जीवनात आमूलाग्र बदल!  (डॉ. जगन्नाथ दीक्षित)

जीवनात आमूलाग्र बदल!  (डॉ. जगन्नाथ दीक्षित)

हेल्दी डाएट
नाव : प्रमोद पवार
मला डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या कार्यक्रमामुळे व डॉ. संदीप सोनावणे यांच्या मार्गदर्शनामुळे लाभ झाला आहे. मी वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. मला माझ्या मित्राने या आहारयोजनेविषयी सांगितले. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची क्‍लिप दाखविली. त्या व्याख्यानात नमूद असलेल्या डॉ. सोनावणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला रक्तचाचण्या करण्यास सांगितल्या. एचबीए१सी चाचणीमुळे मी मधुमेही असल्याचे समोर आले. मला पूर्वी कोणतेही औषध सुरू नव्हते. त्यामुळे डॉ. सोनावणे यांनी केवळ हा डाएट प्लॅन काटेकोरपणे पाळण्यास सांगितले. तो सुरू केल्यानंतर मी सकाळी ४५ मिनिटांत ४.५ किलोमीटर चालू लागलो. सुरवातीला दोन-तीन दिवस त्रास झाला. कारण माझी दुपारी जेवणाची वेळ १.३०ची आहे. पण मला १२.३० लाच डोके दुखू लागायचे. मग मी दुपारचे जेवण १२.३० वाजता आणि रात्रीचे ८ वाजता सुरू केले. दोन जेवणांमध्ये भरपूर पाणी पितो. व्हॉट्‌सॲप ग्रुपमध्ये होत असलेल्या शंकांच्या निरसानामुळे मी हा डाएट प्लॅन अधिक चांगल्या पद्धतीने पाळू लागलो. थोड्याच दिवसांत माझ्यात सकारात्मक बदल दिसू लागले.

दिवसभर फ्रेश वाटते, कामे जलद गतीने होतात, रात्री छान झोप लागते, गॅसेसची समस्या दूर झाली, अवेळी खाण्याची सवय मोडली, शरीर हलके वाटते. आता मी एका तासात ७ किलोमीटर चालतो. शिवाय सायकलही वापरतो. वजन कमी झाल्याने गुडघेदुखीही बंद झाली. माझ्यातील बदल पाहून शेजारी व कार्यालयातील सहकाऱ्यांनीही हा डायट प्लॅन सुरू केला. माझ्यातील बदल पाहून माझी आईही खूप आनंदी आहे. तीन महिन्यांनंतर माझे वजन ८३ किलोवरून ७२ किलोवर आले. कंबरेचा घेरही १७ सेंटिमीटरने कमी झाला. एचबीए१सी ३.८ ने कमी झाले. त्याचप्रमाणे फास्टिंग इन्शुलिनही ६.२४ ने कमी झाले. मी डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. संदीप सोनावणे, डॉ. सुबोध शेवडे व ग्रुपवर मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्‍टरांचे आभार मानतो. माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनात त्यांनी आमूलाग्र बदल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com