दशकात फ्रेन्च नागरिक आपल्या प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांना सेन नदीत सोडून देत. त्यामुळे नदी आणि एकूणच पॅरिसमध्ये प्रदूषण वाढायला सुरुवात झाली होती.

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी १८९८ मध्ये फ्रेंच सरकारने कायदा केला की, कुणीही त्यांच्या मृत पाळीव प्राण्यांना कचऱ्यात किंवा नदीत सोडून देऊ शकत नाही. एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला, तर त्याला लोकवस्तीपासून १०० मीटरच्या अंतरावर एक फूट खोल खड्ड्यात पुरलं जावं.

त्यातूनच प्रख्यात स्त्रीवादी पत्रकार म्हणून ओळख असलेल्या मार्गारेट दुरॉन्द आणि पेशाने वकील असलेल्या जॉर्ज हारमुवा यांनी १८९९ मध्ये पॅरिसच्या उपनगरात सेन नदीच्या काठावर ही स्मशानभूमी तयार केली आणि प्राण्यांना मृत्यूनंतरची हक्काची जागा मिळाली.

१९८७ मध्ये पॅरिसच्या लोकल काऊन्सिलनं ही स्मशानभूमी बंद करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र या निर्णयाविरुद्ध पॅरिसच्या स्थानिकांनी आणि स्मशानभूमीत ज्यांनी आपले प्राणी दफन केले होते, अशा सर्व नागरिकांनी एकत्र येऊन या निर्णयाच्या विरोधात मोठा लढा दिला.

animal cemetery in Paris love for animals save  environment and reduce pollution
Subsidy on Milch Animals: दुधाळ जनावरे खरेदी अनुदानात दुपटीने वाढ! जाणुन घ्या लाभ

जनरेट्यामुळे काऊन्सिलला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. त्यानंतर या स्मशानभूमीला ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं. याची देखभाल सरकार करते. दफनभूमी सुरू केली तेव्हा त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता; मात्र प्रयत्न केल्यानंतर आठ वर्षात चार हजार पाळीव प्राणी इथे दफन केले गेले. १९३४ पर्यंत २० हजार प्राण्यांना इथे चिरविश्रांती मिळाली होती.

स्मशानभूमीच्या गेटमधून आत गेलं की समोर दिसतं ते सेंट बर्नांड या कुत्र्याचं स्मारक. एक मुलगी त्याच्या पाठीवर बसून जणू त्याची राईड घेतेय, असंच आपल्याला वाटतं. हे स्मारक आहे, बॅरी या कुऱ्याचं.

स्वित्झरलँडच्या सेंट बर्नार्ड पासमध्ये तो माऊंटन रेस्क्यू डॉग होता. त्याच्या कार्यकाळात झालेल्या युद्धांमध्ये बॅरीने ४० लोकांना वाचवलं होतं. त्याचंच प्रतीक म्हणून त्याच्या पाठीवर ती वाचवलेली मुलगी आहे, असं म्हणतात.

या स्मारकावर लिहिलंय, की ‘त्यानं ४० नागरिकांना वाचवलं आणि ४१ व्या व्यक्तीकडून त्याचा मृत्यू झाला.’ त्याच्या मृत्यूच्या अनेक आख्यायिका आहेत. त्या किती खऱ्या, किती खोट्या माहीत नाही. असं म्हटलं जात की, बर्फात गाडल्या गेलेल्या ४० माणसांना वाचवल्यानंतर बॅरी एका सैनिकाला शोधत होता.

animal cemetery in Paris love for animals save  environment and reduce pollution
Leopard Calf Found : शेतात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळल्याने परिसरात घबराट

जवळपास ४८ तास शोधल्यानंतर बॅरीने बर्फात गाडला गेलेला सैनिक शोधला. बॅरीनं बर्फ उकरून ट्रेनिंगनुसार सैनिकाला चाटायला सुरुवात केली; पण बॅरीला लांडगा समजून त्या सैनिकानं त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार केला.

या हल्ल्यात बॅरीचा मृत्यू झाला; पण ही गोष्ट खरी नसल्याचं बॅरीसोबत काम केलेल्या अनेकांनी लिहून ठेवलंय. बॅरीच्या मृत्यूनंतर त्याची हाडं या दफनभूमीत पुरण्यात आली, तर त्याची कातडी टॅक्सीडर्मीच्या माध्यमातून स्वित्झरलँडच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवण्यात आली आहे.

बॅरीसारखेच आपापल्या काळात प्रसिद्ध असलेले अनेक प्राणी इथं कायमचे विसावलेत. चित्रपटात काम केलेले प्राणी, लष्करात देशासाठी योगदान दिलेले श्वान तसेच हॉर्स रेसमधील प्रसिद्ध घोडा अशा अनेक प्राण्यांना या दफनभूमीने सामावून घेतलंय. बॅरीच्या शेजारीच मार्गारेट दुरॉन्द यांच्या घोड्याला दफन करण्यात आलं.

कुत्र्यांसाठी असलेल्या या दफनभूमीत दफन करण्यात आलेला तो पहिला घोडा होता. सुरुवातीला ही दफनभूमीत फक्त कुत्र्यांसाठी सुरू करण्यात आली होती. मात्र हळूहळू इतर पाळीव प्राण्यांसाठीही या दफनभूमीची दारं उघडी करण्यात आली. सध्या इथं कुत्र्यांपेक्षा जास्त संख्या मांजरीची असल्याचं सांगितलं जातं.

animal cemetery in Paris love for animals save  environment and reduce pollution
Pune News : मोटार सायकल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळीतील नऊ जणांना अटक

बॅरीच्या जवळच फ्रान्सच्या ग्रँड आर्मिडॉगची समाधी आहे. तो नेपोलियनच्या काळातील कुत्र्याचा वंशज असल्याचं तिथं लिहिलंय. इथे कुत्र्यांसोबतच मांजरी, ससे, पक्षी यांनाही पुरण्यात आलंय. यातल्या अनेक हेड स्टोन्सवर त्या प्राण्यासोबत, त्यांच्या पालकांचेही फोटो लावलेत.

या प्राण्यांनी आपल्या मालकांवर किती जीव लावला होता, हे इथं कोरलेल्या संदेशावरून कळतं. कीकी नावाच्या माकडाचं थडगंही इथं आहे. त्यावर लिहिलंय की, तू आयुष्यभर आम्हाला प्रेम दिलंस, आता तू आराम कर!

पॅरिस पोलिसांच्या डॉग स्क्वॉडमधल्या लाईफ गार्ड असलेल्या कुत्र्याचं स्मारक इथे आहे. स्मारकात कुत्रा एकदम ऐटीत बसला आहे. त्यावरून तो त्याच्या आयुष्यात किती ऐटीत जगला असेल, त्याची एक झलक मिळते.

डॉली नावाच्या कुत्रीचे स्मारक इथे आहे. तिने दुसऱ्या महायुद्धात फ्रेंच कडवी झुंज द्यायला कसे तयार आहे, हा संदेश देण्यासाठी पॅराशूटने विमानातून उडी घेतली होती. १९१२ मध्ये या स्मारकाचं उद्‌घाटन करण्यात आलं होतं.

ड्रापो हा युद्धात शहीद झालेला कुत्रा आहे. त्याचा कायम सन्मान करता यावा म्हणून त्याला इथं ठेवण्यात आलंय. कोकॅटोची ओळख दाखवणारा एक दगड दिसतो. १९२२ मध्ये त्याला इथं पुरण्यात आलंय. त्याच्याच जवळ बकरीसुद्धा आपल्याला दिसते.

animal cemetery in Paris love for animals save  environment and reduce pollution
Mumbai News : आमदार सदा सरवणकरांना दिलासा...गोळीबार प्रकरणी क्लीन चीट?

हॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेला रिन टिन टिन... त्याची कबर इथं आहे. आता तुम्ही म्हणाल की, त्याची कबर इथं कशी... तर पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैन्यातल्या ली ड्युकन या सैनिकानं रिन टिन टिनला फ्रान्सच्या फ्लेरी या गावातून वाचवले होते.

त्याला तो अमेरिकेत घेऊन गेला. त्याला ट्रेनिंग दिल्यावर तो एका मुकपटात झळकला आणि खूप फेमस झाला. त्यानंतर त्यानं २७ हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं. १९३२ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याला अमेरिकेवरून पॅरिसला आणून पुरण्यात आलं. असं म्हटलं जातं की, रिन टिन टिन जगभर इतका प्रसिद्ध झाला, की त्यानंतर जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यांना पाळण्याची क्रेझच सुरू झाली.

आपल्या पाळीव प्राण्यांची ओळख, त्यांच्या प्रेमाची आठवण कायम राहावी, यासाठी देशाबाहेरचे अनेक प्राणी या ठिकाणी दफन केले आहेत. रोमानियन राजकुमारीच्या आवडत्या कुत्र्यालाही इथं जागा देण्यात आली. आपल्या प्राण्यांची आवडती खेळणी, त्यांचे फेवरेट जेवण इथं ठेवले आहे. अनेक ठिकाणी ख्रिसमसचं गिफ्ट आणि छानसं डेकोरेशन केलेलं दिसतंय.

या स्मशानभूमीमधलं ४० हजारावं थडगं आहे एका भटक्या कुत्र्याचे. योगायोग असा की, या स्मशानभूमीच्या गेटवरच येऊन त्याचा मृत्यू झाला होता. जिवंत असताना नाही, तर किमान मृत्यूनंतर तरी त्याला हक्काची जागा मिळाली आहे.

animal cemetery in Paris love for animals save  environment and reduce pollution
Animal Care : देव तारी त्याला कोण मारी! आईचे छत्र हरपलेल्या कोल्ह्याच्या पिलांचे होतेय उचित संगोपन

प्राण्यांच्या या थडग्यांवर वेगवेगळे, छोट्या-मोठ्या आकाराचे, साधे किंवा कलाकुसर केलेले हेडस्टोन्स ठेवण्यात आलेत. कलाकुसर केलेला प्रत्येक हेडस्टोन हा वेगळा आहे. एका मांजरीच्या हेडस्टोनमध्ये कॅटहाऊस बनवण्यात आलं आहे आणि त्याला मांजरीच्या चेहऱ्याच्या आकाराचा दरवाजा बसवण्यात आला आहे.

अनेक कुत्र्यांच्या स्मारकावर त्यांचे पुतळे तयार करून बसवण्यात आले आहे. या दफनभूमीत एका मधमाशीची कबर आहे; पण तिला इथं पुरलंय असं नाही किंवा ती कुणाकडे पाळलेली होती, असंही नाही. मधमाशांचं पर्यावरणातील योगदानाचे महत्त्व सांगण्यासाठी तिची कबर इथे तयार करण्यात आली आहे.

असं म्हणतात की स्वत:पेक्षा दुसऱ्यावर प्रेम करणारा जगातला एकमेव प्राणी कुत्रा आहे. आपले पाळीव प्राणी आपल्याला सोडून गेले, तरीही त्यांच्यासोबतचा स्नेहबंध, प्रेम कधीच संपत नाही. ही आगळीवेगळी दफनभूमी फिरताना हे सतत जाणवत राहतं. जिवंतपणी आपल्यावर एवढं प्रेम करणाऱ्या प्राण्यांना त्यांच्या मृत्यूनंतर हक्काची जागा देता येणं, ही आयुष्यभर समाधान देणारी गोष्ट असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com