मनाचेही व्यायाम! (डॉ. राजीव शारंगपाणी)

MIND
MIND

आरोग्यमंत्र
व्यायामाची मनाचे आणि शरीराचे अशी फारकत करणे, हाच मूर्खपणा आहे. कारण, कोणत्याही क्षणी शरीर आणि मन यांची फारकत होऊ शकत नाही. कोणत्याही शारीरिक हालचालींमध्ये मनाचा पूर्णपणे सहभाग असला, तरच हालचाल उत्तम होते. शरीर, मन या अद्वैताचे शरीर हे दृश्‍य, तर मन हे अदृश्‍य स्वरूप आहे. आपल्या अंतःकरणाचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे चार भाग केले जातात. एखाद्या गोष्टीच्या साधकबाधक अशा दोन्ही बाजू बुद्धीसमोर ठेवते, ते मन. साधकबाधक गोष्टींवर निर्णय घेते, ती बुद्धी. घेतलेले निर्णय लक्षात ठेवते, ते चित्त आणि या सर्व गोष्टीस कारण तो अहंकार. मनाचे प्रकार तीन ः मनातल्या मनात शारीरिक हालचालींची एकाग्र होऊन कल्पना करणे. दुसरे, स्वेच्छेने श्‍वासोच्छ्वासावर नियंत्रण आणून पर्यायाने मनावर (अंतःकरणावर) नियंत्रण आणणे आणि तिसरे, काहीही न करणे. 

शारीरिक हालचालींच्या कल्पनेचा व्यायाम - हा खेळाडूंसाठी उपयुक्त असतो. एखाद्या उच्च दर्जाच्या खेळाडूची हालचाल प्रत्यक्ष व्हिडिओवर पाहिल्यानंतर अत्यंत एकाग्रतेने ती हालचाल आपल्या अंतःकरणात करणे आणि ती करीत असताना शरीरातील सर्व अवयवांची अंतर्गत अशी जाणीव घेत राहणे, हे याचे वैशिष्ट्य आहे. 

श्‍वासोच्छ्वासावर नियंत्रण - मनःस्थितीचे आणि श्‍वासोच्छ्वासाचे अतूट नाते आहे. मनाच्या नवरसांप्रमाणे असलेल्या कोणत्याही नऊ भावनांमध्ये श्‍वास नऊ प्रकारे सुरू असतो. अत्यंत एकाग्र परिस्थितीत श्‍वास जवळजवळ बंदही होतो. अशा प्रकारे श्‍वास नियंत्रित केल्यास मनही नियंत्रित होते. सामान्य श्‍वासोच्छ्वासाची एक लय असते. श्‍वास घेणे - थांबणे - सोडणे - थांबणे - घेणे अशा प्रकारे ती चालू असते. त्यातील प्रत्येक भागाची लांबी कमी-जास्त करून प्राणायाम हा व्यायाम बसविलेला आहे. 

काहीही न करणे : मनाच्या व्यायामातील मनाचा संबंधदेखील नसणारा हा प्रकार आहे. निर्विकार अंतःकरणाच्या आधी अंतःकरण जसे असेल, तसे पाहत राहणे आणि अखेर हे पाहणेदेखील पिकल्या फळाप्रमाणे पडणे, त्याला काहीही न करणे, असे म्हणतात. ‘झाझेन’ असे त्याला नाव देतात. शरीराचे आणि मनाचे व्यवहार त्रयस्थपणे पाहणे आणि ते पाहतापाहता पाहणे विसरणे, अशी त्याची मजा आहे. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com