ऊर्जा प्राणवायूशिवायची... (डॉ. राजीव शारंगपाणी)

ऊर्जा प्राणवायूशिवायची... (डॉ. राजीव शारंगपाणी)

आरोग्यमंत्र
मोठ्या शहरांमधून चालताना गल्ली-गल्लीत ‘ॲरोबिक्‍स’ असे लिहिलेले बोर्ड दिसतात. हे ॲरोबिक नेमके आहे तरी काय? ‘अ ॲरोबिक’ या शब्दाचा अर्थ प्राणवायू वापरून जेव्हा शरीर ऊर्जा निर्माण करते तेव्हा ॲरोबिक कार्य केले असा होतो. साहजिकच ॲनॲरोबिक म्हणजे प्राणवायू न वापरता उत्पन्न केलेली ऊर्जा असा अर्थ होतो.

आपण स्वस्थ बसलेले असतो तेव्हा शरीर पूर्णपणे प्राणवायू वापरून ऊर्जा निर्माण करत असते. पण, शरीराला अचानक ऊर्जा लागते तेव्हा प्राणवायूशी संयोग होऊन ऊर्जा उत्पन्न करणे हे वेळकाढू काम असल्याने शरीर प्राणवायूशिवायच झटकन ऊर्जा उत्पन्न करून देते आणि ती वापरते. म्हणजे, डोळ्यांदेखत बस जाणार म्हटल्यावर तुम्ही सुसाट वेगाने पळता, कुत्रा मागे लागल्यावर जीव खाऊन धावता, अशा वेळी शरीर प्राणवायूखेरीज ऊर्जा निर्माण करते. मंद गतीने बऱ्याच काळ केल्या जाणाऱ्या हालचालीत शरीर जवळजवळ पूर्णपणे प्राणवायू वापरून ऊर्जा उत्पन्न करते. म्हणजे फिरायला जाणे, हळूहळू पर्वती चढणे, संथपणे पोहणे, सायकल संथपणे चालवणे यात शरीराला प्राणवायू वापरून ऊर्जा उत्पन्न करायला भरपूर वेळ मिळतो. म्हणूनच ते ऊर्जानिर्मितीचे प्रमुख साधन होते. मात्र, हे करत असतानाच अचानक आणीबाणीची परिस्थिती आली. म्हणजे, पोहताना एकदम साप दिसला, सायकल चालविता अचानक गल्लीतून कुत्रे भुंकत आले, फिरायला जाताना मधमाश्‍यांचे पोळे फुटले आणि माश्‍यांनी हल्ला केला तर शरीर क्षणार्धात प्राणवायूशिवाय ऊर्जा उत्पन्न करून आपला बचाव करू शकते. याचा अर्थ असा की, शरीर गरजेप्रमाणे प्राणवायू वापरून आणि न वापरता कोणत्याही प्रमाणात ऊर्जा उत्पन्न करू शकते. 

(उद्याच्या अंकात - ॲरोबिक्‍स व्यायामाने काय होते?) 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com